जॅकोबिन कोकीळ किंवा चातक हा भारतातील एक भाग्यवान पक्षी मानला जातो. हा असा पक्षी आहे जो फक्त पावसाचे पाणी पितो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय हा पक्षी मान्सूनच्या आगमनाचीही माहिती देतो. चातक केवळ पावसाचा पहिला थेंब पितो असे भारतीय साहित्यात लिहिण्यात आले आहे.
भारतात हा पक्षी प्रामुख्याने उत्तराखंडमध्ये आढळतो, परंतु बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील सरैयमान पक्षी अभयारण्यासह वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातही तो दिसला आहे. चातक पक्ष्याबाबत एक खासियत जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल.
सरायमान पक्षी अभयारण्याच्या वन कर्मचारी सांगण्यानुसार, जॅकोबिन कोकीळ म्हणजेच चातक वर्षातून एकदाच पाणी पितात. एकदा पाणी प्यायल्यानंतर काहीही झाले तरी ते पुन्हा पाणी पीत नाही. चातक पक्ष्याला खूप तहान लागली आणि अगदी स्वच्छ पाण्याच्या तलावात सोडले तरी ते पाणी पीत नाही, असे सांगितले जाते. काहीही होवो ते पाणी पिण्यासाठी चोच उघडणार नाही. पावसाशिवाय ते इतर कोणत्याही स्त्रोताचे पाणी पीत नाही. मात्र कर्मचारी याचा पुष्टी करत नाहीत.हा पक्षी आकाराने अगदी मैनेएवढा असतो. तर त्याचा रंग काळा-पांढरा असून माथ्यावर हिरवट तुरा असतो.
भारतात चातकच्या दोन प्रजाती आहेत. एक दक्षिणेकडे असते आणि दुसरी अरबी समुद्र ओलांडून आफ्रिकेतून उत्तर आणि मध्य भारतात प्रवास करुन येतात. चातक पक्ष्याला हिंदीमध्ये पापिहा असेही म्हणतात. वनकर्मचाऱ्यांच्या मते, याचे शास्त्रीय नाव क्लॅमेटर जॅकोबिनस आहे.
क्लॅमेटरचा अर्थ ओरडणे असा आहे. म्हणजे असा पक्षी जो खूप आवाज करतात. हे पक्षी कीटकभक्षी आहेत, म्हणजेच ते बारीक कीटक खातात. मात्र अनेकवेळा त्यांना फळे आणि बेरी खातानाही पाहण्यात आले आहे.
चातकची एक खास गोष्ट म्हणजे हा पक्षी आपली अंडी इतर पक्ष्यांच्या घरट्यात जन्माला घालतो. या पक्ष्याला बबलर आणि बुलबुल सारख्या आकाराचे पक्षी यजमान म्हणून आवडतात आणि त्यांच्या घरट्यात रंगीबेरंगी अंडी घालतात. चातक पक्षी हा प्रामुख्याने आशिया आणि आफ्रिका खंडातील पक्षी आहे. जर आपण भारताबद्दल बोललो तर, ते प्रामुख्याने उत्तराखंडमध्ये आढळतात.