साडी हा भारताचा जगभरात प्रसिद्ध असलेला पोशाख आहे. एकेकाळी केवळ विवाहित महिला साडी नेसत असत. ही त्यांची ओळख होती. मात्र बदलत्या काळानुसार साडी ही फक्त विवाहित महिलांची मक्तेदारी न राहता ती आता सौंदर्याचे प्रतीक म्हणून उदयास आले आहे. आजच्या काळातील महिला कोणाच्याही दबावाखाली नाही तर आपल्या इच्छेने साडी नेसतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या देशात पूर्वापार चालत आलेल्या गोंष्टींमागे कोणते ना कोणते विशेष कारण असते. साडी नेसण्याच्या बाबतीतही असेच एक कारण आहे. साडी हा भारतीय महिलांचा पारंपारिक पोशाख आहे. साडी नेसलेल्या महिला अत्यंत सुंदर दिसतात. भारतातील प्रत्येक राज्यामधील महिला वेगवेगळ्या प्रकारे साडी नेसतात. तसेच साडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कापडही वेगवेगळ्या प्रकारचे असते. मात्र तुम्हाला माहित आहे का की साडीच्या खालील भागात फॉल लावण्याची पद्धत कधीपासून सुरु झाली? आज आपण याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

१८ फुटाच्या अजगराने एका दमात गिळली ५ फुटाची मगर; नंतर अशी हालत झाली की…; Viral Video पाहून उडेल थरकाप

काही रिपोर्ट्समध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार साडीमध्ये फॉल लावण्याची पद्धत सुमारे १९७५ साली सुरु झाली. यामागे साडीच्या सुरक्षेचे कारण असल्याचे सांगण्यात येते. विना फॉलची साडी दोन-तीन वेळा नेसल्यानंतर लगेचच साडीचा कापड खालून दुमडू लागतो आणि तो एखाद्या पाईपप्रमाणे गुंडाळला जातो. याउलट जड साड्यांची काठ जमिनीला घासल्याने फाटून खराब होऊ लागते. महागड्या साड्या अशाप्रकारे खराब होणे महिलांसाठी अतिशय दुःखद असू शकते. यासाठीच लोक साड्यांची सुरक्षा करण्यासाठी उपायांच्या शोधात होते. यानंतर दुमडणाऱ्याच्या साड्यांची देखभाल त्यावर इस्त्री करून केली जात असे. मात्र ज्या साड्या जमिनीला घासून खराब होत असत त्यांच्या सुरक्षेसाठी अजूनही काही उपाय मिळाला नव्हता.

याचकाळात, बेलबॉटम पॅंटच्या खालील किनाऱ्यांवर एक पितळेची चैनी लावली जात असे. याच्या मदतीने या पँटची सुरक्षा केली जात असे. मात्र साडीसाठी हा उपाय वापरणे खूपच खर्चिक होते. महागड्या साड्यांना या चैन लावणे फायदेशीर असले तरी कमी किमतीच्या साड्यांसाठी हे खूपच महाग होते. प्रत्येकालाच गी गोष्ट परवडण्यासारखी नव्हती. खूप संशोधन केल्यानंतर मुंबईमध्ये साडीच्या खालील भागावर फॉल लावण्याची कल्पना शोधली गेली. यामुळे साड्यांची किनार खराब होण्यापासून बचाव होऊ लागला.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did you know the reason behind fall is applied to the saree know how this method started pvp
Show comments