Ayushman Bharat Health Insurance : केंद्रीय मंत्रिमंडळानं ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’ला (AB PM-JAY) मंजुरी देऊन एक मोठं पाऊल पुढे टाकलं आहे. त्यानुसार ज्यांचं वय ७० वर्षं किंवा त्याहून अधिक आहे अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य कवच लाभणार आहे. आयुष्मान भारत हा भारत सरकारचा एक आरोग्य प्रकल्प आहे. या योजनेंतर्गत ७० वर्षं आणि त्याहून अधिक वयाच्या कोणत्याही सामाजिक-आर्थिक स्थितीतील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत घेता येतात. ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य या योजने’साठी (Ayushman Bharat Yojana) कोण पात्र आहे, या योजनेचे फायदे काय, त्यासाठी अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर जाणून घेऊ…

सर्वप्रथम तुमच्या राज्यातील पात्र असलेल्या रुग्णालयांची यादी शोधण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टी करू शकता :

स्टेप १ : सगळ्यात आधी आयुष्यमान भारतच्या pmjay.gov.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
स्टेप २ : मेन्यूमधील ‘फाईंड हॉस्पिटल’ या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप ३ : तुमचे राज्य व जिल्हा निवडा.
स्टेप ४ : तुम्ही कोणत्या प्रकारचे रुग्णालय शोधत आहात ते निवडा.
स्टेप ५ : सर्च फॉर हॉस्पिटल्सवर क्लिक करा.
स्टेप ६ : रुग्णालयाचा प्रकार निवडा (तुम्ही सरकारी किंवा खासगी रुग्णालय शोधत आहात, ते स्पष्ट करा)
स्टेप ७ : तुमच्या क्षेत्रातील नोंदणीकृत रुग्णालयांची यादी पाहण्यासाठी ‘सबमिट’वर क्लिक करा.

हेही वाचा…Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजनेचा कसा मिळणार लाभ? ‘या’ योजनेसाठी पात्र कोण? मोफत आरोग्य विमा किती रुपयांचा मिळणार? जाणून घ्या सर्वकाही

तुम्ही उपचारांच्या आवश्यकतांनुसार रुग्णालयांची क्रमवारी लावू शकता. आयुष्मान भारत (Ayushman Bharat Yojana) या उपक्रमांतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत रुग्णालयांची यादी करण्यात आली आहे. या यादीतील रुग्णालयांत पात्र लाभार्थींना मोफत उपचार प्रदान केले जातात. तुम्ही तुमच्या जवळच्या रुग्णालयामार्फत आयुष्मान कार्डासाठी अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचं ओळखपत्र बरोबर ठेवावं लागेल. उदाहरणार्थ- तुमचे आधार कार्ड.

आयुष्मान भारत आरोग्य विम्याची पात्रता कशी तपासायची?

स्टेप १ : पात्रता विभागात (Eligibility Section) जा आणि वेब पेजवरील ”Am I Eligible’ पर्याय निवडा.
स्टेप २ : तुमचा मोबाईल नंबर टाका आणि ओटीपीची वाट पहा.
स्टेप ३ : ओटीपी एंटर केल्यानंतर तुमचे राज्य निवडा आणि तुमचा रेशन कार्ड नंबर तेथे लिहा.
स्टेप ४ : तुम्ही योजनेसाठी पात्र आहात की नाही हे पाहण्यासाठी ‘सबमिट’वर क्लिक करा.

व्हिडीओ नक्की बघा…

१२ सप्टेंबर २०२४ रोजीच्या द प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो (PIB) नुसार अद्ययावततेनंतरच्या बाबी खालीलप्रमाणे :

नवीन कार्ड : ७० आणि त्याहून अधिक वयाच्या पात्र ज्येष्ठ नागरिकांना AB PM-JAY योजनेंतर्गत नवीन कार्ड दिले जाईल.

टॉप-अप कव्हरेज : आयुष्मान भारत योजनेंतर्गत (Ayushman Bharat Yojana) आधीच समाविष्ट असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आरोग्य विम्याच्या अतिरिक्त पाच लाख रुपये टॉप-अप कव्हर म्हणून देण्यात येईल. या रकमेचा उपयोग फक्त ज्येष्ठ नागरिक करू शकतात; पण त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत.

कौटुंबिक कव्हरेज : आयुष्मान भारत योजनेचा भाग नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंतचे कव्हरेज प्रदान केले जाईल.

योजनांची निवड : जे ज्येष्ठ नागरिक आधीच केंद्र सरकारची आरोग्य योजना (CGHS), माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS) किंवा आयुष्मान केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) यांसारख्या सार्वजनिक आरोग्य विमा योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांना दोनपैकी एक पर्याय उपलब्ध आहे. एक तर त्यांनी सध्याची योजना सुरू ठेवावी किंवा आयुष्मान भारत योजनेची निवड करावी.

खासगी विम्याची पात्रता : खासगी आरोग्य विमा पॉलिसी किंवा कर्मचारी राज्य विमा योजनेद्वारे संरक्षित असलेले ज्येष्ठ नागरिकदेखील AB PM-JAY चा लाभ घेण्यास पात्र आहेत.

Story img Loader