MS Dhoni Overall Net Worth : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. संपूर्ण क्रिडाविश्वात कॅप्टन कूल म्हणून छाप टाकणारा धोनी भारताचा सर्वात यशस्वी यशस्वी कर्णधार आहे. धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ मध्ये रांची येथे झाला. धोनी आता ४२ वर्षांचा झाला आहे. क्रिकेटच्या मैदानात धावांचा पाऊस पाडणाऱ्या धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्त घेतल्यानंतरही आयपीएलमध्ये धमाका सुरुच ठेवलाय. धोनीचं आर्थिक उत्पन्न तगडं असल्याने जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर्समध्ये धोनीच्या नावाचा समावेश आहे.

आयपीएलमधून कमावले कोट्यावधी रुपये

क्रिकेटच्या माध्यमातून एम एस धोनी जगभरात लोकप्रीय झाला. क्रिकेटच्या मैदानासोबतच बिजनेस सेक्टरमध्येही धोनीनं यश संपादन केलं आहे. क्रिकेटमधून पैशांची कमाई करण्याबरोबरच धोनीच्या कंपनींच्या माध्यमातूनही आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे. धोनी आयपीएल टीम (IPL Team) सीएसकेचा (CSK) कर्णधार म्हणून १२ कोटी रुपये मानधन घेतो. मागील १६ आयपीएल सीजनमध्ये धोनीने फक्त क्रिकेटच्या माध्यमातून जवळपास १७८ कोटी रुपये कमावले आहेत.

Eknath Shinde, Sangola, Shahajibapu Patil,
शहाजीबापू पाटील आमच्या टीमचे ‘धोनी’! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले कौतुक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
person took 1 85 crores and absconded with his family after luring investors with interest
नागपुरात आणखी एक महाघोटाळा! अडीच हजार लोकांचे कोट्यवधी…
savita malpekar bald look in kaksparsh praises Mahesh Manjrekar
“महेशने विचारलं टक्कल करशील का? मी लगेच…”, सविता मालपेकरांनी सांगितला ‘काकस्पर्श’चा किस्सा, म्हणाल्या…
MS Dhoni and wife Sakshi casting vote in Ranchi reaches new heights crowd Craze to capture video
MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीने पत्नी साक्षीसह रांचीमध्ये केले मतदान, चाहत्यांच्या गर्दीने घेरल्याचा VIDEO व्हायरल
Dharavi Assembly Constituency election Dharavi Redevelopment Mumbai print news
‘धारावी बचाव’चा कार्यकर्ता रिंगणात; मतदारसंघातून गायकवाड कुटुंबाची मक्तेदारी मोडीत काढणार ?
MS Dhoni impressed by Mumbai Ayush Mhatre
MS Dhoni : मुंबईच्या १७ वर्षीय फलंदाजाने जिंकले माहीचे मन, IPL 2025 च्या लिलावापूर्वी CSK ने दिली ‘ही’ खास ऑफर

नक्की वाचा – सावधान! पावसाळ्यात रस्त्यावर वाहन चालवताय? ‘या’ ठिकाणी घडला भयंकर अपघात, Video पाहून थक्क व्हाल

इतका आहे धोनीचा नेटवर्थ

महेंद्रसिंग धोनीच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं, तर रिपोर्ट्सनुसार, धोनी १०४० कोटी रुपयांचा मालक आहे. यामध्ये क्रिकेटमधून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नाशिवाय वेगवेगळ्या कंपन्यांचे ब्रांस एंडोर्समेंट, अनेक कंपन्यांसोबत केलेल्या करारातून मिळणारे उत्पन्न, अन्य व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईचा समावेश आहे. क्रिकेट खेळण्यासोबतच अनेक स्पोर्टिंग आणि डायरेट्क-टू-कंज्यूमर बिजनेस फर्मकडून आर्थिक उत्पन्न मिळालं आहे.

