घरात डासांची उत्पत्ती वाढली की झोपणं काय एका जागी बसणेही अवघड होऊन जातं. सतत शरीराभोवती घोंघावणारे डास अनेक गंभीर आजारांचे कारण ठरत आहे. मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया अशा घातक आजारांची उत्पत्ती डासांपासून झाली आहे. यामुळे अनेक जण घरातील डासांचा नायनाट करण्यासाठी मॉस्किटो लिक्विड किलर मशीन किंवा कॉइलचा वापर करतात. या लिक्विड किंवा कॉइलमुळे उन्हाळ्यात डासांपासून तर सुटका होण्यास मदत होते. पण तुम्हाला माहिती आहे का, डासांचा नायनाट करणारे लिक्लिड किंवा कॉइल अनेक गंभीर आजारांचे कारण ठरत आहे. त्यामुळे डासांचा नायनाट करणारे हे मॉक्सिट किलर लिक्विडमध्ये कोणते केमिकल असतात? आणि त्याचा आपल्या आरोग्यावर नेमके कोणते गंभीर परिणाम होतात? जाणून घेऊ…
एका संशोधनात असे आढळून आले आहे की, डास मारणारी एक कॉइल १०० सिगारेटइतकी धोकादायक आहे. यातून जवळपास २.५ पीएम इतका धूर निघतो. यामुळे बाजारात उपलब्ध मॉस्किटो किलर लिक्विड किंवा कॉइल आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत.
आरोग्यासाठी धोकादायक मॉक्सिटो किलर लिक्विड?
डासांचा नायनाट करणाऱ्या लिक्विडमध्ये असे काही घातक केमिकल्स असतात, जे श्वासावाटे आपल्या शरीरात जातात, यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. या मॉस्किटो किलर लिक्विड बॉटलमध्ये एलेथ्रिन आणि एरोसोल केमिकलचे मिश्रण असते आणि त्या बॉटलच्या टोकावर एक कार्बन इलेक्ट्रोड रॉड घातलेला असतो, जेव्हा फिलामेंट गरम होते आणि इलेक्ट्रोड रोडचे तापमान वाढते. यानंतर ते गरम होते आणि हवेत धुरामार्फत पसरते. हाच धुर श्वासाद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतो. यामुळे घसादुखी आणि डोकेदुखीचा त्रास वाढतो.
यातून निघणारा धूर हा शरीरातील फुफ्फुसांना धोका निर्माण करतो. ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होते. म्हणून घरात डासांचा नायनाट करणाऱ्या लिक्विड मशीनचा वापर जपून करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. तसेच डासांपासून विशेषत: लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी मच्छरदाणी वापरण्याचा सल्ला दिला जातो.
मॉक्सिटो किलर क्रीमचा शरीरावर घातक परिणाम
काही लोक डासांपासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी हाता, पायांना मॉक्सिटो किलर क्रीम लावतात. ही क्रीम डासांपासून बचाव करत असली तरी तिचे त्वचेवर गंभीर परिणाम होतात. या क्रीममधील घातक केमिकल्समुळे त्वचेवर इन्फेक्शन होते. मॉस्किटो रिपेलेंट्समध्ये डीईईटी असते जे वापरण्यासाठी बहुतेक सुरक्षित असते. पण त्यातील इतर केमिसल्सचा सतत वापर केल्यास त्वचेवर आणि शरीरावर गंभीर परिणाम होतो.