एखादी व्यक्ती कोणत्या जातीची आहे हे प्रमाणित करणारा सरकारी दस्त ऐवज म्हणजे जातीचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र. शासकीय सेवेत अथवा महाविद्यालयात राखीव जागांसाठी अर्ज करण्यासाठी अनेकदा जात प्रमाणपत्र द्यावे लागेल. हे प्रमाणपत्र काढण्यासाठी साधारण काय कागदपत्रे लागतील त्याची माहिती आवश्यक अनेकांना नसते.

अनुसूचित, इतर मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय जातींसाठी कागदपत्रांमध्ये थोडाफार फरक पडण्याची शक्यता आहे, पण सर्वसाधारणपणे खालील कागदपत्रे जात प्रमाणपत्रसाठी आवश्यक ठरतात

CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
UGC, recruit professors, Instructions UGC,
आयोगामार्फत प्राध्यापक भरतीस नकार; प्रचलित नियमांनुसारच प्रक्रिया राबवण्याच्या ‘यूजीसी’च्या सूचना
Higher education , skill courses, guidelines UGC,
उच्च शिक्षणात आता कौशल्य अभ्यासक्रमांवर भर; ‘यूजीसी’कडून मार्गदर्शक सूचनांचा मसुदा प्रसिद्ध
MPAC Mantra Intelligence Test and Arithmetic Group B Non Gazetted Services Pre Exam sports news
एमपीएसी मंत्र: बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित; गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा
UPSC Preparation UPSC Preliminary Exam Paper I GS
यूपीएससीची तयारी : यूपीएससी पूर्वपरीक्षा पेपर I (GS)
savitribai phule pune university warns affiliated colleges for not providing naac information
‘नॅक’ची माहिती न दिल्यास प्रवेशांवर निर्बंध; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संलग्न महाविद्यालयांना इशारा
Ahilya Devi Holkar Solapur University distributes defective blazers to player
विद्यापीठ खेळाडूंना सदोष ब्लेझर वाटप; चौकशीच्या मुद्द्यावर वाद

> ओळखीचा पुरावा मतदार ओळखपत्र / पारपत्र (पासपोर्ट) / वाहनचालक दाखला / आर एस बी वाय कार्ड / आधार कार्ड /निमशासकीय ओळखपत्र / पॅन कार्ड

> पत्त्याचा पुरावा मतदार ओळखपत्र / पारपत्र (पासपोर्ट)/ वाहनचालक दाखला / आधार कार्ड / वीज देयक/ पाणीपट्टी पावती / ७/१२ आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती.

> जात प्रमाणपत्रासाठी शपथपत्र (प्रपत्र २)

नक्की वाचा >> नवनीत राणांची खासदारकी जाणार?; जात प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टाकडून रद्द

स्वत: अथवा जवळच्या नातेवाईकांच्या जातीचा पुरावा म्हणून कोणते कागदपत्र ग्राह्य धरले जातात –

१. अर्जदार, अर्जदाराचे वडील अथवा आजोबांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उतारा, अर्जदार अथवा अर्जदाराच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला.

२. अर्जदार, अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकाचा जन्म नोंदवहीचा उतारा.

३. अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकाच्या जात/समाजाचा उल्लेख असणारा शासकीय सेवा नोंदवहीचा उतारा.

४. सामाजिक न्याय विभागाने जारी केलेले जात प्रमाणित करणारे कागदपत्र.

५. अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकासाठी छाननी समितीने जारी केलेले वैधता प्रमाणपत्र.

६. ग्रामपंचायत नोंद अथवा महसूल नोंदीची प्रत.

७. जात अधिसूचित होण्याच्या तारखेपूर्वीच्या निवासाचे साधारण ठिकाण आणि जातीसंदर्भातील कागदोपत्री पुरावे.

८. सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले अन्य संबंधित कागदोपत्री पुरावे.

नक्की वाचा >> समजून घ्या : करोना विषाणूची उत्पत्ती नक्की कुठे झाली?

> लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे.

> वडिलांच्या जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यास नातेवाईकाचे जात प्रमाणपत्र आणि नातेवाईकासोबतच्या नात्याचा तपशील देणारे वंशावळीचे शपथपत्र (प्रपत्र३)

> विवाहित महिला असल्यास खाली दोन कागदपत्रे आवश्यक असतात :

१. विवाहापूर्वीच्या जातीचा पुरावा.

२. विवाहाचा पुरावा-विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि राजपत्रातील नाव बदलासंदर्भातील अधिसूचना. अर्जदाराने अन्य राज्य/जिल्ह्यमधून स्थलांतर केले असल्यास त्या राज्य/जिल्ह्यतील अर्जदाराच्या वडिलांच्या नावे जारी केलेले जात प्रमाणपत्र.

नक्की वाचा >> समजून घ्या : Long Covid म्हणजे काय आणि त्यावर कशी मात करता येते?

जात प्रमाणपत्र कुठे कामी येतं?

> सरकारी नोकरीत आरक्षणासाठी
> शाळा महाविद्यालयात प्रवेश शुल्कामध्ये संपूर्ण किंवा ठराविक सूट मिळवण्यासाठी
> शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागांमधून प्रवेश मिळवण्यासाठी
> काही सरकारी नोकऱ्यांमध्ये वयोमर्यादेत अतिरिक्त वयाची सूट मिळवण्यासाठी
> शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी
> स्पर्धा परिक्षांमध्ये वयासंदर्भातील सूट मिळवण्यासाठी

Story img Loader