पृथ्वीतलावरील सर्वाधिक विषारी प्राण्यांमध्ये विंचवाचा समावेश होतो. विंचवाच्या दंशाने दरवर्षी कित्येक लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. सापाच्या विषापेक्षाही विंचवाचे विष जास्त धोकादायक मानले जाते. विंचवाच्या विषाच्या एका थेंबाने अनेक व्यक्तींचा जीव जाऊ शकतो. जगात सगळ्यात महागड्या द्रव्यामध्ये विंचवाच्या विषाचा समावेश होतो. विंचवाच्या विषाचा एक थेंब लाखो रुपयांत विकला जातो. या विषाचा नेमका वापर कशामध्ये केला जातो आणि हे विष एवढे महागडे का असते? काय आहे यामागचे कारण जाणून घेऊ.

हेही वाचा- सांताक्लॉज खरंच कुणी व्यक्ती होता का? ख्रिसमसनिमित्त भेटवस्तू देण्याची परंपरा कुठून सुरू झाली? जाणून घ्या…

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
Mumbai constituencies polluted, byculla, Shivdi,
मुंबईत चार मतदारसंघ प्रदूषित; भायखळा, शिवडी, देवनार, मानखुर्दच्या समस्येकडे सर्वपक्षिय दुर्लक्ष
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……

डेथस्टॉल्कर नावाच्या विंचवाच्या विषाची होते अब्ज रुपयांत विक्री

ब्रिटानिकाने दिलेल्या माहितीनुसार विचंवांच्या प्रजातीमध्ये डेथस्टॉकर नावाचा विंचू अतिशय धोकादायक मानला जातो. त्याच्या विषाचा फक्त एक थेंब अनेकांचा जीव घेऊ शकतो. डेथस्टॉकर या विंचवाच्या विषाची बाजारातील किंमत खूप जास्त आहे. त्याच्या विषाचा एक थेंब लाखात विकला जातो. या वाळवंटातील विंचवाच्या विषापासूनही अनेक औषधे बनवली जातात. डेथस्टॉकरच्या विषाबाबतही अनेक प्रकारचे संशोधन केले जात आहे. त्या संशोधनातूनही हे विष खूप उपयुक्त असल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एक गॅलन किंवा ३.७ लिटर विषाची किंमत २.८१ अब्ज रुपये आहे.

हेही वाचा- घरात मद्याच्या किती बाटल्या ठेवता येतात? महाराष्ट्रातील नागरिकांसाठी काय आहेत नियम, घ्या जाणून

डेथस्टॉकर या विंचवाचे विष महाग आहे. कारण- ते दुर्मीळ आहे. हे विष कोणाला हवे असेल, तर ते सहजासहजी मिळत नाही. या विंचवाचे विष काढण्याची प्रक्रियाही खूप अवघड आहे. त्याचे विष काण्यासाठी या विंचवाच्या नांगीला विजेचे झटके दिले जातात. हे झटके मिळाल्यानंतर विंचू ते विष बाहेर फेकतो. या विंचवाच्या विषामध्ये सुमारे पाच लाख रासायनिक संयुगे असतात.

हेही वाचा- जगातला सर्वात मोठा चित्रपट कोणता माहितीये? पाहाण्यासाठी लागतात चक्क ३ दिवस १५ मिनिटं

विंचवाचे विष माणसाच्या थेट संपर्कात आल्यास मृत्यू ओढवतो; परंतु या विषाचा वापर करून मानवी जीव वाचवताही येतो. डेथस्टॉकर विंचवाचे विष कर्करोगावरील उपचारासाठी बनवलेल्या औषधांमध्येही वापरले जाते. कॅन्सर, मलेरियासारख्या आजारांवर या विंचवाचे विष खूप गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. अनेक औषधांमध्येही या विषाचा वापर केला जातो. डेथस्टॉकर विंचवाव्यतिरिक्त इतर काही विंचवांचे विष संधिवातामुळे होणाऱ्या वेदनांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते.