सध्या भारत किंवा अन्य राष्ट्रांमध्ये स्वच्छ हवेची कमतरताच आहे. दिवसेंदिवस प्रदूषित शहरांची संख्या वाढत असताना ‘राहण्यास योग्य’ अशा ठिकाणांची संख्या घटते आहे. पण, पृथ्वीवर असे एक ठिकाण आहे जिथे जगातील सर्वात स्वच्छ, निर्मळ आणि शुद्ध हवा मिळते. जिथे सहसा पर्यटक पोहोचू शकत नाहीत, पण तिथे गेल्यावर आश्चर्य वाटेल अशी शांतता, स्वच्छता आणि निसर्ग पाहायला मिळतो. जाणून घेऊया अशा बेटाविषयी जिथे जगातील सर्वात शुद्ध हवा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा: काकड आरती का करतात माहीत आहे का ? जाणून घ्या गावोगावची सुंदर परंपरा

दरवर्षी प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये वाढ होत आहे. निसर्गरम्य ठिकाणीसुद्धा पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे प्रदूषण होत आहे. शहरांमधील वाढत्या औद्योगिकीकरणाचा हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. परंतु, पृथ्वीवर असे एक बेट आहे, जिथे जगातील सर्वात शुद्ध हवा मिळते. या ठिकाणी मनुष्यवस्ती फारशी नसून, पर्यटकही सहसा पोहचू शकत नाहीत. हे बेट ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया बेटापासून जवळ असून पूर्णतः जंगलाने व्यापलेले आहे. केप ग्रिम असे या बेटाचे नाव असून .”एज ऑफ द वर्ल्ड” म्हणून हा प्रदेश ओळखला जातो. जंगलाने व्यापलेल्या टेकड्या, काळ्या वाळूचे किनारे, प्रवाही हवा आणि स्वच्छता यामुळे हे बेट पृथ्वीवरील सर्वात शुद्ध हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.

हेही वाचा: दोन खांबांवर उभा असलेला ‘हा’ देश माहीत आहे का ? याची लोकसंख्या आहे केवळ २७

केप ग्रिम येथे क्लिफ-टॉप केप ग्रिम बेसलाइन अॅटमॉस्फेरिक पोल्यूशन स्टेशन (CGBAPS) १९७६ मध्ये हवेतील संरचनांचा आणि ओझोनच्या थरांचा अभ्यास करण्यासाठी तयार करण्यात आले. या बेटावर येणारी ३० टक्के हवा ही बेसलाईन आहे म्हणजेच हिंदी महासागर आणि अंटार्क्टिका मधून येणाऱ्या हवेचा, वाऱ्याचा परिणाम येथील हवेवर होत नाही. ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण समुद्र बास सामुद्रधुनीमध्ये हे बेट आहे. येथील हवा शुद्ध राहण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हे बेट लोकसमूहापासून दूर आहे. इथे पोहोचणे सहसा शक्य होत नाही. त्यामुळे मानवी क्रियाकलाप नसल्यामुळे येथील हवा स्वच्छ आहे. तसेच या बेटावर साधारण ताशी १८० किलोमीटर वेगाने वारे वाहत असतात. त्यामुळे येथील हवा अधिक शुद्ध राहते.

केप ग्रिम हे बेट एका हत्याकांडासाठीही ओळखले जाते. १० फेब्रुवारी १८२८ रोजी टास्मानियाच्या उत्तर-पश्चिमेला असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर अन्न गोळा करणाऱ्या आदिवासींच्या एका गटावर व्हॅन डायमेन्स लँड कंपनीच्या (VDLC) चार कामगारांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये बळी गेलेल्यांचे मृतदेह उंच कड्यावरून फेकून देण्यात आले. या हल्ल्यात सुमारे ३० पुरुष मारले गेल्याचे मानले जाते. या बेटावर आदिवासींचे वास्तव्य होते.