Santa Claus Real Origins & Legend : ख्रिसमसला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. २५ डिसेंबर रोजी हा सण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, अनेकजण ख्रिमसमची वाट पाहत असतात आणि यासाठी बरीच तयारी केली जाते. एकूणच ख्रिसमस हा सण आनंद घेऊन येतो. जेव्हा जेव्हा ख्रिसमसचा उल्लेख केला जातो तेव्हा सांताक्लॉजबद्दल चर्चा होते, विशेषतः लहान मुलांमध्ये सांताक्लॉजबद्दल खूप उत्साह दिसून येतो. त्यांना भेटवस्तू देण्यासाठी सांता येणार, याची ते वर्षभर वाट पाहतात. त्यामुळे ख्रिसमसचा इतिहास जाणून घेण्याबरोबरच सांताक्लॉज कोण होता? खरचं अशा नावाची कोणी व्यक्ती होती का? तसेच सांताक्लॉजमार्फत भेटवस्तू देण्याची परंपरा कधी सुरू झाली? जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. (Christmas 2023)

ब्रिटानिका या माहितीकोशातील नोंदींनुसार, अमेरिकेत लहान मुलांसाठी विशेषत: वर्षभर चांगले वागणाऱ्या मुलांसाठी सांताक्लॉज भेटवस्तू देतो अशी कथा सांगितली जाते. अनेकदा अशीही कथा सांगितली जाते की, सांताक्लॉज आकाशात उडणाऱ्या नऊ रेनडिअरच्या रथावर स्वार होऊन ख्रिसमसच्या दिवशी रात्रीच्या वेळी लहान मुलांना भेटवस्तू देऊ जातो. अनेकांचा असाही विश्वास आहे की, सांताक्लॉज ही एक वास्तविक व्यक्ती आहे, जी घराच्या छतावरील चिमणीतून घरात प्रवेश करते आणि प्रत्येक लहान मुलाला भेटवस्तू देते. पण हे अनोखं व्यक्तिमत्व आणि भेटवस्तू देण्याची ही खरी परंपरा डच वसाहतींमधून सुरु झाली. १७ व्या शतकात डच वसाहत जे सध्याचे न्यूयॉर्क शहर म्हणून उदयास आले आहे, तिथून सिंटरक्लासची आख्यायिका आली आणि ६ डिसेंबरच्या पूर्वसंध्येला मुलांसाठी भेटवस्तू देण्याची प्रथा सुरु झाली. यादरम्यान १९ व्या शतकात The Night Before Christmas ही कविता प्रसिद्ध झाली, ज्यात पहिल्यांदा सिंटरक्लास ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला लहान मुलांसाठी खेळणी आणि मिठाई भेट देण्यासाठी येतो असे वर्णन होते. यानंतर २० व्या शतकाच्या मध्यात कोका-कोला कंपनीने जाहिरात मोहिमेचा भाग म्हणून सिंटरक्लासला सांताक्लॉजच्या रुपात दाखवले. यात पांढरी दाढी, लाल टोपी घातलेली एक व्यक्ती कंपनीची जाहिरात करताना दाखविण्यात आली. अमेरिकेत आजही सांताक्लॉज याच रुपात ओळखला जातो.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

पण सांताक्लॉजची प्रतिमा खरतर सेंट निकोलस यांच्यापासून प्रेरित आहे. आजचे लोकप्रिय नाव सांता असले तरी ते संत निकोलस, सिंटरक्लास यांच्या डच नावावरून आले आहे, यानंतर इंग्रजीत त्याचे सांताक्लॉज हे नाव प्रसिद्ध झाले.सेंट निकोलसचा जन्म तुर्कस्तानमधील मायरा येथे येशूच्या मृत्यूच्या २८० वर्षांनंतर तिसऱ्या शतकात झाला. चौथ्या शतकात तो या छोट्या रोमन शहराचा बिशप झाला. निकोलसला नेहमी इतरांना मदत करणे आवडत असे. तो लहानपणापासूनच अतिशय धार्मिक होता आणि त्याने आपले संपूर्ण आयुष्य ख्रिस्ती धर्मासाठी समर्पित केले. असे मानले जाते की, मध्यरात्री सर्व झोपेत असताना तो गरजूंना मदत करत असे जेणेकरून कोणीही त्याला ओळखू नये. सेंट निकोलसने लोकांना कशी मदत केली याच्याही विविध कथा आहेत.

