Bank Accounts Types : आजकाल जवळपास सर्वांचेच बँकेत खाते असतात. लोकांचा बँकेवर अधिक विश्वास असतो. त्यामुळे लोक कॅश स्वरुपात घरी पैसे ठेवण्याऐवजी किंवा कॅश स्वरुपात पैसे बाळगण्याऐवजी बँकेत पैसे ठेवण्याला प्राधान्य देतात. कारण बँकेत पैसे सुरक्षित असतात तसेच बँकेत पैसे डिपॉझिट केले तर त्यावर चांगले व्याजही मिळते. असं असलं तरी बँकेत वेगवेगळ्या प्रकारची खाती असतात. पण याबाबत अनेकांना कल्पना नसते. बँकेत खाते उघडताना कोणते उघडायचे? याबाबत अनेकांना संभ्रम असतो. त्यामुळे आपण आज बँकेत किती प्रकारचे खाते असतात? याविषयी माहिती जाणून घेऊयात…

बँकेच्या खात्यांचे प्रकार कोणते?

चालू खाते (करंट अकाउंट Current Account)

चालू खाते हे प्रामुख्याने व्यवसाय करणारे लोक किंवा व्यापारी किंवा उद्योजकांसाठी वापरले जाणारे बँक खाते आहे. हे खाते बहुतेक संस्था, सोसायट्या, ट्रस्ट, व्यावसायिक, क्लब वापरतात. व्यवसाय आणि व्यावसायिकांना मोठ्या संख्येने दररोज व्यवहार करावे लागतात यासाठी हे खाते वापरले जाते.

Four 4 surprising habits would never do
Four habits : तुम्हीसुद्धा काम करताना मांडी घालून बसता का? आरामदायक वाटणारी स्थिती या आरोग्य समस्यांना देते आमंत्रण; वाचा डॉक्टरांचा सल्ला
mukhyamantri vayoshri yojana
‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी पात्रता काय? अर्ज करण्यासाठी कोणती…
What is a cancelled cheque
रद्द केलेला चेक म्हणजे काय? हा चेक जपून ठेवणे गरजेचे आहे का? घ्या जाणून…
Improved Energy Levels doctor suggest some hacks
Improved Energy Levels : ऊर्जा, तणाव, झोप ‘या’ गोष्टींवर नियंत्रण कसं ठेवाल? फक्त हे तीन उपाय करा; समजून घ्या डॉक्टरांचा सल्ला…
How to find computers IP address
संगणकाचा IP Address कसा शोधायचा? जाणून घ्या एका क्लिकवर..
amla and dates as powerful alternatives to beetroots and pomegranates for anemia treatment
तुम्हाला ॲनिमिया आहे अन् बीटरुट व डाळिंब खायला आवडत नाही? मग तज्ज्ञांनी सांगितलेली ‘ही’ दोन फळे खा
Ever Wondered Why Books Are Usually In Rectangular Shape? Here’s Why general knowledge
पुस्तकांचा आकार आयताकृतीच का असतो? तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर लगेच जाणून घ्या
cravings can indicate hidden health issues and nutritional deficiencies
Nutritional Deficiencies : तुम्हाला सतत चॉकलेट किंवा चिप्स खाण्याची इच्छा होते? शरीरात ‘या’ पौष्टिक घटकांची असू शकते कमतरता; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात

हेही वाचा : सीआयडी अर्थात गुन्हे अन्वेषण विभाग काय आहे? या विभागाचे मुख्य काम कोणते?

बचत खाते (सेव्हिंग अकाऊंट Saving Account)

बचत खाते हे पैशांची बचत करण्यासाठी म्हणजेच बँकेत पैसे सेव्ह करण्यासाठी हे खाते वापरले जाते. यामध्ये कोणतीही व्यक्ती पैसे बँकेच्या खात्यात जमा केल्यानंतर त्या पैशावर बँकेने दिलेल्या व्याजाचा फायदा घेऊ शकतो. तसेच बचत खाते हे कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक व्यवहारांसाठी उघडलं जातं. मात्र, या बचत खात्यावरून महिन्याला व्यवहारांची मर्यादा असते.

पगार खाते (सॅलरी अकाउंट Salary Account )

तुम्ही जर कॉर्पोरेट क्षेत्रात किंवा सरकारी नोकरी करत असताल तर तुम्हाला सॅलरी अकाउंट (पगार खाते) उघडण्याचं सांगितलं जातं. या सॅलरी खातेधारकांना अनेक फायदे देखील मिळत असतात. खरं तर हे एक प्रकारचे बचत खाते असते. यामध्ये नेटबँकिग, क्रेडिट कार्ड, चेकबुक, एटीएमह आदी सुविधा मिळतात. बचत खात्यासारख्याच या खातेदारांना बँका सोयी-सुविधा देतात. मात्र, तरी सॅलरी अकाऊंट हे बचत खात्यापेक्षा थोडे वेगळे ठरते. सॅलरी अकाऊंट हे झिरो बॅलन्स खाते असते. मग तुम्ही तीन महिन्यांपर्यंत खात्यात एक रुपयाही नाही ठेवला तरी तुम्हाला बँक शुल्क आकारत नाही. मात्र, बचत खात्यात एक ठराविक रक्कम खात्यात ठेवणं आवश्यक असतं.

मुदत ठेव खाते (फिक्स्ड डिपॉझिट Fixed Deposit)

मुदत ठेव खाते (FD) तुम्हाला एका ठराविक कालावधीसाठी जमा केलेल्या एकरकमी रकमेवर जास्त व्याजदर मिळवून देते. तुम्ही ठेवलेल्या ठेवींच्या कालावधीवर निश्चित व्याज दर मिळवतो. यामध्ये तुम्हाला तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट केलेल्या रकमेवर खात्रीशीर परतावा मिळतो. यालाच सुरक्षित गुंतवणूक असंही म्हटलं जातं.

आवर्ती ठेव खाते (Recurring Deposit Account)

आवर्ती ठेव खाते हे तुम्हाला एक ठराविक रक्कम नियमितपणे गुंतवल्यास तुम्हाला त्यावर व्याज मिळवून देते. यामध्ये नियमित गुंतवणूक निश्चित कालावधीसाठी आवश्यक असतात. यामध्ये निश्चित कालावधीसाठी तुम्ही पैसे ठेवले, मात्र मुदतीच्या आधी तुम्ही जर ते पैसे काढले तर तुम्हाला दंड आकारला जातो. हे खाते ज्या व्यक्ती नियमितपणे बचत करू इच्छितात त्यांच्यासाठी फायद्याचे ठरते.

एनआरआय खाती (NRI Accounts)

एनआरआय खाते हे दुसऱ्या देशात राहणाऱ्या भारतीय लोकांसाठी हे खाते असते. या खात्यामध्ये दोन प्रकारच्या बचत खाती आणि मुदत ठेवींचा समावेश होतो. हे खाते तुम्हाला परकीय चलन ठेवण्याची आणि व्यवहार करण्याची परवानगी देते. यामध्ये अनिवासी रुपयाच्या मुदत ठेवी भारतीय रुपयांमध्ये डिनोमिनेटेड केल्या जातात.