Currey Road Station Name Meaning: मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटीशकालीन नावे बदलण्याच्या चर्चांनी शासन दरबारी वेग धरला आहे. करी रोड, सॅन्डहर्स्ट रोड, परळसहित ८ ते १० स्थानकांच्या नामांतराचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे. सध्याची ब्रिटिशकालीन नावे बदलून त्याजागी मराठी संस्कृतीवर आधारित नाव देण्यासाठी हा प्रयत्न सुरु आहे. याच अंतर्गत दक्षिण मध्य मुंबईतील एक महत्त्वाचे रेल्वे स्टेशन करी रोडचे सुद्धा नाव बदलून लालबाग करण्याचा विचार चालू आहे. पण मुळात मध्य रेल्वेच्या या स्थानकाला करी रोड हे नाव कसे पडले हे तुम्हाला माहितेय का? लोकसत्ता.कॉमची विशेष सीरीज ‘गोष्ट मुंबईची’ मध्ये खाकी टूर्सचे संस्थापक भरत गोठोस्कर यांनी करी रोड स्थानकाच्या नावाचा रंजक इतिहास सांगितला आहे.

भरत गोठोस्कर सांगतात की, अनेकांना असे वाटू शकते की इंग्रजीमधील ‘करी’ म्हणजेच मराठीमध्ये आमटीवरून या स्थानकाचे नाव ठेवले आहे. पण मुळात तुम्ही स्पेलिंग जर का नीट पाहिलंत तर ते Curry नसून Currey असे आहे. करी हे तत्कालीन रेल्वे अधिकारी (चार्ल्स करी) यांचे आडनाव होते व त्यावरूनच या स्थानकाला करी रोड असे नाव देण्यात आले.

Separate traffic wing at Chinchoti for traffic control on highways
महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी चिंचोटी येथे स्वतंत्र वाहतूक शाखा
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Rumors that Prayagraj railway station is closed Mumbai print news
प्रयागराज रेल्वे स्थानक बंद असल्याची अफवा
Karjat CSMT local services delayed morning Kalyan, Dombivli central railway local train services passengers
सकाळच्या कर्जत-सीएसएमटी लोकल न आल्याने कल्याण, डोंबिवलीतील प्रवाशांमध्ये गोंधळ
Karjat Railway Station
Karjat कर्जत रेल्वे स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, नेमकं काय घडलं?
tehsildar issued notices to 109 plot holders in Chandrapurs Blue Line area to stop unauthorized construction
चंद्रपूर शहरालगत दहा गावातील १०९ अनधिकृत ले आऊट धारकांना नोटीस
Mumbai local-train
Mumbai Local : ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल सेवा विस्कळीत; एकापाठोपाठ लोकलच्या रांगा!
dilapidated railway bridge on Nagpur Chhindwara route will be opened
नागपूर – छिंदवाडा मार्गावरील खचलेला रेल्वे पुला सुरू होणार,मुहूर्त ठरला

या स्टेशनचे बांधकाम आपण नीट पाहिले तर इथे जिने नाहीयेत, तर इथे चढ उतारासाठी रॅम्प आहेत. याचे कारण म्हणजे हे स्टेशन मुळात माणसांसाठी बांधलेले नसून प्राण्यांसाठी बांधले होते. विशेषतः घोड्यांसाठी हे मैदान होते. यापूर्वीचा रेसकोर्स महालक्ष्मीला नसून मदनपुरा भागात होता, व घोडे दख्खनच्या पठारावर पाळले जायचे जेव्हा तिथून रेसकोर्सला जाण्यासाठी घोड्यांना मुंबईत आणले जायचे तेव्हा ते याच स्थानकात उतरायचे. जेव्हा लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात धाडण्यात आले तेव्हा या भागात प्रचंड जाळपोळ झाली होती. करी रोड स्थानक सुद्धा जाळलं गेलं होतं आणि नंतर ते नव्याने उभारण्यात आले होते.

हे ही वाचा<< बँकॉक शहराच्या नावात आहेत १६८ अक्षरे! रचलाय जगातील सर्वात मोठ्या नावाचा रेकॉर्ड, Video मध्ये नीट ऐका शब्द

दरम्यान, करीरोड स्थानकाचे नाव बदलून लालबाग असे करण्याचा प्रस्ताव आहे. आज (१३ मार्च २०२४) रोजी यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. मुंबईतील अन्य रेल्वे स्थानकांच्या नावाचा इतिहास जाणून घेण्यासाठी युट्युबवर आपण लोकसत्ता.कॉमची गोष्ट मुंबईची ही सीरीज नक्की तपासून पाहा.

Story img Loader