Black Friday 2024 Date and Significance: युनायटेड स्टेटमध्ये ब्लॅक फ्रायडे हा थँक्सगिव्हिंगनंतरचा शुक्रवार असतो, जो वर्षातील सर्वात व्यस्त खरेदी दिवसांपैकी एक आहे.
ब्लॅक फ्रायडेला अधिकृतपणे ख्रिसमस खरेदीची सुरुवात होते. हा कालावधी देशभरात विक्री आणि सवलतींसह सुरू होतो. ही खरेदी-विक्री सोमवार (Cyber Monday)पर्यंत किंवा एका आठवड्यासाठी (Cyber Week)सुरू राहते, जी किरकोळ उद्योगातील वार्षिक विक्रीच्या जवळपास एक पंचमांश (one Fifth) आहे.
Black Friday 2024 Date: २०२४ मध्ये कधी आहे ब्लॅक फ्रायडे?
ब्लॅक फ्रायडे यूएसमध्ये थँक्सगिव्हिंग डेच्या एक दिवस नंतर साजरा केला जातो. थँक्सगिव्हिंग डे सामान्यतः नोव्हेंबरच्या चौथ्या गुरुवारी साजरा केला जातो.
या वर्षी २०२४ मध्ये थँक्सगिव्हिंग गुरुवार, २८ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाईल, म्हणजेच ब्लॅक फ्रायडे २९ नोव्हेंबर, शुक्रवारी सुरू होईल.
किरकोळ विक्रेते विविध उत्पादनांवर लक्षणीय सवलत देतील. डीलच्या शोधात उत्साही खरेदीदारांना आकर्षित करतील.
Black Friday 2024 Origin: या दिवसाला ‘ब्लॅक फ्रायडे’ का म्हणतात?
“ब्लॅक फ्रायडे” या शब्दाची नेमकी उत्पत्ती काही प्रमाणात अस्पष्ट आहे, परंतु युनायटेड स्टेट्समध्ये, विशेषत: फिलाडेल्फियामध्ये २०व्या शतकाच्या मध्यात त्याचा उदय झाला असे मानले जाते.
सुरुवातीला हा शब्द थँक्सगिव्हिंगनंतरच्या दिवशी होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडी आणि गर्दीचे वर्णन करण्यासाठी वापरला जात असे, जेव्हा लोक सणासुदीच्या खरेदीसाठी दुकानांकडे धावत असत.
काळाच्या ओघात, “ब्लॅक फ्रायडे” या शब्दाला नवा अर्थ मिळाला. ब्लॅक फ्रायडे असा दिवस ठरला, जेव्हा व्यापाऱ्यांना तोटा (रेड) सोडून नफा (ब्लॅक) मिळू लागला, म्हणजेच त्यांचे आर्थिक नुकसान नफ्यात बदलले.
हेही वाचा – EPF Pension Schemeसाठी तुम्ही आहात का पात्र? जाणून घ्या काय आहे पात्रता, आर्थिक सुरक्षा आणि करबचत फायदे
काळाच्या ओघात, “ब्लॅक फ्रायडे” या शब्दाला नवा अर्थ मिळाला. ब्लॅक फ्रायडे असा दिवस ठरल जेव्हा व्यापाऱ्यांना तोटा (रेड) सोडून नफा (ब्लॅक) मिळू लागला, म्हणजेच त्यांचे आर्थिक नुकसान नफ्यात बदलले.
याव्यतिरिक्त, काहींना असे वाटते की हे १८६९ मध्ये झालेल्या यूएस सोन्याच्या बाजारातील आर्थिक संकटाशी संबंधित असू शकते.
याव्यतिरिक्त काहींना असे वाटते की, हे १८६९ मध्ये झालेल्या यूएस सोन्याच्या बाजारातील आर्थिक संकटाशी संबंधित असू शकते.
हेही वाचा –NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?
ब्लॅक फ्रायडे 2024 महत्त्व: याचा अर्थ काय आहे?(Black Friday 2024 Significance: What’s the relevance behind this?)
ब्लॅक फ्रायडे आता जागतिक स्तरावर प्रचलित झाला आहे आणि थँक्सगिव्हिंगनंतर खरेदीच्या धावपळीशी संबंधित म्हणून ओळखला जातो. विक्रेत्यांसाठी हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण यामुळे त्यांच्या वार्षिक विक्रीच्या आकडेवारीवर मोठा प्रभाव पडतो.
ग्राहकांना या दिवशी तंत्रज्ञान, कपडे आणि घरगुती वस्तूंसह अनेक वस्तूंवर आकर्षक सूट मिळण्याची संधी मिळते. अलीकडच्या वर्षांत, ब्लॅक फ्रायडे केवळ पारंपरिक दुकानातील खरेदीपुरता मर्यादित न राहता ऑनलाइन खरेदीकडेही वळला आहे.