Atiq Ahmed and Ashraf Ahmed Shot Dead in Uttar Pradesh : उमेश पाल हत्याकांडातील आरोपी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना काल समोर आली. या गोळीबारात दोघांचाही मृत्यू झाला आहे. प्रयागराजच्या मेडिकल कॉलेजमध्ये दोघांना मेडिकलसाठी नेले जात असताना त्यांच्यावर तीन अज्ञात आरोपींनी एकामागून एक गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे. हे दोघेही भाऊ पोलीस कोठडीत होते, त्यामुळे या घटनेकडे आता ‘कस्टोडियल डेथ’ म्हणून पाहिले जात आहे. पण आधी ‘कस्टोडियल डेथ’ म्हणजे काय आणि त्यासंबंधित नेमका काय कायदा आहे? जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कस्टोडियल डेथ म्हणजे काय? (What Is Custodial Death)

एखाद्या आरोपीचा किंवा गुन्हेगाराचा मृत्यू हा पोलीस कोठडीत होतो तेव्हा त्याला ‘कस्टोडियल डेथ’ असे म्हणतात. तसेच खटल्यातील सुनावणीदरम्यान आणि न्यायालयीन कोठडीदरम्यान झालेल्या मृत्यूलाही ‘कस्टोडियल डेथ’ म्हटले जाते. अतिक आणि अशरफ हे देखील पोलीस कोठडीत होते. याचदरम्यान त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली, त्यामुळे या हत्येकडेदेखील ‘कस्टोडियल डेथ’ म्हणून पाहिले जात आहे. या हत्यामागे अनेक कारणे असू शकतात. जसे की, पोलीस बळाचा गैरवापर, पोलिसांचा निष्काळजीपणा किंवा अधिकाऱ्यांचे गैरवर्तन, ज्यामुळे आरोपी किंवा गुन्हेगाराचा मृत्यू होतो. अतिक-अशरफ प्रकरणात आतापर्यंत पोलिसांचा निष्काळजीपणा दिसून आल्याचे म्हटले जात आहे.

Atiq Ahmed Shot Dead: “अचानक गोळ्यांचा आवाज झाला, ते दोघं…”; अतिकची हत्या झाली, तेव्हा नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरारक घटनाक्रम!

पण खरंच या प्रकरणात पोलिसांचा निष्काळजीपणा सिद्ध झाल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात पोलीस कायदा, १८६१ च्या कलम ७ आणि २९ अन्वये कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवीत बडतर्फ, शिक्षा किंवा निलंबनाची कारवाई केली जाईल.

भारतात पोलीस कस्टडीत मृत्यू झालेल्यांची संख्या

केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक ८० मृत्यू गुजरातमध्ये झाले आहेत. तर उत्तर प्रदेशात २०१७ ते २०२२ पर्यंत एकूण ४१ लोकांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत एकूण ७६ जणांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. ‘कस्टोडियल डेथ’च्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. बिहारमध्ये गेल्या पाच वर्षांत हा आकडा ३८ वर पोहोचला आहे.