झारखंडचा धोनी आहे सर्वात मोठा करदाता

एम धोनीच्या कमाईचा अंदाज फक्त या गोष्टीवरून लावता येऊ शकतो की, झारखंडमध्ये सर्वात जास्त टॅक्स भरण्यात धोनीचा मोठा वाटा आहे. इतकं मोठं यश धोनीनं पहिल्यांदाच मिळवलं नाहीय. आयकर विभागाच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर महेंद्रसिंग धोनी झारखंडमधील सर्वात मोठा करदाता ठरला आहे. धोनीने ३१ मार्चला पूर्ण झालेलं आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ३८ कोटी रुपयांचा आगाऊ कर भरला आहे. २०२१-२२ मध्येही धोनीने एव्हढाच आगाऊ कर भरला होता.

TaM AdEx सेलिब्रिटी एंडोर्समेंटच्या रिुपोर्टनुसार, धोनी बॉलिवडूचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त कंपनींच्या ब्रॅंड्सचा चेहरा आहे. इतकच नव्हे तर स्टार क्रिकेटर विराट कोहलीही या बाबतीत त्याच्या मागे आहे. या रिपोर्टनुसार, धोनी जवळपास ३० मोठ्या ब्रॅंड्सचं एंडोर्समेंट करतो. यामध्ये मास्टरकार्ड, जियो सिनेमा, स्किपर पाइप, फायर बोल्ट, ओरियो आणि गल्फ ऑयल यांचा समावेश आहे. तसंच अनअॅकेडमी, भारत मेट्रोमोनी, नेटमेड्स आणि ड्रीम ११ सारख्या कंपनींमध्येही धोनीचा मोठा वाटा आहे.

नक्की वाचा – Viral Video : क्रूरतेचा कळस! रिक्षाचालकाने महिलेला २०० मीटर फरफटत नेलं, कोल्हापूरच्या धक्कादायक घटनेनं खळबळ

कुठे केली धोनीने गुंतवणूक ?

धोनीच्या गुंतवणूकीबाबत सांगायचं झालं, तर धोनीने अेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. याच्या माध्यमातून त्याला मोठं आर्थिक उत्पन्न मिळतं. त्याच्या गुंतवणूकीच्या फर्ममध्ये खाताबूक, प्री-ओन्ड कार ईकॉमर्स प्लॅटफॉर्म Cars 24, प्रोटीन फूट स्टार्टअप शाका हैरी आणि ड्रोन सर्विसेज स्टार्टअप गरुड एयरोस्पेस (Garuda Aerospace)यांचा समावेश आहे. याशिवाय धोनीचा स्वत:चा फिटनेस आणि लाईफस्टाईल ब्रॅंड सेवनही त्याच्या आर्थिक उत्पन्नाचं मोठं स्त्रोत आहे. टेक कंपनी रन एडम (Run Adam) धोनीच्या गुंतवणूकीच्या पोर्टफोलियोत समाविष्ट आहे. याशिवाय धोनी फुटबॉल टीम चेन्नईयिन एफसी ( Chennaiyin FC), माही रेसिंग टीम इंडिया ( Mahi Racing Team India) आणि फिल्ड हॉकी टीम रांची रेंजचा सहमालकही आहे. तसंच धोनी कडकनाथ चिकनची फार्मिंगही करतो.

अलिशान घर आणि फार्म हाऊस

एम एस धोनीकडे रांची आणि देहरादूनमध्ये कोट्यावधू रुपयांचा घर आहे. धोनी पत्नी साक्षी आणि मुलगी जीवासोबत झारखंडच्या रांची येथील फार्महाऊसमध्ये राहतो. रांचीमध्येच धोनीने ४३ एकरचा फार्महाऊस बनवला आहे. तिथे धोनी ऑर्गेनिक फार्मिंग करतो. तसंच हॉटेल माही रेसिडन्सी आणि ऑर्गेनिक फार्मिंगचाही समावेश आहे. हा हॉटेल धोनीच्या होमटाऊन म्हणेजच रांचीत आहे.