Colored Strips on Indian Railway: भारतीय रेल्वे नेहमीच त्यांच्या प्रवाशांसाठी सुलभ आणि आनंददायी प्रवास पुरवण्याचा प्रयत्न करते. बहुतांश वेळा या सुविधांचे अर्थ माहित नसल्याने आपल्याला साहजिकच सुविधांचा लाभ घेता येत नाही. तुम्ही भारतीय रेल्वेचे डब्बे कधी नीट पाहिले तर त्यावरील अनेक चिन्ह व अंक दिसून येतील. जसे की ट्रेनच्या काही डब्ब्यांवर एका कोपऱ्यात रंगाच्या तिरप्या रेषा ओढलेल्या असतात. हा डिझाईनचा भाग नसुन, त्यामागे त्या रंगाचे एक कारण असते, ज्यामुळे त्या रंगांच्या डब्याचा काय अर्थ आहे हे स्पष्ट होते. ही खूण नेमकी कशासाठी केली जाते हे जाणून घेऊया..

निळ्या आणि लाल डब्यांवर पिवळे पट्टे

ट्रेनच्या निळ्या आणि लाल डब्यांवर पिवळे पट्टे रंगवले जातात जे दर्शवितात की हे डबे शारीरिकदृष्ट्या विकलांग प्रवाशांसाठी तयार आहेत. यातून आजारी आणि अस्वस्थ वाटणाऱ्या प्रवाशांनाही प्रवास करता येऊ शकतो.

tapti ganga Express train loksatta
ताप्तीगंगा एक्स्प्रेसमध्ये जागेच्या वादावरुन राजस्थानच्या दोन प्रवाशांवर हल्ला, नंदुरबार स्थानकातील घटना
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Delhi, Marathi Sahitya Sammelan, Delhi travel Railway,
फिरत्या चाकावरती देसी शब्दांना आकार, दिल्ली प्रवासादरम्यान रेल्वेच्या डब्यात साहित्य संमेलन
central railway cancelled 400 local trains
मध्य रेल्वेचा बोजवारा, सहा दिवसांत ४०० लोकल रद्द; ६५० लोकल विलंबाने
train cancellations on western railway due to mega block
वाणगाव ते डहाणू रोडदरम्यान ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वेगाड्या रद्द
passengers struggled due to western railway mega block on Saturday
पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
Mumbai Western Railway Jumbo Block
जम्बो ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचे हाल; अंधेरी, बोरीवली स्थानकांवर प्रचंड गर्दी
mega block between CSMT Masjid stations for Karnak flyover work halts Konkan Railway trains
कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम, वंदे भारतसह जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेस विलंबाने धावणार

निळ्या डब्यांवर पांढरे पट्टे

विशिष्ट ट्रेनचे अनारक्षित द्वितीय श्रेणीचे डबे दर्शवण्यासाठी निळ्या रेल्वेच्या डब्यांवर पांढरे पट्टे रंगवले जातात. या पट्ट्यांच्या मदतीने प्रवाशांना सामान्य डबे सहज ओळखता येतात.

हिरव्या पट्ट्यांसह राखाडी डब्बे

हिरव्या पट्ट्यांसह राखाडी डबे महिलांसाठी राखीव असल्याचे सूचित करतात.

राखाडी डब्यांवर लाल पट्टे

राखाडी डब्यांवर लाल पट्टे सूचित करतात की ते EMU/MEMU गाड्यांमधील प्रथम श्रेणीचे डबे आहेत.

हे ही वाचा<< महाराष्ट्रातील ‘ही’ एकमेव नदी उलटी वाहते; पौराणिक व शास्त्रीय दोन्ही बाजू वाचून व्हाल थक्क

दरम्यान, रेल्वेचे डब्बे हे विशिष्ट रंगांचे असण्यामागेही कारण आहे. मुख्यतः रेल्वेचे डब्बे निळ्या रंगांचे असतात. मेल एक्सप्रेस आणि सुपरफास्ट ट्रेनमध्ये या निळ्या रंगांच्या डब्ब्यांचा वापर केला जातो. विशेष प्रकारच्या डब्ब्यांसाठी लाल रंगाचा वापर केला जातो, राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेसमध्ये या डब्यांचा वापर केला जातो. हिरव्या रंगाचे डबे गरीबरथमध्ये वापरण्यात येतात. तर तपकिरी रंगांचे डबे मीटरगेज गाडयांमध्ये वापरण्यात येतात.

Story img Loader