PF Balance: पीएफ (PF) खातेदारांसाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच यूएएन (Universal Account Number – UAN) क्रमांक खूप महत्त्वाचा असतो. हा एक १२ अंकी नंबर असून तो भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) प्रत्येक सदस्याला दिला जातो. हा एक कायमस्वरूपी नंबर असतो आणि एका सदस्यासाठी तो पूर्ण जीवनभर वैध राहतो. यूएएनच्या माध्यमातून तुम्ही तुमचं पीएफ खातं ऑनलाईन वापरु शकता. यूएएनच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या खात्यातील बॅलन्स कळते. खात्यातील ठराविक रक्कम काढता येते. त्यासाठी सर्व प्रक्रिया ही यूएएन क्रमांकाच्या आधारे करता येते. आता यूएएन नंबर नसतानाही तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक तपासू शकता. तर काय आहे सोपी पद्धत चला पाहुयात…

यूएएन नंबर नसतानाही या पद्धतीने तपासा पीएफ खात्यातील शिल्लक

open prison in india
खुले कारागृह म्हणजे काय? त्यात कैदी कसे राहतात आणि काय करतात?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
paneer popcorn recipe
Paneer Popcorn Recipe: पनीर लव्हर्स, ‘ही’ नवीकोरी रेसिपी लगेच करा ट्राय! एकदा खाल, तर पॉपकॉर्नची खरी चव विसराल
Korean Maggie Recipe
एक मॅगीचं पॅकेट आणा आणि झटपट बनवा कोरिअन स्टाईल मॅगी, वाचा ‘ही’ सोपी रेसिपी
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
PAN 2 0 is going Digital Will you still need a physical PAN card as ID proof and KYC document
PAN 2.0 आता डिजिटल होणार: अजूनही फिजिकल PAN कार्डची गरज भासेल का?
Pan Card For Minor
Pan Card For Minor :१८ वर्ष पूर्ण होण्याआधी काढू शकता पॅन कार्ड, फक्त ‘ही’ कागदपत्रे लागणार; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस…
how to remove bad smell from bathroom
बाथरूम आणि टॉयलेटमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा ‘ही’ घरगुती ट्रिक
  • सर्वप्रथम तुम्हाला epfindia.gov.in ला भेट द्यावी लागेल.
  • तुम्हाला येथे ‘Click Here to Know your EPF Balance’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला रीडायरेक्ट लिंकद्वारे epfoservices.in/epfo/ च्या पेजवर रीडायरेक्ट केले जाईल. यानंतर तुम्हाला ‘Member Balance Information’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल आणि तुमच्या राज्याच्या EPFO ​​कार्यालयाच्या वेबसाइट लिंकवर क्लिक करावे लागेल.

आणखी वाचा : PAN Card: पॅन कार्डवरील आडनाव बदलायचंय? तर ‘या’ सोप्या ऑनलाईन स्टेप्स फॉलो करा

  • यानंतर तुम्हाला तुमचा ‘पीएफ अकाउंट नंबर’, नाव आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर टाकावा लागेल.
  • यानंतर तुम्हाला ‘सबमिट’ पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • ही प्रक्रिया पूर्ण होताच, तुमची पीएफ खात्यातील शिल्लक तुमच्या वेबसाइटवर दिसेल.

अशा प्रकारे तुम्ही पीएफ खात्यातील शिल्लक देखील तपासू शकता.

Story img Loader