Baal Aadhaar Update : युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तसेच ०-५ आणि ५-१८ वयोगटातील मुलांसाठी आधार नोंदणी आणि अपडेटसाठी स्वतंत्र फॉर्म जारी केले आहेत. यात पाच वर्षांखालील मुलांच्या आधार कार्डला बाल आधार असे म्हणतात. बाल आधार हे निळ्या रंगाचे आधार कार्ड आहे, जे इतर आधार कार्डांपेक्षा वेगळे असते. तुमचे मूल मोठे झाले असल्यास तुम्ही त्याच्या आधार कार्डवर बायोमेट्रिक्स अपडेट कसे करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला कोणते शुल्क द्यावे लागेल का? जाणून घेऊ..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम मुदत

मोफत आधार अपडेट करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. ५ ते ७ वयोगटातील आणि १५ ते १७ वर्ष वयोगटातील मुलांना बायोमेट्रिक, फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन आणि फोटो यांसारखे अपडेट आवश्यक आहेत. या वयोमर्यादापेक्षा जास्त वयोगटातील मुलांच्या बायोमेट्रिक अपटेड्ससाठी १०० रुपये शुल्क लागू आहे.

या डेमोग्राफिक अपडेटमध्ये नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता, मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडीमध्ये बदल करता येऊ शकतील. जर तुम्ही इतर अपडेट बायोमेट्रिक अपडेट्ससह एकाच वेळी कराल तर ते विनामूल्य करता येतात. स्वतंत्रपणे केल्यास ५० रुपये शुल्क लागू आहे.

पाच वर्षांखालील मुलांसाठी बायोमेट्रिक्स घेतले जाणार नाहीत. त्यांच्या यूआयडीवर जनसांख्यिकीय माहिती ही त्यांच्या पालकांच्या यूआयडीशी लिंक चेहऱ्याच्या फोटोवर आधारित घेतली जाते. मुलं पाच आणि पंधरा वर्षांचे होतील तेव्हा त्यांचे बायोमेट्रिक्स अपडेट म्हणजे दहा बोटे, आयरिस स्कॅन आणि चेहऱ्याचा फोटो अपडेट करावा लागेल. ही आवश्यकता मूळ प्रक्रिया आधार कार्डसाठी वापरली जाते.

Read More News : मतदार ओळखपत्राशी मोबाईल नंबर कसा लिंक करायचा? जाणून घ्या ही सोपी पद्धत…

मुलांचे आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

  1. सर्व प्रथम UIDAI वेबसाइटवर जा.
  2. आधार कार्ड नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
  3. मुलाचे नाव, पालकांचा मोबाइल नंबर, पालकांचा ईमेल आयडी, घराचा पत्ता, क्षेत्र आणि राज्य यांसारखे तपशील भरा.
  4. फिक्स अपॉइंटमेंटवर क्लिक करा.
  5. जवळचे नावनोंदणी केंद्र निवडा आणि भेटीची वेळ निश्चित करा.
  6. आवश्यक कागदपत्रांसह या फॉर्मचा संदर्भ क्रमांक, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, नातेसंबंधाचा पुरावा, जन्मतारीख भरा.

मुलाचे वय पाच वर्षे किंवा त्याहून अधिक असल्यास, बायोमेट्रिक तपशील जसे की दहा बोटांचे बायोमेट्रिक्स, चेहऱ्याचा फोटो आणि आयरिक्स स्कॅनदेखील घेतले जातील.

पाच वर्षांखालील मुलांसाठी बायोमेट्रिक्स घेतले जाणार नाहीत, अशी माहिती UIDAI वेबसाइटवर देण्यात आली आहे. त्यांचा यूआयडी त्यांच्या पालकांच्या यूआयडीशी लिंक जनसांख्यिकीय माहिती आणि चेहऱ्यावरील फोटोंच्या आधारे केला जाईल.

ही मुले ५ आणि १५ वर्षांची झाल्यावर त्यांच्या दहा बोटांचे ठसे, आयरिस आणि चेहऱ्याचे छायाचित्र यांचे बायोमेट्रिक्स अपडेट करावे लागतील. सध्या बाल आधार अभियान राबवून देशभरातील मुलांचे बाल आधार तयार केले जात आहेत. या आधार कार्डच्या माध्यमातून खातेदार मुलांना आणि त्यांच्या पालकांना अनेक सुविधांचा लाभ दिला जातो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baal aadhaar is there a fee to updating aadhaar biometric details of children sjr