मागील काही वर्षांपासून मुंबई, पुणे यासारख्या महानगरांमध्ये बांधकामाचे प्रमाण वाढले आहे. जुन्या, धोकादायक इमारती तोडून त्या जागी गगनचुंबी इमारती निर्माण करण्याचे प्रकल्प देशभरामध्ये सुरु आहेत. अशा मोठ्या प्रकल्पांमुळे लोकांना रोजगार प्राप्त होत आहे. इमारतींसह रस्त्यांवरील पूल, मेट्रोचे प्रकल्प यांमध्ये बांधकामासाठी अत्याधुनिक साधनांचा वापर केला जातो. ज्या ठिकाणी बांधकाम सुरु असते; तेथे क्रेनसारख्या मोठ्या मशिन्स, बांधकामासाठी लागणारी अवजारे अशा गोष्टी सर्रास पाहायला मिळतात. याव्यतिरिक्त बांधकाम सुरु असलेल्या इमारतींजवळ आणखी एक गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे हिरव्या रंगाचा कपडा. बांधकामाच्या ठिकाणी हा लांब कपडा का असतो असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूळ, माती, सिमेंट हवेमध्ये उडत असते. हवेमध्ये मिसळलेल्या या घटकांचा त्रास तेथे राहणाऱ्या आसपासच्या लोकांना होऊ शकतो. काही वेळेस धूळ-माती लोकांच्या घरात जाऊ शकते. हा त्रास होऊ नये म्हणून हिरव्या रंगाच्या कपड्याने इमारत झाकली जाते. असे केल्याने बांधकामादरम्यान तयार होणारा कचरा इमारतीच्या बाहेर जात नाही. पण पुन्हा हा कपडा नेहमी हिरव्याच रंगाचा का असतो? काळ्या, पांढऱ्या किंवा लाल रंगाचा का नसतो?

आणखी वाचा – Haldi Ceremony: लग्नापूर्वी वधू-वराला हळद का लावली जाते? जाणून घ्या शास्त्रीय कारण

हिरव्या रंगाच्या कपड्याने बांधकाम सुरु असलेल्या इमारती किंवा इमारतींचा भाग झाकण्याची आदेश सरकारच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केले आहे. उंच इमारतींमध्ये बांधकाम करत असताना कामगारांचे लक्ष विचलित होऊ नये यासाठी हिरव्या रंगाच्या कपड्याचा वापर केला जातो. हिरवा रंग हा शीतल रंगांमध्ये मोडतो. शिवाय त्याने डोळ्यांना त्रास होत नाही. हिरव्या रंगामुळे मानसिक स्थैर राखण्यास मदत होते असे म्हटले जाते. याव्यतिरिक्त हा रंग लांबूनच ओळखता येतो. रात्रीच्या वेळी या रंगाच्या कपड्यावर थोडासा प्रकाश पडल्यास तो परावर्तित होतो. अशा काही कारणांमुळे बांधकाम सुरु असलेल्या इमारती या हिरव्या रंगाच्या कपड्याने झाकल्या जातात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Construction sites why building are covered by green cloth know more yps