मेनॉपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती हा मानवी जीवनातील एक अद्वितीय अनुभव मानला जातो. परंतु, असे दिसून आलेय की, मानवाव्यतिरिक्त इतर अनेक प्रजातींनाही मेनोपॉज होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे प्राणी दर्शवितात की, रजोनिवृत्ती हा केवळ मानवाच्या नव्हे, तर विविध प्रजातींसाठी जीवनाचा एक आकर्षक पैलू आहे. यामागील उत्क्रांतीवादी कारणे शास्त्रज्ञांमध्ये उत्सुकता निर्माण करतात. विशेषतः या प्राण्यांच्या समुदायांतील सामाजिक संरचना आणि कौटुंबिक संबंधांना त्याचा कसा फायदा होतो याबद्दल जाणून घेण्यास ते उत्सुक आहेत.

रजोनिवृत्तीचा अनुभव घेणारे पाच प्राणी खालीलप्रमाणे : (Here’s a list of five animals that experience menopause)

१. किलर व्हेल (ऑर्कास) (Killer Whales (Orcas)

रजोनिवृत्तीबद्दल किलर व्हेल ही सर्वांत जास्त अभ्यासलेल्या प्रजातींपैकी एक आहे. मादी ऑर्कास (किलर व्हेल) बहुतेकदा पुनरुत्पादन (प्रजनन) थांबवल्यानंतरही बराच काळ जगतात आणि या काळात त्या त्यांच्या नातवंडांची काळजी घेण्यास मदत करतात. ही बाब लक्षात घेता, मानवाव्यतिरिक्त रजोनिवृत्तीचा अनुभव घेणाऱ्या काही मोजक्या प्रजातींपैकी ती एक आहे, असे म्हणता येईल. रजोनिवृत्तीनंतरही या माद्या ऑर्कास दीर्घकाळ जगतात ही वस्तुस्थिती महत्त्वाची आहे. कारण- त्यांच्या कुटुंब आणि समूहाला (pods) टिकून राहण्यास आणि विकसित करण्यास त्या मदत करू शकतात, तसेच त्या मौल्यवान ज्ञान आणि अनुभवाद्वारे इतरांना मदत करून, त्यांच्या सामाजिक रचनेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

२. शॉर्ट-फिन्ड पायलट व्हेल ( Short-Finned Pilot Whales)

ऑर्कासप्रमाणेच, मादी शॉर्ट-फिन्ड पायलट व्हेलदेखील रजोनिवृत्ती अनुभवतात. त्या त्यांच्या पुनरुत्पादक (प्रजनन) वर्षांपेक्षा जास्त काळ जगतात. प्रजननोत्तर टप्प्यामुळे या व्हेल तरुण पिढ्यांची काळजी घेण्यास मदत करतात आणि त्यांच्या समुदायाचे अस्तित्व वाढवतात.

३. बेलुगा व्हेल (Beluga Whales)

अलीकडच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की,”बेलुगा व्हेल रजोनिवृत्तीतून जातात, ज्यामुळे त्यांना या अद्वितीय वैशिष्ट्याच्या प्रजातींच्या यादीत समाविष्ट केले जाते. पुनरुत्पादक (प्रजनन) वयाच्या पलीकडे जगण्याची त्यांची क्षमता त्यांच्या समूहामध्ये सामाजिक बंधने आणि कौटुंबिक संरचना राखण्यास मदत करू शकते.

४. नार्व्हल ( Narwhals)

नार्व्हल मासेदेखील रजोनिवृत्तीचा अनुभव घेत असल्याचे आढळून आले आहे. रजोनिवृत्ती अनुभवणाऱ्या प्रजातींमध्ये ही नव्याने समाविष्ट करण्यात आलेली प्रजाती आहे. इतर दात असलेल्या व्हेलप्रमाणेच नार्व्हल माशांच्या प्रजातीला तरुण सदस्यांना मार्गदर्शनासह आधार देऊ शकणाऱ्या वयस्कर मादीचा फायदा होतो.

५. चिंपांझी (Chimpanzees)

संशोधनातून असे दिसून आले आहे की, मादी चिंपांझी रजोनिवृत्ती काळातून जाऊ शकतात. प्रजनन थांबवल्यानंतर त्या वर्षानुवर्षे जगू शकतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या समुदायांसाठी महत्त्वाची भूमिका बजावता येते. त्यांच्यामार्फत तरुण पिढ्यांना ज्ञानासह संसाधने पुरविली जातात.