Super Blue Moon On Narali Pournima 2023: श्रावण महिन्यातील पौर्णिमा उद्या ३० ऑगस्ट २०२३ रोजी असणार आहे. पौर्णिमेचा सुंदर चंद्र उद्या एका वेगळ्याच रूपात आपल्या समोर येणार आहे. खगोलीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, उद्या म्हणजेच बुधवारी ३० ऑगस्टला एक दुर्मिळ सुपर ब्लू मून आकाशात दिसेल. हा वर्षातील सर्वात मोठा आणि तेजस्वी चंद्र असेल. सुपर ब्लू मून ही घटना दशकातून एकदाच घडते.
सुपरमून म्हणजे काय? (What Is Super Moon
जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळच्या बिंदूजवळ असतो तेव्हा चंद्राचा आकार नेहमीपेक्षा अत्यंत मोठा दिसतो. यामुळेच याला सुपरमून किंवा ब्लु मून म्हणतात, याचा ब्लु म्हणजेच निळ्या रंगाशी याचा काहीही संबंध नाही. ब्लू मूनचे दोन प्रकार आहेत – मासिक आणि हंगामी. ३० ऑगस्ट २०२३ चा ब्लू मून हा मासिक ब्लू मून आहे.
ब्लू मून ही दुर्मिळ खगोलीय घटना आहे. Space.com च्या हवाल्याने मिंटने दिलेल्या माहितीनुसार, शेवटचा ब्लू मून ऑगस्ट २०२१ मध्ये दिसला होता. साधारण चंद्राचा टप्पा २९.५ दिवसांचा असतो हे लक्षात घेता, एका वर्षात साधारणपणे १२ चंद्र चक्रे असतात, आणि अंदाजे दर अडीच वर्षांनी, अतिरिक्त १३ वी पौर्णिमा दिसते. याशिवाय ३० ऑगस्ट रोजी शनी आणि चंद्र हे पूर्व क्षितिजावर एकमेकांच्या अगदी जवळ पाहता येतील. या वेळी शनी ग्रह चंद्रापासून केवळ दोन अंश उत्तर बाजूस दिसेल.
दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी चंद्र पृथ्वीपासून जवळ असल्याने आकार व प्रकाशात सात टक्के अधिक मोठा दिसेल. या दिवशी चंद्र पृथ्वीपासून केवळ तीन लाख ५७ हजार किलोमीटर जवळ असेल.
हे ही वाचा<< रक्षाबंधन ३० की ३१ ऑगस्टला? राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त व भावासाठी म्हणायचा ‘हा’ मंत्र लक्षात ठेवा
NASA च्या माहितीनुसार, सुपर ब्लू मून हा उद्यानंतर थेट जानेवारी आणि मार्च २०३७ मध्ये दिसणार आहे. सुपर ब्लू मून दरम्यान महिन्यातून दोनदा पौर्णिमेचा चंद्र दिसून येतो आणि यावेळी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळच्या बिंदूच्या जवळ असतो