लहानपणापासून आपल्या कानावर अशा अनेक गोष्टी पडत असतात, ज्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे साखर खाल्ल्याने मधुमेह होतो. जगभरात मधुमेहाने ग्रस्त असणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वृद्धांबरोबरच आता तरुणांनाही मधुमेहाची लागण होताना दिसते. साखर खाल्ल्याने मधुमेह होतो, अशी अनेकांची धारणा आहे. आता या धारणेत किती तथ्य आहे जाणून घेऊया…
हेही वाचा- बॉक्स ऑफिस कलेक्शन म्हणजे काय? चित्रपटांची कमाई नेमकी कशी मोजली जाते? जाणून घ्या
साखर आज आरोग्याचा सर्वात मोठा शत्रू मानली जाते. आहारतज्ज्ञांपासून डॉक्टरांपर्यंत सर्वजण शक्य तितकी कमी साखर खाण्याचा सल्ला देतात. साखर खाल्ल्यास मधुमेहही होतो असंही म्हटलं जातं. लोकांना वाटते की, साखर हे आरोग्यदायी नाही. याच्या अतिसेवनाने वजन वाढते. दात खराब होतात. मधुमेहामध्ये साखरेची पातळी जास्त असू शकते.
हेही वाचा- ‘हा’ आहे जगातील सर्वात लहान देश; राहतात फक्त २७ लोकं!
साखर आपल्या शरीरासाठी पूर्णपणे हानिकारक आहे असे नाही. साखरेचे जास्त सेवन करण्याचे तोटे आहेत. परंतु, साखरेचे काही आरोग्य आणि त्वचेशी संबंधित फायदेदेखील आहेत. जर तुम्हाला झटपट ऊर्जा हवी असेल तर साखरेपेक्षा दुसरा चांगला पर्याय नाही. ज्या लोकांना कमी रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांना साखरेचे तुकडे बरोबर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय नैराश्य दूर करण्यासाठी साखर खूप उपयुक्त आहे. डिप्रेशनने त्रस्त असलेल्या लोकांनी चॉकलेट सोबत ठेवावे, त्यामुळे त्यांचा मूड सुधारतो, असा सल्लाही अनेकदा दिला जातो.
हेही वाचा- ट्रेनच्या टॉयलेटमधील नॉर्मल आणि इमर्जन्सी फ्लशमध्ये नेमका काय फरक असतो? वापर कसा करायचा? जाणून घ्या
ज्याप्रमाणे साखर खाण्याचे फायदे आहेत, त्याचप्रमाणे जास्त साखर खाण्याचे तोटे आहेत. त्यामुळे साखर खाल्ल्याने लोकांना मधुमेह होईल असा समज निर्माण झाला. अमेरिकन डायबिटीज असोसिएशनने जाहीर केलेल्या अहवालानुसार साखर खाल्ल्याने डायबिटीजचा धोका थेट वाढत नाही. पण, साखरेच्या अतिसेवनामुळे काही समस्या उद्भवतात, ज्यामुळे मधुमेह होऊ शकतो. साखरेत कोणतेच पौष्टिक गुण नसतात. तिच्यात केवळ कॅलरीज असतात. त्यामुळे साखरेच्या अतिसेवनामुळे वजनात वाढ होते आणि वाढलेलं वजन मधुमेहाला आमंत्रण देते.
हेही वाचा- ऐकावं ते नवलंच! या मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून दिला जातो चक्क गांजा? वाचा या अनोख्या प्रथेविषयी
दुसरी गोष्ट म्हणजे मधुमेह हा अनुवंशिकता आणि त्या त्या व्यक्तीच्या जीवनशैलीवर अवलंबून असतो. अति मानसिक ताण, वाढलेलं वजन यामुळेही मधुमेह होण्याचा धोका जास्त आहे. साखरेचा थेट मधुमेहाशी संबंध येत नाही. साखरेमुळे शरीरात इतर समस्या निर्माण होतात, त्या समस्यांमुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो.