salary comes from the word salt : प्रत्येकाला त्यांच्या कामासाठी चांगली ‘सॅलरी’ मिळावी, अशी इच्छा असते, विशेषत: जे ऑफिसमध्ये काम करतात. त्यांच्याकडून महिन्याच्या शेवटी मिळणाऱ्या पगाराची आतुरतेने वाट पाहिली जाते; पण ‘सॅलरी’ हा शब्द कुठून आला याचा कधी विचार केला आहे का? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, पगार या शब्दाची उत्पत्ती प्रत्यक्षात मिठापासून झाली आहे. होय, तुम्ही जे वाचलेय ते बरोबर वाचलेय! हा शब्द मिठाशी कसा संबंधित आहे आणि तो किती जुना आहे आणि त्याचा अनोखा इतिहास) जाणून घेऊ.

मिठाचे महत्त्व (The importance of salt )

आपल्या सर्वांना माहीत आहे की, मीठ हा एक आवश्यक असा मसाला आहे; जो आपल्या जेवणाची चव वाढवतो, परंतु, तुम्हाला माहीत आहे का की, प्राचीन रोममध्ये मिठाचे महत्त्व फक्त अन्नापुरते मर्यादित नव्हते? त्या काळात मीठ ही एक मौल्यवान वस्तू मानली जात होती आणि चलन म्हणूनही ती वापरली जात होती.

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
onion prices loksatta news
कांदा स्वस्त; गृहिणींना दिलासा, आठवडाभरात किलोमागे २० ते २५ रुपयांनी घट
Winter healthy recipe in marathi olya toorichya danyanchi bhaji recipe in marathi
चटकदार व झणझणीत विदर्भ स्पेशल ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी; हिवाळ्यातली अतिशय पौष्टीक रेसिपी एकदा नक्की ट्राय करा
Atul Save
Atul Save : छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदाबाबत अतुल सावेंचं मोठं विधान; म्हणाले, “…तो निर्णय आम्हाला मान्य असेल”
GST On Popcorn Nirmala Sitharaman
GST On Popcorn : आता पॉपकॉर्नवरही जीएसटी, चवीनुसार कर द्यावा लागणार!
Shop owner advertise poster outside shop for customers goes viral on social media
PHOTO:”कृतज्ञता आयुष्य सुंदर बनवते” दुकान मालकानं ग्राहकांसाठी लावली अशी पाटी की होऊ लागली गर्दी; वाचून तुम्हीही कराल कौतुक
Dhananjay munde
Dhananjay Munde : मंत्रिपद मिळाल्यानंतर धनंजय मुंडेंची पोस्ट चर्चेत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याना उद्देशून म्हणाले, “मी..”

प्राचीन रोममध्ये व्यापारासाठी पैसे नव्हते तेव्हा मिठाचा वापर केला जात असे. रोमच्या सैनिकांना त्यांच्या कामाच्या मोबदल्यात रोज मीठ दिले जात असे. यावरूनच being worth one’s salt एखाद्याच्या मिठाला पात्र असणे हा वाक्प्रचार आला असावा. ज्या सैनिकांनी चांगले काम केले, ते त्यांना मिळणाऱ्या मिठासाठी पात्र ठरले.

रोमन साम्राज्यात सैनिकांना त्यांच्या सेवेच्या बदल्यात दिल्या जाणाऱ्या वेतनाला सॅलेरियम’ असे म्हणतात. विशेष म्हणजे हे वेतन रोख किंवा सोन्या-चांदीच्या नाण्यांच्या स्वरूपात दिला जात नव्हते, तर ते मिठाच्या स्वरूपात दिले जात होते.

रोमन इतिहासकार प्लिनी द एल्डर यांनी आपल्या नॅचरल हिस्ट्री या ग्रंथात लिहिले आहे, “रोममध्ये सैनिकांचा मोबदला आधी मीठ म्हणून दिला जात असे आणि रोमन भाषेत मिठाला ‘सॅलेरियम’ असे म्हणतात. त्यावरून सॅलरी हा शब्द तयार झाला आहे.”

सॅलरी आणि सोल्जर शब्दाचा संबंध (Does the word ‘soldier’ come from ‘sal dare’ (to give salt)?)

काही स्रोतांच्या मते, सोल्जर हा शब्द लॅटिनमधील sal dare (मीठ देणे) यावरून आला असावा. परंतु, त्यासाठी ठोस पुरावे नाहीत. आधुनिक संशोधनानुसार, हे संबंध अस्तित्वात असू शकतात. कारण- सैनिकांना दिलेली रक्कम विशेषतः मीठ खरेदी करण्यासाठी किंवा प्रसिद्ध सॉल्ट रोड्सचे (Salt Roads) रक्षण करण्यासाठी किंवा मिठाचा पुरवठा जिंकण्यासाठी दिली जाऊ शकते.

पण, सोल्जर हा शब्द लॅटिन solidus वरून आला आहे, ज्याचा अर्थ सोन्याचे नाणे, असा होतो. इ.स. ३०१ मध्ये रोमन सम्राट डायोक्लेशियन यांनी हे नाणे तयार केले होते.

