जगातील सर्वात सुंदर आणि महागड्या ठिकाणी एकदातरी भेट द्यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण विविध देशातील हॉटेल्स चार्ज आणि इतर गोष्टी पाहून आपण अनेकदा जाणे टाळतो. अशावेळी पण काहीतर स्वस्त, चांगल्या ठिकाणांचा विचार करतो. यात काही हॉटेल्सचा चार्ज हा इतका महाग असतो की जो अनेकांना परवडणारा नसतो. पण जगात असे काही देश आहेत जेथील हॉटेल्समध्ये एक रात्र राहण्यासाठी ग्राहकांकडून हजारोंचा चार्ज घेतात. नुकताच वर्ल्ड ऑफ स्टॅटिक्सचा एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये जगातील सर्वात महागड्या देशांबद्दल माहिती देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेकांना वाटते की, जगातील सर्वात महागडे देश अमेरिका किंवा ब्रिटन असतील, पण तुमचा अंदाज हा अहवाल चुकीचा सिद्ध करत आहे. कारण अहवालानुसार, जगातील सर्वात महागडा देश बर्म्युडा आहे. यानंतर कोणत्या देशाचा क्रमांक लागतो आणि भारत कितव्या स्थानी आहे जाणून घेऊ…

बर्म्युडा आणि स्वित्झर्लंड हे जगातील सर्वात महागडे देश आहेत, असा दावा वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या अहवालात करण्यात आला आहे. १४० देशांच्या या अहवालानुसार, बर्म्युडामध्ये राहण्यासाठी खूप जास्त किंमत मोजावी लागते. यानंतर स्वितझर्लंडचा नंबर लागतो. सर्वात महाग देशांच्य यादीत स्वित्झर्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंड, युके, जपान आणि रशियाच्या तुलनेत अमेरिकेत राहणे खूपच स्वस्त आहे.

पण बर्म्युडा हा देश इतका महाग का आहे आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. यामागे महागाई फक्त एकाच कारण आहे असे सांगणे चुकीचे ठरेल, अनेक लहान- लहान कारणांमुळे हा देश सर्वात महागडा देश म्हणून गणला जात आहे, त्यामुळे आपण त्या कारणांबद्ल जाणून घेऊ….

बर्म्युडा हा सर्वात महागडा देश का आहे?

मुळात बर्म्युडा हे उत्तर अटलांटिक महासागरात स्थित एक बेट आहे. हा ब्रिटनचा ओव्हरसीज टेरिटरी आहे, त्याचे सौंदर्य आणि सागरी वातावरण पर्यटकांना नेहमी आकर्षित करते. पण याठिकाणी शेती होत नाही आणि जीवनावश्यक वस्तू इतर देशांमधून आयात केल्या जातात. बहुतेक वस्तू यूएसमधून आयात केल्या जातात. त्यामुळे वाहतूक खर्च. कस्टम ड्युटी आणि मजुरी यामुळे सर्व वस्तू इथे महाग मिळतात.

जागतिक बँकेच्या अहवालानुसार, बर्म्युडा, स्वित्झर्लंड, केमन आयलंड, बहामा, आइसलँड, सिंगापूर, बार्बाडोस, नॉर्वे, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया हे जगातील १० सर्वात महागडे देश आहेत. तर पाकिस्तान जगातील सर्वात स्वस्त देशांमध्ये गणला जातो. पाकिस्तान १४०व्या क्रमांकावर तर या यादीत भारत १३८ क्रमांकावर आहे. पण ही दरवर्षी बदलते.

हॉटेल्समध्ये राहण्यासाठी एका रात्रीसाठी मोजावे लागतात २५ हजार रुपये

बर्म्युडामध्ये राहणाऱ्या लोकांना इतर देशांच्या तुलनेत अनेक पट पैसा खर्च करावा लागतो. येथे राहण्यासाठी, जेवणासाठी, विमा आणि इतर खर्चांसाठी इतर देशांच्या तुलनेत अधिक खर्च येतो. अनेक गोष्टींवर विक्रीकर आकारला जात असल्याने पर्यटकांना येथे राहणे आणि खरेदी करणे खूप महाग आहे. यासोबत बर्म्युडामधील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि बार देखील खूप महाग आहेत. येथील हॉटेल्समध्ये एक रात्र राहण्यासाठी पर्यटकांना सरासरी २५ हजार रुपये द्यावे लागतात. मजेशीर गोष्ट म्हणजे, बर्म्युडामध्ये राहणाऱ्या लोकांना इतर देशांच्या तुलनेत पगारही जास्त मिळतो. पण येथील लोकांच्या उत्पन्न आणि पगारावरही महागाईचा परिणाम दिसून येतो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barmuda is the most expensive country around the world said world of statics report sjr
Show comments