What Is APAAR ID Card : ‘ऑटोमेटेड पर्मनंट ॲकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री’ याचे लघुरूप म्हणजे ‘अपार’ (APAAR ID Card) अपार आयडी कार्ड हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० अंतर्गत शिक्षण मंत्रालय आणि भारत सरकारने सुरू केलेला एक उपक्रम आहे. देशभरातील विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड, त्यांच्या अचिव्हमेंट्स आणि क्रेडेन्शियल्स डिजिटल पद्धतीने संग्रहित करणारा १२ अंकांचा एक खास आयडी देते, यामुळे विद्यार्थ्यांचं इंटिग्रेटेड आयडेंटिफिकेशन सिस्टिम तयार होणार आहे.
अपार आयडी कार्ड विद्यार्थ्यांना एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्याचा प्रयत्न करते. हे वन नेशन वन स्टुडंट आयडी कार्ड शैक्षणिक प्रगतीचे निरीक्षण करण्याची प्रक्रिया आणखीन सोपी करेल आणि देशभरात एक अनोखा शैक्षणिक अनुभव देईल.
अपार आयडी कार्ड (APAAR ID Card) म्हणजे काय?
तर APAAR आयडीचा फूल फॉर्म ‘ऑटोमेटेड पर्मनंट ॲकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री’ आहे. हे कार्ड संपूर्ण भारतातील शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांना एक १२ अंकी ओळखपत्र क्रमांक देते, ज्यामुळे त्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड डिजिटल पद्धतीने सेव्ह केले जाऊ शकतात. हे वन नेशन वन स्टुडंट आयडी कार्ड विद्यार्थ्यांना त्यांचे संपूर्ण शैक्षणिक रेकॉर्ड, जसे की बक्षिसे, पदव्या, शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक यश एकत्र ठेवण्याचा सोपा मार्ग प्रदान करेल.
अपार आयडी कार्डचे फायदे –
अपार आयडी कार्ड हे खाजगी किंवा सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक ओळख आहे. कार्ड त्यांच्या शैक्षणिक क्रेडिट्स, पदव्या आणि शिक्षणाशी संबंधित इतर महत्त्वपूर्ण माहितीपर्यंत सहज प्रवेश प्रदान करते. तर याचा फायदा विद्यार्थ्यांना कसा होईल हे आपण जाणून घेऊया…
शैक्षणिक डेटा –
कार्ड विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गोष्टी म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण करणे, ग्रेड आणि शिष्यवृत्तीमध्ये डिजिटल रुपात सुरक्षित ठेवण्यात येतात.
कायमस्वरूपी देखरेख –
APAAR आयडी हा कायमस्वरूपी मॉनिटर क्रमांक आहे, जो विद्यार्थ्याच्या पूर्व प्राथमिक ते महाविद्यालयापर्यंतच्या शैक्षणिक प्रवासाची कायमस्वरुपी देखरेख करेल.
आधार इंटीग्रेशन –
प्रत्येक APAAR आयडी विद्यार्थ्याच्या आधार कार्डशी लिंक केला जाईल आणि शैक्षणिक कागदपत्रांमध्ये सातत्य सुनिश्चित केले जाईल.
अपार आयडी कार्डमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांसह त्याची पर्सनल डिटेल्सही असणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा ब्लड ग्रुप, वजन, उंची आदी डिटेल्स असणार आहे. या गोष्टी सार्वजनिक करण्यासाठी पालकांची परवानगी मिळणं आवश्यक आहे.
तर अपार आयडी संमती फॉर्म ऑनलाइन कसा भरायचा?
- अपार वेबसाइटवर जा.
- ‘Resources’ सेक्शनमध्ये जा.
- अपार पालक संमती फॉर्म (APAAR Parental Consent) डाउनलोड करा.
- आवश्यक माहितीसह फॉर्म भरा.
- संबंधित शाळा किंवा शैक्षणिक संस्थेकडे जमा करा.
- आपल्या मुलाने यापुढे अपार आयडी कार्यक्रमाचा भाग होऊ नये असे वाटत असल्यास पालक कधीही त्यांची संमती मागे घेऊ शकतात.
अपार आयडी कार्डसाठी (APAAR ID Card) ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसे करायचे?
- शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट (ABC) बँकेच्या वेबसाइटवर जा.
- ‘माय अकाउंट’वर क्लिक करा आणि ‘Student’ निवडा.
- डिजिलॉकरवर नोंदणी करा, जिथे विद्यार्थ्यांना त्यांचा आधार क्रमांक आणि इतर तपशील द्यावे लागतील.
- DigiLocker वर लॉग इन करा आणि KYC पडताळणीसाठी आधार तपशील शेअर करण्यासाठी संमती द्या.
- शाळेचे नाव, वर्ग, अभ्यासक्रम तपशील यांसारखी आवश्यक शैक्षणिक माहिती लिहा.
- सबमिशन केल्यावर, APAAR ओळखपत्र तयार केले जाईल.
अपार आयडी कार्ड (APAAR ID Card )डाउनलोड कसे करायचे?
- ABC बँकेच्या वेबसाइटवर लॉग इन करा.
- डॅशबोर्डमध्ये, ‘APAAR कार्ड डाउनलोड’ पर्याय शोधा.
- डाउनलोड किंवा प्रिंट पर्याय निवडा.
- त्यानंतर कार्ड डाउनलोड किंवा प्रिंट करून येईल