IRCTC Ask Disha 2.0 : देशाच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची लाईफलाइन मानली जाणारी भारतीय रेल्वे ग्राहकांसाठी सातत्याने नवीन सुविधा आणतं असते. यात भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) एआयवर आधारित चॅटबॉट आस्क दिशा २.० हे नवं फिचर आणलं आहे. या माध्यमातून रेल्वेचे पीएनआर स्टेटस चेक करता येणार आहे. यातून व्हॉइस, चॅट आणि मेसेजद्वारेही प्रवाशांच्या प्रश्नांची उत्तरं एकाच ठिकाणी मिळणार आहेत. या चॅटबॉटवर तुम्हाला तिकीट बुकिंग रिफंडची स्थिती देखील माहिती मिळणार आहे.
रेल्वेचे PNR स्टेट्स चेक करण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
१) सर्वप्रथम IRCTC वेबसाइटवर जा.
२) या वेबसाइटच्या उजव्या कोपऱ्यातील AI चॅटबॉटवर क्लिक करा.
३) आता AI चॅटबॉट Ask Disha 2.0 कडून मदत मिळवण्यासाठी क्लिक करा.
४) आता PNR स्टेटसवर क्लिक करा.
५) आता १० अंकी पीएनआर क्रमांक टाका.
चॅटबॉट आता तुम्हाला पीएनआर क्रमांकाशी संबंधित तपशील प्रदान करेल. Ask Disha 2.0 वापरकर्त्यांना त्यांचे ऑनलाइन तिकिटे बुक करण्यासाठी मदत करते.
आयआरसीटीसी वेबसाईटद्वारे ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना आस्क दिशा २.० ही सेवा देण्यात आली आहे. याद्वारे प्रवाशांना तिकीट बुकिंग, तिकीट रद्द करणे, तत्काळ तिकीट बुकिंग आणि इतर सर्व गोष्टींची माहिती मिळू शकते. टेक्स्ट आणि व्हॉइस कमांडचा वापर करुन तुम्ही मदत मिळवू शकता.