मुंबईपासून अवघ्या ११० किमी अंतरावर पालघरजवळ निसर्ग चक्रीवादळ मंगळवारी रात्री आठच्या सुमारास किनारपट्टीला धडक देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी ११५ ते १२५ किमी प्रती तास वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा स्कायमेट या खासगी वेधशाळेने दिला आहे. असं असतानाच चक्रीवादाळाचा मुंबईसहीत ठाणे, पालघर आणि रायगडमधील काही भागांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय जल आयोगाने सिंधुदूर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे, मुंबई आणि नाशिकमधील काही भागांमध्ये फ्लॅश प्लड (म्हणजेच अचानक मोठ्याप्रमाणात आलेला पाण्याचा प्रवाह) येण्यासंदर्भातील इशारा दिल्याचेही स्कायमेटनं म्हटलं आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या किनारी भागांमध्ये तसेच गुजरामध्येही उंच लाटा उसळतील असा इशाराही स्कायमेटनं दिला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अर्थात एनडीआरएफच्या १६ तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत. मात्र असं चक्रीवादळ आल्यावर काय करावं आणि काय नाही यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने काही सुचना जारी केल्या आहेत. यापैकीच काही सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना वाचू दाखवल्या. काय आहेत या सुचना आपण जाणून घेऊयात..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा