Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं अराध्य दैवत. सध्याच्या घडीला छत्रपती शिवरायांची चर्चा होण्याचं कारण काहीसं मनाला चटका लावणारं आहे. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्टला कोसळला आणि छत्रपती शिवरायांची ही चर्चा सुरु झाली. या प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटेला ४ सप्टेंबरला अटक झाली. त्याला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याने कुठल्या चुका केल्या ते तपासामध्ये कळेल. मात्र छत्रपती शिवरायांचे पुतळे असलेलं महाराष्ट्र हे एकमेव राज्य नाही. महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्येही शिवरायांचे ( Chhatrapati Shivaji Maharaj ) पुतळे आहेत. आपण त्याबद्दल जाणून घेऊ.

देशातल्या अनेक राज्यांमध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत

शिवरायांचे आठवावे रुप, शिवरायांचा आठवावा प्रताप असं कायमच म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ) यांचे गड किल्ले हे आपल्या राज्याचा अभिमान आहेत. तसंच त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची उदाहरणं आजही दिली जातात. त्यांचा गौरवशाली इतिहास महाराष्ट्रात आजही घराघरांतून ठाऊक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे ( Chhatrapati Shivaji Maharaj ) अनेक पुतळे महाराष्ट्रात उभारण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ) यांचा पहिला पुतळा शाहू महाराजांनी उभारला होता. तो देखील अजून दिमाखात उभा आहे. मात्र महाराष्ट्र हे एकच राज्य असं नाही जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. देशातल्या इतर राज्यांमध्येही शिवपुतळे आहेत.

Union Home Minister Amit Shah addresses party workers at state BJP mahavijayi convention for election victory
पंचायत ते संसद भाजपच! निवडणूक विजयासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
jijau Jayant 2025
जिजाऊंच्या जयघोषाने मातृतीर्थ दुमदुमले, सिंदखेडराजात पाऊण लाख शिवभक्त
Sharad Pawar on RSS Cadre
Sharad Pawar on RSS: शरद पवारांकडून RSS ची स्तुती; संघासारखे केडर निर्माण करण्याची गरज का व्यक्त केली?
Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : महाविकास आघाडी तुटणार? संजय शिरसाटांचा मोठा दावा; म्हणाले, ‘शरद पवारांचा गट लवकरच सत्तेत…’
Foreign varieties on the root of Shrivardhan Rotha betel nut
परराज्यातील वाण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीच्या मुळावर?
Billeshwar Mahadev temple UP Unnao
Mahabharata era Shivling damaged: महाभारतकालीन शिवलिंगाची विटंबना; अटक केलेल्या आरोपीनं सांगितलं धक्कादायक कारण
HMPV, Thane Municipal Corporation, Special room,
‘एचएमपीव्ही’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पालिका सतर्क, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार

हे पण वाचा- ‘शिवराज्याभिषेक’ ग्रंथाची निर्मितीकथा

कोणत्या राज्यात आहेत शिवाजी महाराजांचे पुतळे?

उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा या राज्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. शिवाय या पुतळ्यांची संख्या एक-दोन नाही तर जवळपास काही हजारांच्या घरात आहे. एकट्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे ( Chhatrapati Shivaji Maharaj ) २३ हजाराहून अधिक पुतळे आहेत. एवढंच नाही तर राजधानी दिल्लीतही शिवरायांचे अनेक पुतळे आहेत.

Chhatrpati Shivaji Maharaj Statue
एकट्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे २३ हजाराहून अधिक पुतळे आहेत. एवढंच नाही तर राजधानी दिल्लीतही शिवरायांचे अनेक पुतळे आहेत. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

दिल्लीत शिवरायांचे पुतळे कुठे आहेत?

दिल्लीत १९७२ मद्ये मिंटो रोड या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पहिला पुतळा बसवण्यात आला. शिल्पकार सदाशिव साठे यांनी हा पुतळा घडवला होता. हा अश्वारुढ पुतळा आहे, हा पुतळा बसवण्यात आल्यानंतर मिंटो पुलाचं नाव शिवाजी पूल असं करण्यात आलं. पहाडगंज येथील नूतन मराठी शाळेत छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे. एवढंच नाही देशाच्या संसदेत जे विविध पुतळे बसवण्यात आले आहेत त्यात छत्रपती शिवरायांचाही पुतळा आहे.

संसदेच्या प्रांगणात शिवरायांचा पुतळा कधीपासून आहे?

संसदेच्या प्रांगणात २८ एप्रिल २००३ या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. १८ फूट उंच पुतळ्याची निर्मिती प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांनी केली आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्र भवन दिल्ली या ठिकाणीही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.

Story img Loader