सध्या देशभरात नवरात्रोत्सव उत्साह आणि आनंदात साजरा केला जात आहेत. नऊ दिवस दुर्गामातेच्या विविध रुपांची पूजा केली जाते आणि दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो. नवरात्र हा नऊ दिवसांचा का असा प्रश्न अनेकांना पडतो; तर त्याबाबत एक दंतकथा प्रसिद्ध आहे. “दुर्गा मातेने नऊ दिवस महिषासूर राक्षसाबरोबर युद्ध केले आणि दहाव्या दिवशी त्याचा वध करून वियज मिळवला होता, असे म्हणतात. म्हणनूच नऊ दिवस नवरात्र आणि दहाव्या दिवसाला विजयादशमी म्हणतात.”

विजयादशमीला ‘दसरा’ असे म्हटले जाते. याच दिवशी रामाने रावणाचा वधही केला होता असे म्हणतात. रावणाचे दहन केले म्हणूनच वाईट वृत्तींचे दहन या दिवशी करावे असे मानले जाते. दसऱ्याच्या दिवसाला सीमोल्लंघन म्हणूनही ओळखले जाते. कारण अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राज्यावर स्वारी करण्यास जात असत, त्याला सीमोल्लंघन म्हणत. म्हणून हा दिवस सीमोल्लंघन म्हणून ओळखला जातो. आपल्या गावाची वेस ओलांडून जाणे याचा अर्थ सीमेचे उल्लंघन करणे.

Malavya rajyog in meen
शुक्र देणार गडगंज श्रीमंती! मालव्य राजयोगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Thieves , jewellery stolen, Sankranti ,
पुणे : संक्रातीच्या दिवशी चोरट्यांचा धुमाकूळ, महिलांकडील दागिने चोरीला
Stock market hits 650-point high with Sensex
मार्केट-वेध : सेन्सेक्स सावरला; पण बाजारातील तेजीचे पतंग काटले जाणार की, मोठी भरारी घेणार?
Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश
Gold Silver News
Gold Silver Price Today : मकर संक्रांतीच्या दिवशी सोने खरेदी करताय? जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचा सोने चांदीचा भाव

साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून दसऱ्याचा मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी नवी खरेदी, नवे करार आणि चांगल्या गोष्टींचा प्रारंभ केला जातो. अज्ञानाचा अंधार ज्ञानाने दूर करावा, शत्रूवर पराक्रमाने आणि वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवावा असे या दिवसाचे महत्त्व सांगितले जाते.

दसऱ्याच्या दिवशी घरोघरी शस्त्रांची, पुस्तकांची, लक्ष्मीची आणि वाहनांची पूजा केली जाते. झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानांचे तोरण दाराला बांधतात. तसेच दुकानांना, वाहनांना हार बांधला जातो. तसेच या दिवशी आपट्याच्या पानांनादेखील खूप महत्त्व असते. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याची पंरपरा आहे. ‘सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा’ असे म्हणत एकमेकांना आपट्याची पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात आणि कुटुंबाची भरभराट होवो अशी सदिच्छा व्यक्त केली जाते. आपल्याला विजय मिळावा आणि तो जीवनात कायम राहावा यासाठी दसऱ्याला सोने लुटले जाते.

हेही वाचा – नवरात्रीमध्ये उपवास करताना रोज रताळे खाऊ शकता का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या….

दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानाला सोन्याचा मान का दिला जातो? याबाबत काही दंतकथा प्रसिद्ध आहे. एक दंतकथा ही रघुवंशाचा आद्य रघुराजा राज्य करत असतानाच्या काळातील आहे. कौत्स नावाचा एक ब्राह्मण होता. कोत्स हा वरतंतु ऋषींचा शिष्य होता. कोत्साला आपल्या गुरुला दक्षिणा द्यायची होती. शिष्याच्या प्रगतीवरच समाधानी असणाऱ्या वरतंतु ऋषींनी प्रथम गुरुदक्षिणा घेण्यास नकार दिला, पण शिष्याच्या आग्रहाखातर अखेरीस त्यांनी सांगितले की, मला एकाच स्रोताकडून मिळालेल्या १४ कोटी सुवर्णमुद्रा अर्पण कर. कौत्स हा गरीब होता. त्याला गुरुंना गुरुदक्षिणा कशी द्यावी हे समजत नव्हते. अखेर त्याने रघुराजाकडे जाऊन मदत मागितली. पण, रघुराजाने त्याची सर्व संपत्ती यज्ञात दान केल्याने त्याला कौत्साची मदत करता येत नव्हती. पण, दारी आलेल्या याचकाला रिकाम्या हाती पाठवणे रघुराजाच्या मनाला पटत नव्हते. म्हणून त्याने ठरवले की, कुबेरावर हल्ला करून त्याची संपत्ती मिळवायची आणि कोत्साला दान करायची. कुबेराला हे समजताच त्याने राजाला निरोप पाठवला की, “तो स्वखुशीनेच त्याची मागणी मान्य करेल आणि कोत्साला सुवर्णमुद्रा मिळतील.” विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी कुबेराने सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला. कोत्साने गुरुदेवांना हव्या होत्या तितक्याच १४ कोटी मुद्रा घेतल्या आणि गुरुदक्षिणा म्हणून दिल्या. उरलेल्या सुवर्णमुद्रा पानासह तोडून सर्वांना वाटल्या. ज्या झाडावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव झाला ते झाड होते आपट्याचे. या प्रसंगापासून हिरण्याचं (सोनं) पावित्र्य त्या आपट्याच्या पानांना लाभलं म्हणून या पानांना हिरण्यगर्भा असेही म्हणतात. तेव्हापासून आपट्याचे पान सोनं म्हणून लुटण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते.

हेही वाचा – नवरात्रीचे उपवास करताय? कसा असावा तुमचा आहार? मधुमेही अथवा गर्भवती महिलांनी उपवास करावा का?

दुसऱ्या दंतकथेनुसार, महाभारत काळात पांडवांनी अज्ञातवासात जाण्याआधी त्यांची शस्त्रास्त्रे श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून शमीच्या म्हणजेच आपट्याच्या झाडामध्ये लपवून ठेवली. अज्ञातवास पूर्ण झाल्यानंतर ती बाहेर काढली होती, तो दिवस होता दसऱ्याचा. तेव्हापासून दसऱ्याला सोने म्हणजेच आपट्याची पाने वाटण्याची प्रथा सुरू आहे असे म्हणतात.

पुराणामध्ये सोनं लुटणे या संदर्भात विविध कथा सांगण्यात आल्या आहेत. मात्र, या दंतकथा असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. मात्र, प्रथा आणि परंपरेच्या नावाखाली अवघा वृक्ष ओरबडला जात असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून आजच्या काळात आपट्याची पाने न देता नुसत्या शुभेच्छा द्या, असे म्हटले जाते.

Story img Loader