मनुष्य असो वा प्राणी प्रत्येकाच्या चालण्यात गुडघे महत्त्वाची भूमिका बजावतात. काही प्राण्यांचे गुडघे माणसांपेक्षा वेगळे असतात. त्यामुळे त्यांच्या चालण्याच्या पद्धतीत बदल दिसून येतो. मानव आणि माकड हे एकमेव असे प्राणी आहेत; ज्यांच्या गुडघ्यांची रचना सारखी असते. पण, पक्ष्यांच्या गुडघ्यांची रचना इतरांपेक्षा खूप वेगळी असते. काही पक्ष्यांचे पाय इतके लहान असतात की, त्यांना गुडघे आहेत की नाही, असा प्रश्न पडतो. तर काही पक्ष्यांचे गुडघे विचित्र आकाराचे असतात.
हेही वाचा- Petrol Vs Diesel Car: पेट्रोलच्या तुलनेत डिझेल कार जास्त मायलेज देते? ‘हे’ आहे यामागील कारण…
प्रो. बेन गॅरोड यांनी पक्षांवर अनेक संशोधन केलं आहे. डिस्कव्हर वाईल्डलाईफसाठी प्रो. बेन गॅरोड यांनी पक्ष्यांच्या संदर्भात अनेक लेखही लिहले आहेत. पक्ष्यांबद्दल अनेक समजुती पसरल्या आहेत. त्यापैकी एक समज म्हणजे पक्ष्यांचे गुडघे मागे वाकलेले असतात; पण हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. या गैरसमजामुळेच पक्ष्यांच्या पायांची रचना आपल्याला विचित्र वाटते. जेव्हा आपण पक्ष्यांचे पाय बघतो. तेव्हा त्यांच्या पायाच्या वाकलेल्या भागालाच आपण त्यांचा गुडघा समजतो. परंतु, पक्ष्यांच्या पायांची रचना ही मानवाच्या पायांच्या रचनेपेक्षा पूर्ण वेगळी आहे.
हेही वाचा- हत्तीची सोंड लांबच का असते? ‘हे’ आहे त्यामागील खरे कारण….
पक्ष्यांचे गुडघे बाहेरून दिसून येत नाहीत. पक्ष्याचे गुडघे हे त्यांच्या पायांत नसून त्यांच्या पंखांत लपलेले असतात. पण, आपण ज्याला पक्ष्याचा गुडघा समजत असतो, तो गुडघा नसून पक्ष्याचा घोटा असतो. पक्ष्याचा घोटाही मानवाच्या घोट्यासारखा मागच्या बाजूला वाकलेला असतो. पक्ष्यांच्या घोट्यापासून पंजापर्यंतचा भाग खूप मोठा असतो. त्यामुळेच त्यांचे पाय इतरांपेक्षा वेगळे वाटतात. पक्षी पंजाच्या साह्याने चालतात. पंजाचा वापर केल्याने पक्ष्यांना चालायलाच नाही, तर पळायलाही खूप मदत होते.