अनेकदा तुमच्या कार किंवा बाईकच्या टायरमध्ये पंक्चर होतो, तेव्हा टायरमध्ये ट्यूब आहे की तो ट्यूबलेस आहे यावरुन पंक्चर काढणारा तुमच्याकडून पैसे घेत असतो. शिवाय आजकाल सर्वच गाड्यांमध्ये ट्यूब नसलेले टायर म्हणजेच ट्यूबलेस टायर वापरले जातात. ज्या टायरमध्ये ट्यूब नसते त्याला ट्यूबलेस टायर असं म्हटलं जातं. हे झालं रस्त्यावरुन धावणाऱ्या वाहनांबाबत पण शेकडो टन वजनाच्या हवेत उडणाऱ्या विमानाच्या टायरमध्ये ट्यूब असते की ते ट्यूबलेस असतात? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असतो. तर विमानाचे टायर नेमके कोणत्या प्रकारचे असतात याबाबतची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विमानात टायर महत्त्वाचे का असतात?

सुरक्षेच्या बाबतीत टायर हा विमानाचा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. कारण विमानाचे लँडिंग असो वा टेक-ऑफ या दोन्ही वेळेस टायर खूप महत्वाची भूमिका बजावतात. ते विमानाला ब्रेक लावण्यासाठी आणि थांबण्यासाठी आवश्यक घर्षण करण्याच्या कामात उपयोगी पडतात. विमानाचे टायर हे लँडिंग, टेक ऑफ, टॅक्सिंग आणि पार्किंग दरम्यान जास्तीचे वजन सहन करु शकतील अशा पद्धतीने डिझाइन केलेले असतात. विमानातील चाकांची संख्याही विमानाच्या वजनाबरोबर वाढवली जाते, त्याचं कारण म्हणजे विमानाचे वजन सर्व चाकांवर समान पद्धतीने विभागाला जाते.

हेही वाचा- व्यक्ती वारंवार त्याच चुका का करतो? नंतर त्या सवयी कशा सोडतो? शास्त्रज्ञांनी शोधले उत्तर

कोणत्या विमानाला किती टायर?

विमानाबाबत माहिती देणाऱ्या Aviation Hunt.com या वेबसाइटनुसार, बोईंग 737NG आणि 737MAX मध्ये 6 चाके बसवली जातात. तर बोईंग 787 ला 10 चाके असतात. बोईंग 777 ला 14 चाके आहेत आणि एअरबस A380 ला 22 चाकांची गरज असते. विमानाचे टायर इतके मजबूत असतात की ते 340 टन वजन वाहू शकतात शिवाय टेकऑफच्या वेळी 250 किमी/तासापेक्षा जास्तीचा वेग सहन करू शकतात.

विमानाचे टायर कोणत्या प्रकारचे असतात?

हेही वाचा- आता बायो प्रिंटरद्वारे त्वचेसंबंधित आजार होणार बरे? ही मशीन नेमकी आहे तरी कशी? जाणून घ्या…

एव्हिएशन हंट डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, गरज आणि सोयीनुसार, ट्यूब असणारे आणि ट्यूब नसणारे म्हणजेच ट्यूबलेस असे कोणत्याही प्रकारचे टायर विमानात वापरता येऊ शकतात. मात्र, ट्यूबलेस टायर्स ट्युब असणाऱ्या टायर्सपेक्षा जास्त फायदेशीर असतात. शिवाय ट्यूब असणारे टायर्स जास्त प्रमाणात वापरले जात नाहीत. त्यामुळे आजकाल विमानात मोठ्या प्रमाणात ट्यूबलेस टायरचा वापर केला जातो.

टायरमध्ये नायट्रोजन गॅस भरला जातो –

विमानाच्या टायरमध्ये सामान्य गॅसऐवजी नायट्रोजन गॅस भरला जातो, कारण नायट्रोजन गॅस इतर गॅसच्या तुलनेत कोरडा आणि हलका असतो. यावर तापमानाचा फारसा परिणाम होत नाही.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are airplane tires tubeless or tubeless know what gas is in airplane tires fyi news trending news jap