आपल्या सर्वानाच फिरण्याची खूप आवड असते. सुट्टीमध्ये नवनवीन ठिकाणे पाहणे ही अनेकांची आवड असतेच. उन्हाळी सुट्टी म्हणजे फिरण्याचीच सुट्टी असते. मात्र प्रत्येकाचे फिरण्याबाबतीत एक असे स्वप्न असते जे त्याला पूर्ण करायचे असतेच. ते स्वप्न म्हणजे परदेशात फिरायला जायचे. मात्र परदेशात फिरायला जाण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्याकडे असणे आवश्यक असते ती म्हणजे पासपोर्ट. पासपोर्टला पारपत्र असेही म्हणतात.

सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा पासपोर्ट काढू शकता. मात्र तुम्हाला लुबाडण्यासाठी , आर्थिक फसवणूक करण्यासाठी अशा अनेक बनावट वेबसाईट असतात जिथे तुम्हाला पासपोर्ट काढून दिला जातो. आता याच बनावट वेबसाइटविरुद्ध भारत सरकारने नागरिकांना सावध केले आहे. या बनावट वेबसाईट्सद्वारे लोकांची वैयक्तिक माहिती गोळा केली जात आहे ज्याचा वापर स्पॅम आणि हॅकिंगसाठी वापरली जाऊ शकतो. सरकारने एकूण सहा वेबसाईट्सना इशारा दिला आहे. या सहा वेबसाईट्स पासपोर्ट काढून देण्याचे दावे करतात. आता आपण त्या सहा बनावट वेबसाईट्स कोणत्या आहेत त्याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊयात.

Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
watermelon Raigad demand Dubai business export
रायगडच्या कलिंगडांना दुबईत मागणी
shani snan mahakumbh ticket price hike
विदेश दौऱ्यापेक्षा प्रयागराजचा विमान प्रवास महागला, तिकीटे ५०,००० पार; कारण काय? सरकार काय करणार?
Delhi assembly elections, Delhi assembly election news
गुगल मॅपनं दिला दगा, फ्रान्सच्या सायकलस्वारांना नेपाळ ऐवजी पोहोचवले…
country where divorce is illegal
‘या’ देशात घटस्फोट घेणे आहे बेकायदा; कारण काय? येथील लोक वेगळे होण्यासाठी काय करतात?
rto measures for safe travel on the Mumbai-Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी उपायांची जंत्री
Donald Trump Ends Birth right Citizenship News
US Birthright Citizenship : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; न्यायालयाने रोखला ‘हा’ ऐतिहासिक निर्णय

हेही वाचा : Tech Layoff मध्ये TCS च्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नोकरी तर जाणार नाहीच पण…

http://www.indiapassport.org

ही साईट अधिकृत वेबसाईट्स सारखी दिसते मात्र ही एक बनावट वेबसाईट आहे. आपण या साईटवर भरलेली तुमच्या वैयक्तिक माहितीचा काही गैरवापर झाल्यास त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात. या क्षणाला हे डोमेन निलंबित करण्यात आले आहे. परंतु तुम्ही सावधान राहणे आवश्यक आहे.

http://www.online-passportindia.com

ही देखील एक बनावट वेबसाईट आहे. ही बनावट वेबसाईट पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापासून ते मतदार कार्ड तयार करण्यापर्यंत सर गोष्टी तयार करण्याचा दावा करते.

http://www.passportindiaportal.in

ही वेबसाईट अधिकृत वेबसाईट नाही आहे. ही वेबसाईट केवळ स्कॅम करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. पासपोर्ट तयार करण्यासाठी अर्ज करा आणि पासपोर्टचा फॉर्म असे काही पर्याय या साईटवर देण्यात आले आहेत.

हेही वाचा : मार्क झुकरबर्गचा Facebook वापरकर्त्यांना धक्का; आता ट्विटर प्रमाणेच Blue Tick साठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

http://www.passport-india.in

ही सुद्धा एक बनावट वेबसाईट असून भारतीय पासपोर्ट प्राधिकरणाने या वेबसाइटबाबत नागरिकांना सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. या साईटला तुम्ही भेट देत असला तर वेळीच ते बंद केले पाहिजे.

http://www.passport-seva.in

passport-seva.in नावाची कोणतीही अधिकृत वेबसाईट अस्तित्वात नाही आहे. सरकारने या वेबसाईटवर भेट न देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

http://www.applypassport.org

.org डोमेन असल्याने त्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. ही एक देखील बनावट वेबसाईट आहे. त्यामुळे त्यावर कोणतीही माहिती अपलोड करू नका.

तुम्हाला जर पासपोर्ट काढायचा असेल तर तर सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनच काढावा. http://www.passportindia.gov.in ही सरकारची अधिकृत वेबसाईट आहे . या वेबसाइटवरूनच तुम्ही तुमचा पासपोर्ट काढणे आवश्यक आहे.

Story img Loader