एखादे पार्सल घरी आले किंवा मार्केटमधून एखादी नवीन वस्तू घरी आणली की, बॉक्स उघडल्यावर ती सगळ्यात आधी बबल रॅपच्या शीटमध्ये गुंडाळलेली दिसते. मग आपल्यातील बहुतांश जण बबल रॅप बाजूला काढून त्यातील बबल बोटाने फोडण्यास सुरुवात करतात आणि मग आपला आनंद काही गगनात मावत नाही. पण, तुम्हाला माहिती आहे का चेहऱ्यावर आनंद देणाऱ्या या चमत्कारिक पॅकेजिंग मटेरियलचा शोध सर्वप्रथम का लागला? खरं सांगायला गेलं तर सगळ्यात आधी बबल रॅप ‘वॉलपेपर’ म्हणून बनवण्यात आले होते. अयशस्वी वॉलपेपर बनण्यापासून ते अप्रतिम पॅकेजिंग मटेरियल बनण्यापर्यंतच्या बबल रॅपच्या प्रवासाबद्दल आपण या लेखातून सविस्तर जाणून घेऊ…

चुकून लागलेला शोध –

Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
Chandrakant Patil appeal to Pune residents regarding the book festival Pune news
नागपूरचा की पुण्याचा पुस्तक महोत्सव मोठा करायचा हे तुम्ही ठरवा- चंद्रकांत पाटील यांचे पुणेकरांना आवाहन

तुमच्या नाजूक वस्तू गुंडाळण्यासाठी वापरत असलेली बबल रॅप शीट, ज्याने पॅकेजिंग पुरवठ्याच्या जगात क्रांती घडून आली ती प्रत्यक्षात अयशस्वी शोधाची एक कल्पना होती. १९५७ मध्ये इंजिनिअर अल्फ्रेड फील्डिंग आणि त्यांचे व्यावसायिक पार्टनर, मार्क चव्हान्स यांनी हे बबल रॅप वॉलपेपर म्हणून तयार केले होते. तेव्हा हे दोघेही यूएसमधील न्यू जर्सी फील्डिंगच्या गॅरेजमध्ये प्लास्टिकच्या शीटवर काम करत होते. एक नवीन टेक्स्चर वॉल कव्हरिंग (वॉलपेपर) तयार करणे हा त्यांचा उद्देश होता. त्यांनी हीट-सीलिंग मशीनद्वारे प्लास्टिकच्या शॉवरच्या पडद्याचे दोन तुकडे ठेवले आणि बुडबुड्यांची शीट तयार केली. दुर्दैवाने ते हे विकण्यात अयशस्वी झाले. त्यानंतर उत्पादन विकसित करणे सुरू ठेवण्यासाठी त्यांनी या अयशस्वी गोष्टीला ‘बबल रॅप’ या नावाने ब्रँड केलं. दोघांनी १९६० मध्ये सील एअर कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि शोध लावलेल्या सामग्रीच्या वापराचा विचार सुरू केला. शेवटी, पुढील वर्षी पॅकेजिंग मटेरियल म्हणून बबल रॅप वापरण्याचा निर्णय घेतला, तेव्हा बबल रॅप हा सर्वत्र यशस्वी झाला.त्याच वेळी आयबीएम ( IBM) संगणक उपकरणांचे संरक्षण करण्याचा मार्ग शोधत होता. तेव्हा त्यांना सीलबंद कॉर्पोरेशनच्या बबल रॅपमध्ये तो उपाय दिसून आला आणि ही कल्पना पुढे छोट्या पॅकेजिंग कंपन्यांनी स्वीकारली.

हेही वाचा…“बापरे! मला तर भीती वाटतेय…” मेंदूचा प्रतिसाद; पण छातीत धडधड; जाणून घ्या भीतीमागील गणित

वस्तू पॅक करण्यासाठी बबल रॅप करण्यापूर्वी काय वापरले जायचे?

बबल रॅप्सचा शोध लागण्यापूर्वी, एखाद्या वस्तूचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना जुन्या वर्तमानपत्रात गुंडाळले जायचे. बबल रॅप जसाजसा प्रसिद्ध होऊ लागला, तसतसं उत्पादन लवकरच विविध आकारांमध्ये, विविध उद्योग आणि उपयोगांसाठी बनविले जाऊ लागले. याव्यतिरिक्त, लोकांना त्या हवेने भरलेले बबल पॉपिंग करायलाही आवडू लागले.

पर्यावरणीय प्रभाव –

दुर्दैवाने बबल रॅपवर नकारात्मक पर्यावरणीय छापसुद्धा आहे. बऱ्याचदा बबल रॅप कमी गुणवत्तेच्या प्लास्टिक पॉलिमर फिल्मपासून बनविला जातो, ज्याचा घरी पुनर्वापर केला जाऊ शकत नाही. ही सामग्री पर्यावरणीयदृष्ट्या विषारी मानली जाते. कारण लँडफिल्समध्ये त्याचे विघटन होण्यास शेकडो वर्षे लागतात. पावसामुळे ते समुद्रात वाहून जाऊ शकतात; ज्यामुळे सागरी जीवनासाठी समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे बबल रॅपची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या बबल रॅप शीटचा शक्य तितका वापर करणे हा एकमेव पर्याय शिल्लक आहे. तर अशी आहे बबल रॅपच्या प्रवासाची रंजक गोष्ट…

Story img Loader