Unique River In Maharashtra: तुम्ही सर्वांनी आजपर्यंत ऐकले असेल की भारतातील बहुतेक नद्या एकाच दिशेने वाहतात आणि ती दिशा म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे! बहुतांश नद्यांचा प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे असतो. पण देशात अशी एकमेव नदी आहे जी उलट वाहते. होय, तुम्ही ते अगदी बरोबर वाचले आहे, आपल्या देशात अशी नदी आहे, जी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत नाही, तर पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या त्या नदीचे नाव नर्मदा. या नदीस रेवा या नावाने सुद्धा ओळखले जाते.

भारतातील सर्वात मोठी नदी गंगा आणि देशातील इतर सर्व नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि बंगालच्या उपसागरात येतात. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नर्मदा ही देशातील अशी नदी आहे, जी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणिते अरबी समुद्राला जाऊन मिळते. ही नदी मध्य प्रदेश आणि गुजरातमधील एक मुख्य नदी आहे जी भारताच्या मध्य भागात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. नर्मदा नदी मैखल पर्वताच्या अमरकंटक शिखरावरून उगम पावते.

actress Bhagyashree shared recipe of unpeeled potato
‘मैने प्यार किया’फेम भाग्यश्री म्हणते, “न सोललेल्या बटाट्यांमुळे कमी होतो क्रॅम्प्सचा त्रास” खरंच हे शक्य आहे का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
minor girl sexually assaulted in west bengal
West Bengal Crime : संतापजनक! पश्चिम बंगालच्या हुगळीमध्ये अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार; बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर आढळली
Trigrahi Yog 2024
Trigrahi Yog 2024 : ५० वर्षानंतर कन्या राशीमध्ये बनतोय त्रिग्रही योग, ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा
Russian President Vladimir Putin, nuclear weapons policy,
विश्लेषण : रशियाचे अण्वस्त्र धोरणच बदलण्याचा पुतिन यांचा निर्णय कशासाठी? या बदलांमुळे अणुयुद्धाची शक्यता बळावणार?
Why will families migrate from tiger protected areas
वाघांच्या संरक्षित क्षेत्रांतील कुटुंबांचे स्थलांतरण का होणार? समस्या काय? आव्हाने कोणती?
Loksatta vyaktivedh AG Noorani India and China border fence Constitutionalist Expert on Kashmir
व्यक्तिवेध: ए. जी. नूरानी
The migration in 2022, supported by airborne foster parents.
नामशेष होत चाललेले पक्षी, हरवलेले स्थलांतराचे मार्ग आणि विमानातून मार्गदर्शन; संवर्धनतज्ज्ञ नेमके काय करत आहेत?

…म्हणून नर्मदा नदी उलट्या दिशेने वाहते

नर्मदा नदीच्या उलट्या प्रवाहाचे भौगोलिक कारण म्हणजे रिफ्ट व्हॅली. रिफ्ट व्हॅलीचा उतार विरुद्ध दिशेने आहे. यामुळे नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाऊन ती अरबी समुद्राला मिळते. इतर सर्व नद्यांच्या उलट, नर्मदा नदीच्या उलट्या प्रवाहामागे अनेक कथा पुराणात सांगितल्या गेल्या आहेत. असे म्हणतात की नर्मदेचा विवाह सोनभद्राशी होणार होता पण सोनभद्र नर्मदेची मैत्रिण जुहिलावर प्रेम करत असे. यामुळे संतप्त झालेल्या नर्मदेने आयुष्यभर कुमारी राहून उलट दिशेने वाहत जाण्याचा निर्णय घेतला. भौगोलिक स्थितीवरही नजर टाकली, तर नर्मदा नदी सोनभद्रा नदीपासून एका विशिष्ट बिंदूवर विभक्त होते. आजही ही नदी इतर नद्यांच्या विरुद्ध दिशेने वाहते, हे आश्चर्यापेक्षा कमी नाही.

हे ही वाचा<< ..तर डीमार्ट, Zudio सारखे ब्रँड कॅरीबॅगसाठी तुमच्याकडे पैसे मागू शकत नाहीत! ग्राहकांनो, ‘असं’ लावा डोकं

नर्मदा नदी तिच्या उगमापासून पश्चिमेला १,३१२ किमी प्रवास करते आणि खंभातच्या आखात, अरबी समुद्राला मिळते. नर्मदा नदी ही मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याची जीवनदायिनी नदी आहे. अरबी समुद्रात जाऊन मिळण्यापूर्वी, नर्मदा नदी १,३१२ किलोमीटर लांबीच्या मार्गाने मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या प्रदेशातून ९५, ७२६ चौरस किलोमीटर पाणी वाहून नेते. नर्मदा नदीला ४१ उपनद्या आहेत. यामध्ये २२ नद्या डाव्या तीरावर आणि १९ नद्या उजव्‍या तीरावर मिळतात.