आर्मी कॅन्टीनबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल जिथे अनेक वस्तू सवलतीच्या दरात मिळतात. केंद्र सरकारने लष्करी जवानांसाठी ही कॅन्टीन स्टोरेज विभागा (CSD) ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या अनुदानाबाबत विविध प्रकारची तथ्ये शेअर केली जातात. अनेकांचा विश्वास आहे की, येथे भरपूर सवलत मिळते; तर काहींच्या मते येथे ३-४ टक्के सूट मिळते. अशा स्थितीत आम्ही तुम्हाला लष्कराच्या कॅन्टीनमध्ये खरचं स्वस्त दरात सामान मिळते का? आणि मिळते तर किती डिस्काउंट मिळतो? तसेच याचा फायदा कोणी घेतला पाहिजे? असे प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात निर्माण होतात. याचबद्दल आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत.

ज्याला तुम्ही आर्मी कॅन्टीन म्हणता, ते कॅन्टीन स्टोअर्स विभाग आहे आणि सैन्यासह इतर काही कर्मचाऱ्यांना त्याची सुविधा मिळते. बाजाराच्या तुलनेत या कॅन्टीनमध्ये जवानांसाठी स्वस्त दरात वस्तू उपलब्ध आहेत. या कॅन्टीनचे सुमारे १.५ कोटी लाभार्थी आहेत. ज्यात तिन्ही सेवांचे कर्मचारी (लष्कर, हवाई दल आणि नौदल) आणि त्यांचे कुटुंब तसेच माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांचा समावेश आहे.

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
Minor boy beaten up in shop two suspects arrested
दुकानात अल्पवयीन मुलास मारहाण, दोन संशयित ताब्यात
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही

आर्मी ऑर्डर AO 32/84 नुसार, माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय आणि किमान ५ वर्षे सेवेत असलेले माजी संरक्षण कर्मचारी युनिट्स/आस्थापनांमध्ये उपलब्ध असलेल्या CSD(I) कॅन्टीन सुविधांसाठी पात्र आहेत. वैद्यकीय कारणास्तव माघार घेतलेल्या कॅडेट्स/नियुक्त्यांनादेखील कॅन्टीन स्टोरेज विभागाच्या सुविधांचा लाभ घेण्याचा अधिकार आहे.

आर्मी कॅन्टीनमध्ये कोणत्या वस्तू खरेदी करता येतात?

आर्मी कॅन्टीनमध्ये किराणा सामान, स्वयंपाकघरातील उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सौंदर्य प्रसाधने, घड्याळ, स्टेशनरी, दारू आणि वाहने इत्यादी आहेत. याशिवाय कॅन्टीनमधून कार आणि बाईक आदींचीही खरेदी करता येते. तसेच अनेक विदेशी वस्तूही कॅन्टीनमध्ये मिळतात. अनेक अहवालानुसार, भारतात जवळपास ३७०० आर्मी कॅन्टीन आहेत. ज्यामध्ये दोन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वस्तू विकल्या जातात.

या वस्तूंवर किती सवलत मिळते?

आर्मी कॅन्टीनमधील वस्तूंवर सवलत किंवा सबसिडीबद्दल बोलायचे झाल्यास निश्चित टक्केवारी नाही. कोणत्या वस्तूवर किती सूट मिळणार हे कराच्या आधारे ठरवले जाते. आर्मी कॅन्टीनमध्ये वस्तूंवर ५० टक्के कर सूट उपलब्ध आहे. तसेच ज्या वस्तूंवर १८ टक्के कर आकारला जातो त्यावर फक्त ९ टक्के कर आकरला जातो. म्हणजेच कर निम्म्यावर आला आहे. त्यामुळे सर्व वस्तू स्वस्तात मिळतात. सरकार आर्मी कॅन्टीनमधील वस्तूंवरील करात ५० टक्के सूट देते. जीएसटीचे कमाल दर ५, १२, १८ आणि २८ टक्के आहेत.

आर्मी कॅन्टीनमध्ये कोण आणि किती खरेदी करता येते?

यापूर्वी कोणीही आर्मी कॅन्टीन कार्डवरून वस्तू खरेदी करू शकत होते आणि कितीही वस्तू घेऊ शकत होते. त्यामुळे सुविधा घेणाऱ्या व्यक्तीबरोबर त्याचे नातेवाईक, मित्रमंडळीदेखील आर्मी कॅन्टीन कार्डमधून सामान खरेदी करत होते. मात्र, आता काही वस्तूंवर काही मर्यादा निश्चित करण्यात आली असून त्या मर्यादेच्या आधारे वस्तू खरेदी करता येणार आहेत. उदाहरणार्थ, साबण किंवा खाद्यपदार्थांच्या खरेदीवर मर्यादा आहे. दर महिन्याला किंवा वर्षभरात तितकेच सामान खरेदी करता येते. महत्वाची गोष्टी म्हणजे, आर्मी कॅन्टीनमध्ये सर्वसामान्य लोकांना खरेदीची मुभा नाही, त्यासाठी आर्मी कार्डची गरज असते.

Story img Loader