Rice : भात हे आपल्या देशातील जवळपास ७० ते ८० टक्के लोकांच्या जेवणातील अविभाज्य घटक आहे. तांदूळाचे विविध प्रकारही प्रचलित आहेत. बासमती, आंबेमोहोर, कृष्णसाळ, कोलम, झिनी, इंद्रायणी, दूधमलई असे विविध प्रकारचे तांदूळ प्रचलित आहेत. दक्षिण भारतातला उकडा तांदूळही प्रसिद्ध आहे. यांपासून इडली, डोसे, अप्पम आदी पदार्थही तयार केले जातात. दरम्यान तांदूळांमध्ये ब्राऊन राईस हा प्रकारही प्रचलित आहे. पांढरा तांदूळ चांगला की ब्राऊन राईस? हे आपण जाणून घेऊ.

पांढरा तांदूळ आणि ब्राऊन राईस यांतील फरक काय?

पांढरा तांदूळ आणि ब्राऊन राईस यांमध्ये फक्त रंग वेगळा असतो असं नाही. तर पोषक तत्त्वंही वेगळी आहेत. ब्राऊन राइसमध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे व खनिजे भरपूर प्रमाणात असतात. ब्राऊन राइस रक्तातील साखरेची मात्रा नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतो असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. पांढरा तांदूळ प्रक्रिया केलेला असतो. यातून ब्रान वेगळं केलं जातं. तसंच ब्राऊन राईस शिजायला वेळ लागतो त्या तुलनेत पांढरा तांदूळ लवकर शिजतो.

ब्राऊन राईस आणि पांढरा तांदूळ यांची तुलना

ब्राऊन राऊस आणि पांढरा तांदूळ दोन्हीही आरोग्यदायी डाएटचा भाग आहेत.

पांढऱ्या तांदूळाच्या तुलनेत ब्राऊन राईसमध्ये पोषकतत्वे जास्त असतात. त्यामुळे आहार तज्ज्ञ हा ब्राऊन राईस खायचा सल्ला देतात.

ब्राऊन राइसमध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे व खनिजे भरपूर प्रमाणात असतात. ब्राऊन राइस रक्तातील साखरेची मात्रा नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याशिवाय या तांदळामुळे हृदयविकाराचा धोका कमी करण्यास आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

ब्राऊन राईस पांढऱ्या तांदूळाच्या भाताच्या तुलनेत पचायला जड असतो. तर भात पचायला हलका असतो. http://www.health.harvard.edu या वेबसाईटने हे वृत्त दिलं आहे.

ब्राऊन राईस आणि पांढरा तांदूळ यामध्ये असलेल्या कॅलरीजचं प्रमाण एकसारखं असतं.

दोन्ही तांदळांमध्ये पोषक घटक किती असतात?

पांढऱ्या तांदळात जीवनसत्त्वं बी आणि लोहासारखे आवश्यक पोषक घटक असतात; ज्यामुळे आपल्या शरीरास सहज ऊर्जा मिळते. ब्राऊन राइसमध्ये फायबर आणि काही पोषक घटक असतात हे घटक पांढऱ्या तांदळामध्ये दिसत नाहीत. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी-जास्त होताना दिसून येते. मात्र ब्राऊन राईसमुळे साखर नियंत्रणात राहते असंही आहार तज्ज्ञ सांगतात.

दिवसभरात किती भात खावा?

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, दररोज २०० ते ३०० ग्रॅम भात खाण्याचा सल्ला दिला जातो. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) म्हणण्यानुसार, आपण दररोज २५०-३०० ग्रॅम भात खाऊ शकतो. अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए) च्या मते, दररोज १०० ते १५० ग्रॅम भात खाणे परिपूर्ण आहे.