हेही वाचा –EPF Pension Schemeसाठी तुम्ही आहात का पात्र? जाणून घ्या काय आहे पात्रता, आर्थिक सुरक्षा आणि करबचत फायदे

प्राचीन काळातील मिठाचे महत्त्व (Importance of salt in ancient Rome)

मानवी आयुष्यासाठी मीठ आवश्यक आहे. त्यामुळेच प्राचीन संस्कृती नद्या आणि जलस्रोतांजवळ वसली; जेथून काही ठिकाणी मीठ उत्पादन करता येईल किंवा जेथून मिठाचा व्यापार करता येईल. इंग्रजीतील सँडविच आणि नॉर्विच यांसारख्या नावांमध्ये असलेला wich हा प्रत्यय त्या ठिकाणी मिठाचा स्रोत असल्याचे दर्शवतो.

चिनी, हिटाइट, हिब्रू व ग्रीक लोकांनी मिठाचे महत्त्व ओळखले. प्राचीन काळी त्याचा आवश्यक गरजेनुसार वापर केला जाई. त्याशिवाय शक्तिशाली सैन्याला पराभूत करून, शत्रूच्या जमिनीवर मीठ पसरवून शेत निरुपयोगी बनवले जाई. जिंकलेल्या प्रदेशाचा नाश व उजाडपणाचे प्रतीक म्हणून मीठ वापरले जात असे; ज्याला असीरियन (Assyrians) म्हटले जात असे.

जेव्हा रोम जगातील सर्वांत मोठ्या साम्राज्यांपैकी एक होत असताना मिठाच्या सुलभ वाहतुकीसाठी रस्ते बनवले जात होते. जरी टायरेनियन समुद्र एड्रियाटिक समुद्राच्या तुलनेत रोमच्या खूप जवळ होता. परंतु, नंतरच्या समुद्रात उथळ खोली आणि उच्च क्षारता असल्याने मिठचे उत्पादन मिळवणे सोपे होते. परिणामी, रोमला ॲड्रियाटिक समुद्राला जोडणारा व्हाया सलारिया मार्ग तयार झाला.

संपूर्ण मध्ययुगीन काळात रोमन साम्राज्याने या रस्त्यांद्वारे जर्मनिक जमातींपर्यंत मीठ वाहून नेले. तब्बल ४०,००० उंटांसह विशाल समूहाने मिठाच्या वाहतुकीसाठी सहारा वाळवंटाचे ४०० मैल पार केले.

हेही वाचा –Chromeवर Google Searchऐवजी ChatGPT आणि Perplexity AI कसे बदलावे? जाणून घ्या सोपी पद्धत

मीठ आणि पगार यांच्यातील संबंध : (Connection between salt and salary)

सॅलरीचा प्रारंभिक काळ

सॅलरीची संकल्पना निओलिथिक क्रांतीच्या वेळी किंवा या वेळेपूर्वी साधारण १०,००० इ.स.पू. ते ६,००० इ.स.शपू.दरम्यान सुरू झाली असावी. संघटित कर्मचार्‍यांसाठी त्यांच्याकडे योग्य वस्तुविनिमय व्यवस्था अस्तित्वात येण्याआधी मीठ हा मोबदला म्हणून वापरले जात असे.

हिब्रू ग्रंथ एज्रामध्ये (५५० – ४५० इ.स. पू.) असे नमूद केले आहे, “त्या काळात मिठाला खूप किंमत होती. जर एखाद्या व्यक्तीने दुसर्‍याकडून मीठ घेतले, तर असे मानले जाते, “त्याने त्या व्यक्तीवर मोठा उपकार केले आहेत. जसे की, त्याने त्याला पगार दिला आहे. मीठ इतके मौल्यवान होते की, काही काळापूर्वी त्यावर फक्त राजाचे नियंत्रण होते. हेच पुस्तक एका प्रसिद्ध पर्शियन राजा आर्टॅक्सर्क्सेसबद्दलदेखील सांगते. त्यांचे सेवक म्हणायचे की, त्यांना राजाकडून मीठ मिळते‌ म्हणून ते राजाचे खूप निष्ठावान आहेत. हे दर्शविते की, मीठ केवळ अन्न खाण्यासाठीच नव्हे, तर लोकांच्या नातेसंबंधासाठी आणि निष्ठा यासाठीही खूप महत्त्वाचे होते.

मध्ययुगीन काळात ‘पगार’ मिळणे सामान्य नव्हते आणि पूर्व-औद्योगिक युरोपपर्यंत ते दुर्मीळ राहिले. आव्हाने असूनही, वस्तुविनिमय पद्धतीमुळे व्यापार सुलभ झाला. दुसरीकडे खानदानी व उच्चपदस्थ अधिकारी सदस्यांना, अधूनमधून अतिरिक्त देयके देऊन पूरक वार्षिक वेतन मिळत असे. गुलाम यांसारख्या निम्न स्तरावरील लोकांना एक तर कोणतेही वेतन मिळाले नाही किंवा त्यांनी जे उत्पादन केले त्याचा काही अंश मिळाला किंवा त्यांनी मोबदला म्हणून फक्त अन्न आणि निवास मिळवला. मध्ययुगीन विद्यापीठे आणि मठांमध्ये, सहायक सामान्य होते आणि त्यांना सहसा ‘पगार’ दिला जात असे.

हेही वाचा –NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

मीठ इतके महत्त्वाचे असण्यामागे अनेक कारणे होती. सुरुवातीला, मीठ जास्त काळ अन्न टिकवून ठेवण्यास मदत करते. दुसरे म्हणजे शरीरासाठी आवश्यक असलेल्या खनिजांचा हा एक महत्त्वाचा स्रोत होता. तिसरे म्हणजे प्राचीन काळी मीठ मिळवणे सोपे काम नव्हते. ते दूरच्या भागातून आणले जाततं होते आणि त्यामुळे त्याची किंमत खूप जास्त होती.

Story img Loader