Blue Whale at Ganpatipule: रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रात व्हेल माशाचं पिल्लू वाहून आलं होतं. ओहोटी असल्याने हे पिल्लू किनाऱ्यावर आलं आणि मग स्वतःचं शरीर न पेलवल्याने वाळूत रुतून बसल्याची माहिती समोर येत आहे. मस्त्यविभागाकडून त्याला पुन्हा समुद्रात नेण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र ४० तासांनंतर आता ही मोहीम संपुष्टात आली असून देवमाशाच्या बाळाचा दुर्दैवी अंत झाला आहे. पाण्याविना सहसा जगू न शकणारा हा जीव इतके तास आपल्या घरी परतण्याची वाट पाहू शकला यातही नागरिकांचे मोठे योगदान आहे, अनेकांनी दोन दिवसांपासून महाकाय प्राण्यावर बादलीतून पाणी ओतून त्याला थंड ठेवण्यासाठी प्रयत्न केले होते. या घटनेवरून देवमाशाची वैशिष्ट्य विशेषतः ते किती वेळ जमिनीवर राहू शकतात हा प्रश्न अनेकांना पडला आहे. देवमाशाला जमिनीवर राहणे का शक्य होत नाही व गणपतीपुळे येथे अडकलेलं पिल्लू या सगळ्याला अपवाद कसं ठरलं याविषयी आपण जाणून घेऊया..

देवमासा ऑक्सिजन घेण्यासाठी बाहेर न येता समुद्रात किती वेळ राहतो?

देवमाशाचे विविध प्रकार आहेत व सर्वच देवमासे हे महाकाय आहेत. पण त्या सगळ्यांमध्ये ब्लू व्हेल म्हणेजच निळा देवमासा हा पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी असल्याची नोंद आहे. देवमासा समुद्रात २००० मीटर पर्यंत खाली राहतो आणि सुमारे २ तास पूर्णपणे पाण्याखाली राहू शकतात. मानवाच्या तुलनेत हे प्रमाण कित्येक पट अधिक आहे कारण आपण केवळ दोन मिनिटे पाण्याखाली राहू शकतो. त्यांच्या शरीरात ऑक्सिजन साठवणारे प्रथिने, मायोग्लोबिनचे प्रमाण जास्त आहे असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे, पण याविषयी ठोस पुरावे नाहीत.

Shaina NC Arvind Sawant
Shaina NC : अरविंद सावंत यांची जीभ घसरली; अपशब्द वापरल्याने शायना एन. सी. संतापल्या, म्हणाल्या, “महिलेला…”
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
selena gomez jai shree ram request viral video
Selena Gomez Video: सेलेना गोमेझला ‘जय श्रीराम’ म्हणायला सांगितलं; भारतीय चाहत्याचा व्हिडिओ व्हायरल!
Coconuts Are Not Allowed On Planes
Coconuts Are Not Allowed On Planes : विमान प्रवासात नारळ घेऊन जाण्यावर का आहे बंदी? वाचा नियम, तोटे अन् तज्ज्ञांचे मत
Sarad pawar
Sharad Pawar : “साहेब डोळ्यात पाणी आणतील म्हणणाऱ्यांनी काल…”, शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल; सहा महिन्यांपूर्वीच्या टीकेचा समाचार
raj thackeray on amit thackeray
अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणाऱ्या शिंदे गट व ठाकरे गटाला राज ठाकरे म्हणाले…
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Ajit Pawar on Sharad Pawar Mimicry
Sharad Pawar Mimicry : शरद पवारांनी नक्कल केल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मुलाप्रमाणे असलेल्या…”

समुद्रात खोल पाण्यात दोन तास देवमासा राहू शकत असला तरी जमिनीवर त्यांची जगण्याची शक्यता खूपच कमी असते. त्यातही समजा त्यांना शरीर थंड ठेवण्यासाठी एखादा पर्याय उपलब्ध असेल, म्हणजे त्यांच्या अंगावर थंड पाणी ओतण्यात आले, उन्हापासून लांब ठेवले गेले तर ते अधिक काही तास जगू शकतात. अन्यथा उष्णतेमुळे त्यांना जमिनीवर असताना स्वतःचे शरीर सांभाळता येत नाही.

देवमासा जमिनीवर का राहू शकत नाही?

देवमासा जमिनीवर का राहू शकत नाही याविषयी बीडीएमएलआरचे अधिकारी डॅन जार्विस यांनी CNN ला सांगितले होते की, देवमासा जमीनीवर फक्त सहा तास जगू शकतो, कारण पाण्याच्या बाहेर असताना त्यांना स्वतःचे वजन पेलवत नाही. पाण्यात हे महाकाय मासे मूलतः वजनही असतात त्यामुळे त्यांच्या हाडांना/स्नायूंना त्यांचे वजन उचलून धरण्याची सवयच नसते. पाण्याबाहेर आल्यावर त्यांना हे वजन झेपत नाही. त्यांच्या स्वतःच्या वजनामुळे त्यांच्या शरीरावर भार येऊन रक्ताभिसरण बंद होऊ शकते आणि शरीरात विषारी द्रव्ये तयार होतात जी घातक ठरू शकतात, परिणामी त्यांचा मृत्यू होऊ शकतो.

देवमाशाचे वजन किती?

आपण आतापर्यंत देवमाशाच्या वजनाविषयी वाचलं पण मुळात देवमाशाचं वजन किती असू शकतं हे तुम्हाला माहितेय का? देवमाशाचे सरासरी वजन २ लाख ते ३ लाख पौंड (९०,००० ते १,३६,००० किलोग्रॅम) असू शकते काहींचे वजन ४४१,००० पौंड (२ लाख किलोग्रॅम) सुद्धा असू शकते. तुलनेने सांगायचे झाल्यास, प्रौढ आफ्रिकन हत्तीचे वजन ६ टनांपर्यंत असते, त्यामुळे एका निळ्या देवमाशाचे वजन हे ३० किंवा अधिक हत्ती इतके असू शकते.

देवमाशाचे पिल्लू जगातील सर्वात मोठे नवजात बाळ

दरम्यान, गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावर अडकलेला देवमासा हा एक ते दीड वर्षांचा असल्याचे सांगितले जात होते. लहान वयाच्या देवमाशांविषयी सुद्धा अभ्यासक सांगतात की. ब्लू व्हेलचे बाळ हे पृथ्वीवरील सर्वात मोठे व जन्माच्या वेळी ते पूर्ण वाढ झालेल्या प्राण्यांसारखे दिसणारे एकमेव आहे. हे बाळ सुमारे ४ हजार किलो वजनाचे असू शकते व त्यांची लांबी २६ फूट (८ मीटर) असू शकतात. ते दररोज २०० पौंड (९० किलो) वाढवतात.

Story img Loader