आपल्यापैकी अनेकांना प्राणी-पक्षी आवडतात. अनेक लोक प्राणी-पक्षी पाळतात आणि त्यांचे भरपूर लाड करतात. अनेकदा प्राणी-पक्षी संग्रहालयात भेट देणारे पर्यटक पक्ष्यांना त्यांच्याकडील ब्रेड-बिस्किटे खाऊ घालताना दिसतात. पक्ष्यांना खायला घालणे हा जीवनातील एक साधा आनंद आहे. पण त्यांना कधी, कसे व काय खायला घालावे हे ठरवणे थोडे अवघड असू शकते. कारण- बिस्कीट, ब्रेड असे पदार्थ पक्ष्यांच्या आरोग्यासाठी योग्य आहेत का याचा विचार मात्र कोणीही करीत नाही. म्हणूनच पक्ष्यांना काय खायला घालावे, कधी व कसे खायला घालावे याबाबत माहीत असणे आवश्यक आहे.
तुम्ही बदकांना ब्रेड खायला देऊ शकता का?
सुमारे तीन-चतुर्थांश लोकसंख्या दरवर्षी शिळा ब्रेड कालवे, नद्या, जलाशय व तलावांमध्ये फेकतात. पण, बदकांना कोणता आहार खायला घालावा याबाबत जागरूक असणे महत्त्वाचे आहे.
discover wild life ने दिलेल्या माहितीनुसार, १९८० च्या दशकातील एका अभ्यासात असे दिसून आले आहे, “ब्रेड आहारामुळे बदकांच्या स्नायूंचे प्रमाण कमी होते.”
सध्याचे एकमत असे आहे की, ब्रेडमध्ये धान्य किंवा भाज्या यांसारख्या पर्यायांचे पौष्टिक मूल्य नसते. लहान मुलांनी फेकलेल्या बेकरी उत्पादनांवर अवलंबून असलेले बदक धान्य, भाज्यांसारखे पौष्टिक पदार्थ खात नाही
- canal river trust ने दिलेल्या माहितीनुसार, बदकांना ब्रेड खाऊ घालणे टाळण्यामागे काही कारणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे बदकांसाठी ब्रेड फारसा पौष्टिक नाही. बदकांना निरोगी राहण्यासाठी विविध आहाराची आवश्यकता असते. ब्रेड खाल्यामुळे पौष्टिक पदार्थांचे सेवन कमी होऊन, त्यांचे कुपोषण होऊ शकते.
- पाण्यात फेकलेले ब्रेड बदकांनी खाल्ले नाही तर ओलसर ब्रेडमधील पौष्टिक मुल्य कमी होते. तसेत त्यामुळे पाण्याभोवती अधिक एकपेशीय वनस्पती वाढू शकते, अधिक रोगराई पसरू शकते.
- कालव्यात किंवा नदीत ब्रेड फेकल्याने इतर अनेक पक्षी आकर्षित होऊ शकतात. कारण- पक्षी पिष्टमय पदार्थाच्या शोधात अशाच ठिकाणी येतात. परिणामी पक्ष्यांची जास्त गर्दी होते.
- एकाच ठिकाणी खूप बदके गर्दी झाल्यास त्या ठिकाणी जास्त प्रमाणात पक्ष्यांची विष्ठा तयार होईल; जी दुर्गंधीयुक्त असते. त्यामुळे पृष्ठभाग निसरडा होतो. मग पाण्याची गुणवत्ता कमी होते आणि हानिकारक शेवाळ तयार होऊन, जलमार्गांना अडथळा येऊ शकतो.
पाण्यातील पक्ष्यांसाठी ब्रेड योग्य आहार आहे का?
वाइल्डफॉल अॅण्ड वेटलॅण्ड्स ट्रस्ट (WWT)ने सल्ला दिला आहे,पक्ष्यांनी ब्रेडचे सेवन कमी प्रमाणात करणे आवश्यक आहे. विशेषतः वसंत ऋतू आणि उन्हाळ्यात कमी प्रमाणात ब्रेड खाणे महत्त्वाचे असते. कारणया काळात असंतुलित आहारामुळे पक्ष्यांच्या विकासात समस्या निर्माण होऊ शकतात.”
दुसरीकडे ब्रेड खायला देणे हे काहीही आहार न देण्यापेक्षा चांगले असू शकते. विशेषतः हिवाळ्यात जेव्हा पक्ष्यांना अन्नाची कमतरता जाणवते.
आता प्रश्न असा पडतो की तुम्ही बदकांना काय खायला देऊ शकता?
canal river trust ने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही ब्रेडऐवजी बदकांना मक्याचे दाणे, लेट्युस, गोठलेले वाटाणे, ओट्स, बिया, भात खायला देऊ शकता.
ब्रेडशिवाय कोणते पदार्थ बदकांना खायला घालू नयेत?
canalrivertrusने ब्रेडशिवाय असे काही पदार्थ आहेत; जे तुम्ही बदलकांना खायला देऊ नये. बदकांना जंक फूड किंवा कुरकुरीत पदार्थ खायला घालू नये. तसेच पॉपकॉर्न, कॉर्नफ्लेक्स, लिंबूवर्गीय फळे (संत्री, मोसंबी, लिंबू), कांदा, पालक, अॅव्होकॅडो हे पदार्थ खायला घालू नयेत.