आजच्या काळात स्मार्टफोन हे आपल्या आयुष्य झाले आहे. आधुनिक काळात जिथे स्मार्टफोन्स आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग झाला आहे, तिथे त्यापासून दूर राहण्याच्या विचारामुळे जाणवणारी चिंता ही एक सामान्य भावना आहे. हीच भीती वा चिंतायुक्त भावनेची एक नवीन संज्ञा उदयास आली आहे; जिला ‘नोमोफोबिया’ म्हटले जाते. या शब्दामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. नोमोफोबिया म्हणजेच ‘नो मोबाइल फोबिया’. ही स्थिती मोबाइल फोनशिवाय जगण्याची भीती किंवा काही कारणास्तव तो वापरण्यात अक्षम ठरण्याची भीती किंवा चिंता दर्शविते.
नोमोफोबिया ही फक्त मोबाईलशिवाय राहण्याची भीती नाही, तर आधुनिक काळातील मोबाईलवर आपण अवलंबून आहोत हे सत्य दर्शविणारा आरसा आहे. या स्थितीला अद्याप अधिकृतपणे मानसशास्त्रीय विकार म्हणून ओळखले जात नसले तरी त्याच्या व्यापकतेमुळे आणि व्यक्तींच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
नोमोफोबियाची उत्पत्ती
‘नोमोफोबिया’ हा शब्द पहिल्यांदा २००८ मध्ये यूके पोस्ट ऑफिसने केलेल्या अभ्यासात समोर आला, ज्यामध्ये असे आढळून आले की, ब्रिटनमधील ५३ टक्के मोबाईल फोन वापरकर्ते जेव्हा ते फोन वापरण्यास असमर्थ ठरत होते तेव्हा त्यांना चिंता वाटत असल्याचे समोर आले. तेव्हापासून या घटनेला जगभरात मान्यता मिळाली आहे. कारण- स्मार्टफोन हे आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सर्वव्यापी आणि अपरिहार्य साधन बनले आहे.
हेही वाचा – पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण कोणते आहे? येथे माणूस राहू शकतो का? जाणून घ्या येथे किती आहे तापमान?
लक्षणे आणि चिन्हे :
सतत मोबाईल तपासणे : कोणत्याही नवीन सूचना किंवा संदेश नसतानाही व्यक्ती तिचा फोन वारंवार तपासते.
चिंता जाणवणे : फोनशिवाय जगण्याचा किंवा कनेक्टिव्हिटी गमावण्याचा विचार चिंता किंवा घाबरण्याच्या भावनांना उत्तेजन देऊ शकतो.
अवलंबित्व : काही व्यक्ती इतरांनी आपल्याला स्वीकारावे, मनोरंजन किंवा सामाजिक परस्परसंवादासाठी त्यांच्या फोनवर जास्त अवलंबून राहू शकतात; ज्यामुळे अवलंबित्वाची भावना निर्माण होते.
फोनपासून दूर राहणे टाळणे : लोक नेहमी आपण फोनच्या आवाक्यात आहोत ना याची खात्री करण्यासाठी खूप प्रयत्न करू शकतात. ते फोनपासून दूर राहावे लागेल, अशी परिस्थिती टाळतात.
नोमोफोबियाची कारणे
तंत्रज्ञानावरील अवलंबित्व : संवाद, माहिती आणि मनोरंजनासाठी स्मार्टफोन्सवर जास्तीत जास्त अवलंबून राहण्यामुळे तो आपल्या दैनंदिन दिनचर्येत अविभाज्य भाग ठरत आहे.
महत्त्वाची गोष्ट गमाण्याची भीती (FOMO) : महत्त्वाच्या घटना, घडामोडींबाबत आपल्याला काहीच माहीत नाही. आपल्याला इतरांबरोबर संवाद साधता येणार नाही, अशी भीती व्यक्तींना सतत मोबाईलवर कनेक्ट राहण्यास प्रवृत्त करते.
सामाजिक दबाव : समवयस्कांचा दबाव आणि संपर्कात राहण्याच्या महत्त्वावर जोर देणारे सामाजिक नियम एखाद्याला मोबाईलपासून दूर झाल्यानंतर त्याच्या मनातील चिंतेची भावना वाढवू शकतात.
