Beard Tax : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी (१ फेब्रुवारी २०२५) संसदेत भारताचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी नवीन ‘इन्कम टॅक्स स्लॅब’ जाहीर करत नोकरदार आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. १२ लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न असणार्‍या व्यक्तीला आता यापुढे कर भरावा लागणार नाही. त्यामुळे ज्यांचे उत्पन्न १२ लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे.
जगभरात असे अनेक देश आहेत की, जे नागरिकांकडून कर वसूल करतात. कर हा नागरिकांच्या वार्षिक उत्पन्नावरून ठरवला जातो; पण तुम्हाला माहिती आहे का जगात असे काही देश आहेत, जे एकेकाळी चक्क पुरुषाच्या दाढीवरून कर वसूल करायचे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रशियन सम्राट पीटर द ग्रेटला संपूर्ण जग ओळखते. पीटरने रशियाचे साम्राज्य वाढवले. त्याने रशियाला महासत्तेचा दर्जा मिळवून दिला. पण, या पीटरला पुरुषांच्या चेहऱ्यावरील केस आवडत नव्हते. त्यामुळे १६९८ मध्ये त्याने दाढीवर कर आकारण्यास सुरुवात केली. शतकानुशतके रशियन पुरुष लांबलचक दाढी चेहऱ्यावर ठेवायचे: पण पीटरला दाढी नसलेला स्वच्छ चेहरा अधिक आधुनिक वाटायचा.

त्या काळात ज्या लोकांनी १०० रुबल (८७.७ रुपये) वार्षिक कर भरला असेल, त्यांना देयकाचा पुरावा म्हणून पदक दिले जायचे. त्यावर लिहिलेले असे, “दाढी हे एक निरुपयोगी ओझे आहे.” (“The beard is a useless burden”) पीटरच्या मते, करापासून वाचायचं असेल, तर दाढी करा.

हेन्री आठवा (VIII) हा इंग्लंड येथील ट्युडोर घराण्यातील दुसरा राजा होता. १५३५ मध्ये त्याने दाढीवर कर लावला होता. पुढे त्याची मुलगी एलिझाबेथ-१ (I) हिनेसुद्धा दाढीवर कर लागू केल्याचा दावा केला जातो; पण कागदपत्राद्वारे हा दावा सिद्ध झाला नाही. दाढीचे इतिहासकार (beard historian ) डॉ. अलुन विथे सांगतात.

पण, डॉ. विथे यांना एक पुरावा सापडला: ज्यामध्ये न्यू जर्सीमधील एका अधिकाऱ्याने १९१० मध्ये दाढीवर कर लागू करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी जिंजर दाढी असलेल्या पुरुषांवर २० टक्के अतिरिक्त शुल्क आकारले होते; पण पुढे हा कायदा मंजूर करण्यात यश आले नाही.

१७८४ मध्ये मध्ये ब्रिटिश संसदेने टोपीवरील कर सादर केला होता. मृत्युदंडाची शिक्षा असूनही पुढे हा कर बंद करण्यात आला; पण टोपी तयार करणाऱ्यांना परवाना खरेदी करणे आवश्यक होते. त्यांनी त्यांच्या वस्तूला ‘हेडगिअर’ म्हणण्यास सुरुवात केली. दरम्यान, १२ वर्षांनंतर विग पावडर टॅक्सने विग घालण्याची फॅशन बंद केली.

फ्रान्सबरोबरच्या युद्धानंतर देशाची आर्थिक घडी सुरळीतपणे चालू राहावी यासाठी त्या वेळचे ब्रिटिश पंतप्रधान विल्यम पिट द यंगर यांनी साबण, घड्याळे, कुत्रे, घोडे, मेणबत्त्या आणि महिला नोकरांवर कर आकारण्याचा निर्णय घेतला होता.