ब्रिटनमध्ये वेगाने पसरणारा करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली असून फ्रान्सने त्या देशासमवेतच्या सीमा बंद केल्या आहेत. जर्मनी, बल्गेरिया, आयरिश प्रजासत्ताक, तुर्कस्तान व कॅनडा यांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. भारताकडूनही विमानांवर बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र या नव्या प्रकारच्या करोना विषाणूमुळे जगभरामध्ये खळबळ उडवून दिली आहे. अनेक देशामध्ये लसीकरण सुरु झाल्याने आता लसीच्या मदतीने करोनावर नियंत्रण मिळवता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र आता करोनाचा नवा प्रकार हा अधिक घातक असल्याचे दावे केले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी हा नव्या प्रकारचा करोना म्हणजेच नवीन स्ट्रेन असणारा करोना हा ७० टक्के अधिक वेगाने पसरतो असं सांगितलं आहे. १२ देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. भारताचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सोमवारी याच पार्श्वभूमीवर आप्तकालीन बैठक घेत या परिस्थितीचा सामना करण्यासंदर्भात चर्चा केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ब्रिटनवरुन येणाऱ्या सर्व विमानांवर तातडीने बंदी घालावी अशी मागणी केली होती. मात्र हर्षवर्धन यांनी सरकार सतर्क असल्याचं सांगत घाबरुन जाण्याचं कारण नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र आता ब्रिटनमध्ये सापडलेला नवीन प्रकारचा करोना इतर कोणत्या देशांमध्ये सापडला आहे असा प्रश्न पडणे सहाजिक आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार करोना विषाणू नवीन आणि अधिक धोकादायक असा यूव्हीआय २०२०१२/०१ हा स्ट्रेन असणारा विषाणू ब्रिटनबरोबरच इतर पास देशांमध्ये सापडला आहे. ब्रिटनबरोबरच ऑस्ट्रेलिया, इटली, नेदरलँड्स, जिब्राल्टर आणि डेनमार्क या देशांचा समावेश आहे. याशिवाय हा स्ट्रेन असणारा नवा करोना विषाणू बेल्जियममध्येही आढळून आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचप्रमाणे फ्रान्स आणि दक्षिण आफ्रिकेमध्येही हा नवीन स्ट्रेन असणारा करोना विषाणू सापडल्याचे सांगण्यात येत आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार नोव्हेंबरमध्ये डेन्मार्कमधील नऊ रुग्णांमध्ये हा नवीन स्ट्रेन असणारा विषाणू आढळून आला. तर ऑस्ट्रेलियात हा स्ट्रेन असणारा एक रुग्ण आढळला. तर या महिन्यामध्ये आमच्याकडे नवीन स्ट्रेन असणारे करोनाचे एक प्रकरण आढळून आल्याची माहिती नेदरलँड्सने दिली आहे.

करोना विषाणूच्या या नव्या स्ट्रेनचा सर्वात पहिला रुग्ण हा २० सप्टेंबर रोजी ब्रिटनमधील केंट येथे आढळून आला होता. आता ब्रिटनमधील नौऋत्येकडील आणि लंडनमधील ६० टक्के करोना प्रकरणं ही नवीन स्ट्रेनची आहेत. हा नवीन स्ट्रेन असणारा विषाणू खूप वेगाने पसरत आहे. ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार वेल्समध्ये करोनाचा वेगाने संसर्ग होण्यामागे हा नवीन स्ट्रेन असणारा विषाणूच कारणीभूत आहे. तर स्कॉटलॅण्डमधील ग्रेटर ग्लास्गो आणि क्लीडे या प्रांतामध्येही नवीन स्ट्रेनच्या करोनाची नऊ प्रकरणं समोर आली आहेत.

२१ डिसेंबर रोजी ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या जिब्राल्टरमध्ये नवीन स्ट्रेन असणारा करोना विषाणूचा संसर्ग झालेला एक रुग्ण सापडला. २० डिसेंबर रोजी ब्रिटनवरुन रोममध्ये पोहचलेल्या एका इटालियन नागरिकालाही या नवीन स्ट्रेनच्या करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झालं. नोव्हेंबर महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियात दोन तर ब्रिटनमधधील न्यू साऊथ वेल्समध्येही दोन रुग्ण असे आढळून आले ज्यांच्या शरीरामध्ये हा नवीन स्ट्रेन असणारा कोरना विषाणू असल्याचे चाचण्यानंतर स्पष्ट झाले. डिसेंबरमध्ये नेदरलँड्सने आपल्या देशात पहिला नवीन स्ट्रेन असणारा रुग्ण सापडल्याची माहिती दिली.

अद्याप ठोसपणे माहिती मिळाली नसली तरी दक्षिण आफ्रिकामध्येही करोनाचा एक नवा स्ट्रेन सापडला आहे. हा आफ्रिकेमधील करोना विषाणू हा ब्रिटनमधील नवीन स्ट्रेनसारखाच आहे. फ्रान्सचे आरोग्यमंत्री ओलिव्हियर वेरन यांनी करोनाचा हा नवीन स्ट्रेन असणारा विषाणू पूर्वीच एका देशातून दुसऱ्या देशात गेल्याची शक्यता नाकारता येणार नाही असं म्हटलं आहे.