यंदाचं वर्ष बँक आणि नोकरदारांसाठी कमी सुट्ट्यांचे असणार आहे. कारण, या वर्षी अनेक हक्काच्या सुट्ट्या या विकेण्डला म्हणजेच शनिवारी किंवा रविवारी आल्या आहेत. जानेवारी, जून, जुलै, सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये तर एकही अतिरिक्त सुट्टी नाही. एकंदरितच २०२० हे वर्ष  अनेक सुट्ट्यांना मुकावे लागणारे वर्ष ठरणार आहे.

रिझर्व्ह बँकेने डिसेंबर २०१९ अखेरीस वर्ष २०२० मध्ये बँकेचे व्यवहार कोणत्यादिवशी बंद असणार त्याच्या तारखा जाहीर केल्या होत्या. प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी), स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) व महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर) यांच्यासह काही सणांच्यादिवशी शासकीय तसेच खासगी बँकांचे व्यवहार बंद असतील. तर, विविध राज्यांमधील महत्त्वपूर्ण सणांच्या दिवशी देखील तेथील महत्वानुसार सुट्टी असते. जसे की, आसाममध्ये बिहूच्या दिवशी तर केरळात ओनमला बँका उघडणार नाहीत.

  • या दिवशी बँकांना असेल सुट्टी –

 

  • १५ जानेवारी, बुधवार – (पोंगल, दक्षिणेकडील राज्यांसाठी)
  • २६ जानेवारी, रविवार (प्रजासत्ताक दिन )
  • ३० जानेवारी, गुरूवार – (वसंत पंचमी)
  • २१ फेब्रवारी, शुक्रवार – (महाशिवरात्र)
  • १० मार्च, मंगळवार – (होळी)
  • २५ मार्च, बुधवार- (उगादी, मध्यप्रदेश)
  • २ एप्रिल, गुरूवार- (राम नवमी)
  • ६ एप्रिल, सोमवार – (महावीर जयंती)
  • १० एप्रिल, शुक्रवार – (गुड फ्रायडे)
  • १४ एप्रिल, मंगळवार – (डॉ.आंबेडकर जयंती)
  • १ मे, शुक्रवार – (महाराष्ट्र दिन, कामगार दिवस)
  • ७ मे, गुरूवार – (बुद्ध पोर्णिमा)
  • ३१ जुलै शुक्रवार -(बकरी ईद)
  • ३ ऑगस्ट, सोमवार – (रक्षाबंधन)
  • ११ ऑगस्ट, मंगळवार – (जन्माष्टमी)
  • १५, शनिवार ऑगस्ट- (स्वातंत्र्य दिन)
  • ३० ऑगस्ट, रविवार – (मोहरम)
  • २ ऑक्टोबर, शुक्रवार – (महात्मा गांधी जयंती)
  • २६ ऑक्टोबर, मंगळवार – (विजयादशमी)
  • ३० ऑक्टोबर, शुक्रवार – (ईद ए मिलाद)
  • १४ नोव्हेंबर, शनिवार – (दिवाळी)
  • १६ नोव्हेंबर, सोमवार – (भाऊबीज)
  • ३० नोव्हेंबर सोमवार – (गुरूनानक जयंती)
  • २५ डिसेंबर, शुक्रवार – (ख्रिसमस)

Story img Loader