Book Tatkal Railway Tickets Online : आपात्कालीन परिस्थितीत रेल्वेची तिकीट हवी असल्यास ती सहज मिळत नाही. त्यासाठी खूप धडपड होते. अशावेळी तत्काल तिकीट पर्यायाचा खूप फायदा होतो. तत्काल तिकीट तुम्हाला प्रवासाच्या तारखेच्या एक दिवस आधी हव्या असलेल्या ट्रेनमध्ये सीट बुक करू देते.
प्रवासाच्या एक दिवसाआधी तत्काल तिकिटाची प्रक्रिया सुरू होते. थर्ड एसी (3AC) साठी तिकीट बुकिंग सकाळी १० वाजता, तर स्लिपर क्लास तिकीट बुकिंग सकाळी ११ वाजता सुरू होते. तत्काळ कोटा असलेल्या ट्रेनमध्ये एसी आणि नॉन एसीच्या फक्त काही जागा आरक्षित असतात, त्याचबरोबर केवळ एक तासासाठी ही तिकीट बुकिंग सुरू असते आणि ती प्रति पीएनआर चार जागांपर्यंत मर्यादित असते.
(अबब.. चक्क ९ लाखांचे शौचालय! काय आहे यात खास? जाणून घ्या)
तत्काल तिकीट बुक करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तत्काल तिकीट रद्द करू शकता, मात्र त्याचा परतावा तुम्हाला मिळणार नाही. तत्काळ तिकीट बुक करण्याचे काही मार्ग पुढील प्रमाणे आहेत.
१) आयआरसीटीसी
तुम्ही आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तिकीट बुक करू शकता. तुमच्याकडे खाते नसल्यास, आयआरसीटीसी होम पेजवरून सेवेसाठी साइन अप केल्याचे सुनिश्चित करा.
- साइन अप केल्यावर ‘प्लान माय जर्नी’ पेजवर क्लिक करा आणि ‘फ्रॉम स्टेशन’ आणि ‘टू स्टेशन’ हे पर्याय भरा.
- आता ‘जर्नी डेट’ निवडा आणि तिकिटाला ‘ई तिकीट’ म्हणून निवडा. आता ‘सबमिट’ बटनवर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला तुमच्या ठिकाणावरून निजोजित ठिकाणी जाणाऱ्या ट्रेन्सची यादी दाखलवली जाईल.
- ट्रेन लिस्टवर तुम्हाला ‘सिलेक्ट कोटा’ हा पर्याय दिसून येईल. येथे ‘तत्काल’ निवडा आणि संकतेस्थळ तुम्हाला तत्काल कोटा असलेल्या ट्रेन्स दाखवेल.
- तुम्हला ज्या ट्रेनने प्रवास करायचे आहे तिला शोधा आणि तुम्हाला किती सीट्स उपलब्ध आहेत हे दिसून येईल. तत्काल तिकीट उपलब्ध असल्यास ‘बूक नाऊ’ बटनवर क्लिक करा.
- आता नवीन विंडो दिसेल ज्यामध्ये तुम्हाला प्रवाशांची माहिती भरण्यास सांगितले जाईल. जसे, नाव, वय, कोणती बर्थ हवी आहे आणि इतर पर्याय. ट्रेन चार्ट तयार झाल्यावर आपोआप क्लास अपग्रेड करण्यासाठी तुम्ही ‘कन्सिडर फॉर ऑटो अपग्रेडेशनवर’ क्लिक करू शकता.
- सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर पेजमध्ये खाली असलेले केस सेन्सिटिव्ह कॅपचा एन्टर करा आणि ज्या संपर्क क्रमांकावर ट्रेनबद्दल माहिती मिळवायची आहे, तो क्रमांक भरा.
- आता तुमच्या पसंतीच्या पेमेंट पर्यायांमधून पेमेंट करा.
२) मेक माय ट्रिपवर असे बुक करा तिकीट
मेक माय ट्रिप ही काही थर्ड पार्टी सेवांपैकी एक आहे जिने आयआरसीटीसीसोबत भागीदारी केली आहे आणि वापकर्त्यांना तत्काळ तिकिटे बूक करू देते. तरी तिकीट बूक करण्यासाठी तुम्हाला आयआरसीटीसी खात्याची आवश्यकता असेल, त्यामुळे तुम्ही वेबसाइटवर साइन अप केले असल्याची खात्री करा आणि तुमचे खाते नाव पासवर्ड लक्षात ठेवा. मेक माय ट्रिपवरून तत्काल तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला मेक माय ट्रिपच्या रेल्वे पेजवरून आयआरसीटीसीच्या खात्यामध्ये लॉग इन करावे लागेल.
(Airtel युजर्स Disney + Hotstar सब्सक्रिप्शन असे मिळवा मोफत)
- लॉगिन केल्यानंतर निघण्याचे ठिकाण आणि पोहोचण्याचे ठिकाण प्रवासाच्या तारखेसह निवडा.
- आता कोटा टॅबमध्ये ‘तत्काल निवडा’ आणि ट्रेन्स शोधा. तुम्हाला हवी असलेली ट्रेन सापडल्यानंतर ‘बूक नाऊ’ बटनवर क्लिक करा.
- दुसऱ्या पेजवर प्रवाशाचे नाव, वय, आणि बरेच काही प्रवासी तपशील भरण्यास सांगितले जातील. ही माहिती दिल्यावर तुमच्या पसंतीची पेमेंट पद्धत निवडा आणि तिकिटाचे पैसे द्या.
ही प्रक्रिया गोआयबिबो, इक्सिगो, पेटीएम आणि इतर थर्ड पार्टी संकेतस्थळावर कमी अधिक प्रमाणात सारखीच आहे.