हेही वाचा – पक्षी किती काळ जगतात? म्हातारपणी पक्ष्यांची पिसे पांढरी पडतात का? जाणून घ्या रंजक तथ्य
मोबाईलशी भावनिकदृष्ट्या जोडले जाणे : एखादी व्यक्ती त्याच्या स्मार्टफोनशी भावनिकदृष्ट्या जोडली जाऊ शकते; ज्यामुळे मोबाईलशिवाय राहण्याची भीती तीव्र होऊ शकते.
मानसिक आरोग्यावर परिणाम
वाढलेला ताण : सतत फोन तपासण्याची सवय आणि नेहमी फोनशी कनेक्ट राहण्याची सतत गरज वाटणे एखाद्याची तणावाची पातळी वाढवू शकते आणि विश्रांतीमध्ये व्यत्यय आणू शकते.
झोपेचा त्रास : स्मार्टफोनचा विशेषतः झोपेच्या आधी केला जाणारा जास्त वापर हा झोपेच्या गुणवत्तेत व्यत्यय आणू शकतो आणि निद्रानाशास तो कारणीभूत ठरू शकतो.
सर्वांपासून दूर जाणे : विरोधाभास म्हणजे सामाजिक परस्परसंवादासाठी स्मार्टफोन्सवर अत्याधिक अवलंबून राहण्यामुळे वास्तविक जीवनामध्ये व्यक्तीमध्ये एकाकीपणाची आणि सर्वांपासून दूर गेल्याची भावना निर्माण होऊ शकते.
कमी झालेली उत्पादकता : सूचना आणि ॲप्समधून सतत विचलित झाल्यामुळे एकाग्रता आणि उत्पादन क्षमता बिघडू शकते; ज्यामुळे काम आणि शैक्षणिक कामगिरीवर परिणाम होतो.
हेही वाचा – तुम्ही बदकांना ब्रेड खायला घालू शकता का? बदकांना काय खायला द्यावे, काय नाही?
सामना धोरणे (COPING STRATEGIES)
डिजिटल डिटॉक्स : स्मार्टफोन वापरताना नियमित ब्रेक घेणे आणि स्क्रीन टाइम मर्यादित करणे त्यावर अवलंबून राहणे कमी करण्यामुळे चिंता कमी करण्यात मदत मिळू शकते.
वेळ निश्चित करणे : फोन वापरासाठी विशिष्ट वेळा आणि ठिकाणे निश्चित केल्यास ऑनलाइन आणि ऑफलाइन गोष्टी करण्यासाठी मदत होईल.
माइंडफुलनेस : माइंडफुलनेस मेडिटेशनसारखी तंत्रे व्यक्तींना त्यांच्या स्मार्टफोन वापरण्याच्या पद्धतींबद्दल अधिक जागरूक होण्यास आणि सक्तीच्या सवयी मोडण्यास मदत करू शकतात.
मदत घ्या : जर नोमोफोबियाचा दैनंदिन कामकाज किंवा मानसिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम होत असेल, तर मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्या; ज्यामुळे तुम्हाला नोमोफोबियाचा सामना करण्याच्या दृष्टीने धोरणे आखण्यासाठी मदत आणि भावनिक मार्गदर्शन मिळू शकते.
नोमोफोबिया डिजिटल युगातील मानव आणि तंत्रज्ञान यांच्यातील गुंतागुंतीचे नाते दर्शविते. स्मार्टफोन्स अभूतपूर्व कनेक्टिव्हिटी आणि सुविधा देतात, ते आपल्या मानसिक आरोग्यासाठी आणि शारीरिक आरोग्यासाठी आव्हानेदेखील निर्माण करतात.
नोमोफोबियाची चिन्हे ओळखणे आणि त्यांचा सामना करणे हे तंत्रज्ञानाशी संतुलित आणि परिपूर्ण संबंध निर्माण करण्याच्या दिशेने आवश्यक पावले आहेत. सजगता विकसित करून आणि सीमा निश्चित करून, व्यक्ती अधिक लवचिकता आणि आत्म-जागरूकतेसह डिजिटल युगात निरोगी जीवन जगू शकते.