भारतात मागील काही दिवसांपासून अनेक एक्सप्रेस-वे तयार करण्यात आले आहेत, तर आणखी काही नवीन एक्सप्रेस-वेची कामे सुरु आहेत. एक्सप्रेस-वेमुळे देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात प्रवास करणे खूप सोपे झाले आहे. एक्स्प्रेस वे किंवा इतर कोणत्याही मोठ्या महामार्गावरून प्रवास करताना अनेकदा कार चालकांना आपली कार प्रवासादरम्यान खराब होणार नाही ना? याची भीती वाटत असते. पण तुम्हाला माहित आहे का? तुमच्या खिशात असणारे क्रेडिट कार्ड कार खराब झाली तर तुमच्या खूप कामाला येऊ शकते, कसं ते जाणून घेऊया.
क्रेडिट कार्ड कशी मदत करेल?
एक्स्प्रेस वे किंवा महामार्गावरुन प्रवास करताना कारचे टायर फुटणे, पंक्चर होणे किंवा कारमधील पेट्रोल संपणे अशा घटना घडत असतात. तुमच्याबरोबरही असे प्रसंग कधी ना कधी ना घडले असतील. मात्र ते भविष्यात पुन्हा घडू नयेत यासाठी तुम्ही आधीच तयार असले पाहिजे. हो कारण प्रवासात अशा घटना घडल्यानंतर आपण खूप घाबरतो आणि अशा परिस्थितीत उपयोगी येणारा सर्वात सोपा पर्याय विसरतो. बहुतेक लोक क्रेडिट कार्डचा वापर फक्त पेमेंट करण्यासाठी करतात. पण तुमच्याजवळ असणाऱ्या क्रेडिट कार्डचा वापर तुम्ही इतरही अनेक गोष्टींसाठी करू शकता. अनेक क्रेडिट कार्ड तर ‘रोडसाइड असिस्टेंस’ नावाची मोफत सेवा देतात.
हेही वाचा- फाशी देण्यापूर्वी शेवटची इच्छा का विचारतात? कैदी फाशीच नको म्हणाला तर? जाणून घ्या
क्रेडिट कार्डवर उपलब्ध असलेले ‘रोडसाइड असिस्टेंस’ हे फीचर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते आणि अडचणीच्या वेळी ते तुमचे पैसे, वेळ आणि त्रास वाचवू शकते. तर हे ‘रोडसाइड असिस्टेंस’ म्हणजे नेमकं काय? तर जेव्हा कधी तुम्ही प्रवासादरम्यान अडचणीत सापडता तेव्हा ही सेवा तुम्हाला एखाद्या मित्राप्रमाणे मदत करते. यामध्ये तुम्हाला टोइंग, बॅटरी जंपस्टार्ट, टायर बदलणे, पेट्रोल डिलिव्हरी, कारच्या बाहेर लॉकआउटमध्ये मदत यासारख्या सेवा पुरवल्या जातात. एवढेच नाही तर तुमची कार पूर्ण खराब झाल्यास, रोडसाइड असिस्टेंस सर्व्हिस तुम्हाला जवळच्या शहरात बॅकअप वाहन आणि हॉटेलदेखील उपलब्ध करुन देते.
खिशातील पैसे वाचवा, क्रेडिट कार्डचा फायदा घ्या –
हेही वाचा- भारतात ‘या’ ठिकाणी आहे सर्वात मोठा पूल, नट-बोल्टशिवाय उभारलेला पूल रात्री १२ वाजता बंद होतो, कारण…
या सेवांचा उद्देश हाच आहे की, तुम्हाला अडचणीच्या वेळी लवकरात लवकर मदत मिळावी जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. क्रेडिट कार्डद्वारे रोडसाइड असिस्टेंस सुविधा वापरण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पैशांची बचत. रस्त्याच्याकडेला असलेल्या सेवांसाठी तुम्ही खिशातील पैसे देण्याऐवजी, क्रेडिट कार्डद्वारे मोफत मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेऊ शकता. तसेच ही सुविधा तुमच्यासाठी तेव्हा जास्त फायदेशीर ठरते जेव्हा तुमच्याकडे इतर कोणत्याही रोडसाइड असिस्टेंस सुविधेचे सदस्यत्व नसते.
अशी मिळवा मदत –
तुमच्या क्रेडिटवर दिलेल्या मोफत रोडसाइड असिस्टेंस सुविधेचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला क्रेडिट कार्ड कंपनीच्या हेल्पलाइनवर कॉल करावा लागेल. तुम्ही कॉल करता तेव्हा, ब्रेकडाउन असिस्टेंस पुरवणारी कंपनीची व्यक्ती तुमच्याशी बोलेल. तुमच्या बँकेने या कंपनीशी करार केलेला असतो. कॉल केल्यानंतर, तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड तपशील तसेच तुम्ही कुठे आहात, तुम्हाला कोणत्या प्रकारची समस्या आहे आणि इतर महत्त्वाची माहिती त्या व्यक्तीला दिल्यानंतर ते तुमची मदत करण्यासाठी तुम्ही आहात त्या ठिकाणी आणि जी पाहिजे ती मदत करतील.