करोना संसर्गाच्या भीतीने अनेक जण मास्क खरेदी करत आहेत. मास्क कोणी वापरावेत आणि कुणी वापरू नयेत याबाबत नागरिकांच्या मनातील संभ्रमाचे वातावरण हे यामागील मुख्य कारण आहे. यासाठी मास्क वापर कोणी करावा, याबाबत काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शन सूचना जारी केली होती. परंतु सामान्य जनतेमध्ये याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. मास्क वापरल्यानंतर त्यांची विल्हेवाट कशी लावायची याबाबतही लोक अनभिज्ञ असल्याने रस्त्यावर आणि कचरा कुंडय़ांमध्ये मास्क पडलेले दिसून येत आहे. यामुळे विषाणूचा संसर्ग अधिकच बळावू शकतो, अशी भीती डॉक्टर व्यक्त करताहेत. या पार्श्वभूमीवर काही उपयुक्त माहिती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मास्क कुणाला आवश्यक?

‘करोनाचा संसर्ग झालेले रुग्ण, तपासणी अहवाल प्रलंबित असलेले रुग्ण, रुग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक आणि डॉक्टर, नर्स, रुग्णालयांमधील कर्मचारी अशा चारच प्रकारच्या लोकांनी मास्क वापरायचे आहेत. तसेच कफ, ताप किंवा सर्दी यासारखा संसर्ग असलेल्या रुग्णांनीही संसर्ग पसरू नये म्हणून मास्क वापरावा,’ असे मीरारोड येथील वोक्हार्ड रुग्णालयातील श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. संगीता चेकर यांनी सांगितले. ‘जर तुम्ही श्वसनाचे उपचार करणाऱ्या दवाखान्यात किंवा डॉक्टर्सकडे कामाला असाल तर तुम्ही मास्क वापरायलाच हवा. परंतु सध्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे घाबरून लोक सरसकट औषध दुकानातून मास्क खरेदी करून वापर करताहेत. आवश्यकता नसताना मास्क वापरणं चुकीचं आहे,’ असेही त्या म्हणाल्या.

हातरुमाल उत्तम पर्याय

एन-९५ आणि सर्जिकल मास्क सध्या अनेक जण वापरत आहे. हे मास्क एकदा वापरल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणं गरजेचं असतं. पण लोक पुन:पुन्हा हा मास्क वापरल्याने संसर्ग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे मास्क वापरण्यापेक्षा नेहमीच्या वापरातला हातरुमाल हा चांगला पर्याय आहे. हा रुमाल स्वच्छ असावा. तसेच तो रोजच्या रोज धुवावा.

मास्कची विल्हेवाट कशी लावावी?

  •  सर्जिकल मास्क वापरल्यानंतर त्यावर जंतुनाशक फवारणी करावी
  •  त्यानंतर पिशवीत गुंडाळून कचऱ्याच्या बंद डब्यात फेकावे.
  •  कपडा किंवा रुमालाचा मास्क असल्यास गरम पाण्याने स्वच्छ धुऊन कडक उन्हात वाळत घालावेत
  •  घरातील इतर कपडय़ात हा मास्क धुण्यात टाकू नयेत

काय काळजी घ्याल?

  •  मास्कमुळे तुमचं नाक, तोंड आणि हनुवटी पूर्णपणे झाकली गेलं पाहिजे.
  •  मास्क चेहऱ्यावर घट्ट बसले पाहिजे.
  •  मास्क घालताना किंवा काढताना पृष्ठभागाला हात लावू नका. त्यापूर्वी आणि नंतरही हात साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवावेत
  •  मास्क घातल्यानंतर खोकताना किंवा बोलताना मास्क खाली करू नये. यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता असते
  •  एकदाच वापरायचे (युज अ‍ॅण्ड थ्रो) मास्क एकदाच वापरून पुन्हा वापरू नयेत.
  • साधे कापडी मास्क स्वच्छ धुतल्याशिवाय वापरू नयेत. हे मास्क वापरल्यानंतर गरम पाण्यात धुऊन पुन्हा वापरले तरी चालेल.

संकलन : शैलजा तिवले