Full Form of Train: भारतातच नव्हे तर जगभरात अनेकजण ट्रेनने प्रवास करतात. भारतीय तर ट्रेनचे अक्षरशः फॅन आहेत. कधीही पाहा लोकल ट्रेनमध्ये भयंकर गर्दी असते आणि लांब पल्ल्याच्या ट्रेनसाठी तर पार कित्येक महिने आधी बुकिंग करावे लागते. आजवर आपण ट्रेनच्या मार्गांविषयी, ट्रेनच्या नियमांविषयी अनेक थक्क करणारे लेख वाचले असतील. पण तुम्हाला ट्रेन म्हणजे काय हे आज आम्ही सांगणार आहोत. आता तुम्ही म्हणाल त्यात नवीन काय? पण मंडळी ट्रेन हा एक दोन अक्षरी शब्द नसून चक्क चार शब्दांना जोडणारा एक शॉर्ट फॉर्म आहे. आज या शॉर्ट फॉर्मचा उलगडा आपण करूच पण त्यासह ट्रेन्सशी संबंधित अन्यही शब्दांचे अर्थ जाणून घेऊया…
Train चा फुल फॉर्म काय?
ट्रेन हा काही शब्द जोडून बनवलेला एक शब्द आहे जो आता आपल्या नेहमीच्या संभाषणात चांगलाच रूळलाय. पण ट्रेनसाठी मूळ शब्द होता रेल्वे. आणि या ट्रेनचा फुल फॉर्म सुद्धा हाच आहे. ट्रेन म्हणजे टुरिस्ट रेल्वे असोसिएशन inc. ट्रेन संदर्भात आपण अन्यही काही शब्द अनेकदा ऐकले असतील, जसे की
- IRCTC: इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन.
- IRCON: इंडियन रेल्वे कंस्ट्रकशन लिमिटेड
- RVNL: रेल्वे विकास निगम लिमिटेड
- RDSO : रिसर्च डिजाइन स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन
आता आपण ट्रेनचा व त्या संबंधित विभागांचा अर्थ पाहिला पण तुम्हाला माहित आहे का की तुमच्या तिकिटावर सुद्धा असे काही सांकेतिक शब्द असतात. याचाही अर्थ पाहूया..
WL: वेटिंग लिस्ट (म्हणजेच तुमचे तिकीट बुकिंग अजूनही वेटिंगमध्ये आहे)
RSWL: रोड साईड वेटिंग लिस्ट यामध्ये तिकीट कंफर्म होण्याची शक्यता कमी असते.
हे ही वाचा<< धबधब्यातुन जाणाऱ्या ट्रेनचा Video पाहिलात का? महाराष्ट्रातील ‘या’ जादुई जागेचं नाव वाचून व्हाल थक्क
RQW- जर तिकीट ट्रेन प्रवासाच्या मध्यवर्ती स्टेशन पासून इतर मध्यवर्ती स्टेशनपर्यंत बुक केलं असेल व अन्य कोट्यातून तिकीट कन्फर्म झाले नसेल तर तुमचे तिकीट हे रिक्वेस्ट वेटिंग लिस्ट मध्ये जाते.