हेही वाचा – ५० ग्रॅम केक स्लाइसच्या पचनासाठी किती चालावं लागतं? ख्रिसमस पार्टीत मधुमेहींनी काय काळजी घ्यावी? डॉक्टर म्हणाले…

निकोलसच्या दानशूर वृत्तीबद्दल एका कथा सांगितली जाते, ती म्हणजे एकदा सेंट निकोलसला कुठूनतरी कळले की, एका गरीब माणसाला तीन मुली आहेत, परंतु त्या माणसाकडे त्यांच्या लग्नासाठी पैसे नाहीत. त्यामुळे तो मुलींना देहविक्रीच्या व्यवसायात ढकलणार असतो. पण हे समजल्यानंतर निकोलसने या माणसाला मदत करण्याचा विचार केला आणि रात्री त्या माणसाच्या घराच्या छतावर असलेल्या चिमणीतून सोन्याने भरलेली पिशवी खाली टाकली. ही पिशवी त्या माणसाला दिसली, तेव्हा त्याला हा दैवी चमत्कार वाटला. अशाच प्रकारे निकोलसने अनेकांना मदत आणि भेटवस्तू देण्यास सुरुवात केली. काही काळ लोटल्यावर लोकांना हे सर्व निकोलस करतोय याबाबत समजलं. तेव्हापासून लोक त्याला सेंट निकोलस असे म्हणू लागले. सेंट निकोलस हळूहळू सांताक्लॉज नावाने प्रसिध्द झाला. निकोलसची ही कथा लोकप्रिय झाली. ६ डिसेंबर रोजी निकोलस याचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतरही अशाप्रकारे भेटवस्तू देण्याची प्रथा सुरुच राहिली.

सेंट निकोलसबद्दलच्या अशा कथा दुसऱ्या शतकात वाढत गेल्या आणि त्या इतर परंपरेत सांगितल्या जाऊ लागल्या. यामुळे सांताक्लॉज हा एक पौराणिक व्यक्तिमत्त्व झाला. २० व्या शतकात, अनेक इतिहासकारांनी ऐतिहासिक निकोलसला पुराणकथेपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या अभ्यासात त्यांना सेंट निकोलसच्या अस्तित्वावरच शंका आली. त्यांनी अनेक गोष्टी चाळून पाहिल्या, पण यात सेंट निकोलसचा कोणीही शिष्य आढळला नाही. कोणत्याही समकालीन ग्रंथात त्याच्या नावाचा उल्लेखही नव्हता. सर्वात जुना संदर्भ त्याच्या कथित मृत्यूनंतर २०० वर्षांनंतरच्या काळात आढळला. तसेच त्याचे पहिले चरित्र त्यानंतर सुमारे ३०० वर्षांनंतर लिहिले गेले.

पुस्तकांमध्ये निकोलसच्या सुधारित नोंदींमध्ये त्याच्या अस्तित्वाभोवतीची अनिश्चितता दिसून आली, परंतु अनेक इतिहासकारांनी असे सांगितले की, सेंट निकोलस खरोखरचं आयुष्य जगला आणि दयाळूपणा व उदारता ही त्याची वैशिष्ट्ये होती. असाही युक्तिवाद करण्यात आला की, त्याच्या हयातीत कागदपत्रांचा अभाव हे त्याचे अस्तित्व नाकारण्याचे कारण ठरु शकत नाही, कारण त्यावेळी त्याच्या मजकुराची अवहेलना करण्यात आली त्यामुळे त्याचा पुनर्विचार करण्याची मागणी आता पुन्हा सुरू झाली आहे. इतर अनुयायी असे ठामपणे सांगतात की, मध्ययुगाच्या सुरुवातीच्या काळात त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधण्यात आलेले चर्च हाच त्याच्या अस्तित्वाचा मोठा पुरावा आहे. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर जगभरातील विविध चर्चेसमधून सेंट निकोलसचे सुमारे ५०० अवशेष मिळाले आहेत, जे व्हेनिसमधील चर्च ऑफ सेंट निकोलोमध्ये संग्रहित करण्यात आले आहेत. त्यामुळे सेंट निकोलस हाच सांताक्लॉज होता, असे मानणाऱ्यांची जगभरातील संख्या सध्या वाढतेच आहे!