ड्रॅक्युला पोपटाचे नाव तुम्ही ऐकलेच असेल. काळे तोंड आणि लाल पंख असणारे हे पोपट दिसायला खूप भयंकर वाटतात. साामान्य पोपटांपेक्षा हे पोपट जास्त उग्र आणि हिंस्त्र मानले जातात अनेकांच्या मते- ड्रॅक्युला पोपट रक्त पितात; पण खरेच ड्रॅक्युला पोपट एवढे भयंकर आहेत का? ते खरेच रक्त पितात का? चला जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- घोडा खरंच उभ्या-उभ्या झोप काढतो? काय आहे नेमकं या मागचं कारण?

रोमानियामध्ये आजही लोक ड्रॅक्युला पोपटाला आपला हीरो मानतात. लोकांना असे वाटते की, ड्रॅक्युला नावाचा एक कठोर राजा होता; ज्याने शत्रू आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा केली होती. त्यामुळे ड्रॅक्युलासारख्या दिसणार्‍या या काळ्या आणि शेंदरी रंगाच्या पोपटांना ड्रॅक्युला पोपट, असे म्हणतात.

ड्रॅक्युला पोपट काय खातात?

डिस्कव्हरी वाइल्ड लाइफने दिलेल्या माहितीनुसार- ड्रॅक्युला पोपट रक्त पितात हा समज चुकीचा आहे. हे पोपट सामान्य पोपटांपेक्षा अतिशय चपळ असतात. त्यांचे खाणेही विशिष्ट स्वरूपाचे असते. सामान्य पोपटांप्रमाणे ते सगळीच फळे खात नाहीत. ड्रॅक्युला पोपट केवळ काही विशिष्ट प्रजातींचे अंजीर खातात. तसेच ते फुले आणि इतर गोड फळेदेखील खातात. ड्रॅक्युला पोपटाच्या चेहऱ्यावर पिसे नसल्यामुळे त्यांचे डोके शरीराच्या तुलनेत लहान दिसते. त्यामुळे अंजीर खाल्ल्यानंतर त्याचा चिकट रस त्याच्या शरीराला आणि पंखांना चिकटत नाही.

हेही वाचा-सापापेक्षा धोकादायक आहे ‘या’ विंचवाचे विष; एका थेंबाची किंमत लाखो रुपये

ड्रॅक्युला पोपटांची लांबी सुमारे ४६ सेंमी आणि त्यांचे वजन सुमारे ७०० ग्रॅम असते. ते साधारण २० ते ४० वर्षे जगतात. नर ड्रॅक्युला पोपटांच्या डोळ्यांमागे एक लहान लाल ठिपका असतो. ड्रॅक्युला पोपट त्यांच्या वक्र चोचीमुळे अधिक लक्ष वेधून घेतात. या चोचीमुळे त्यांना गिधाड पोपट म्हणूनही ओळखले जाते. ड्रॅक्युला पोपट मुख्यत्वे न्यू गिनीच्या जंगलात आढळतात. मोठ्या आणि पोकळ झाडांमध्ये ते घरटे बनवतात. ड्रॅक्युला पोपटाची प्रजाती अधिकृतपणे दुर्मीळ म्हणून सूचीबद्ध आहे. या पोपटांच्या पिसांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे या पोपटांची मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते.

हेही वाचा- मर्सिडीज की लॅम्बोर्गिनी? दुबईत पोलिस कोणत्या गाड्या वापरतात? जाणून घ्या

ड्रॅक्युला पोपटाची मादी एका वेळी दोन अंडी घालते. साधारणत: महिनाभरानंतर ती अंडी उबतात. त्यानंतर सुमारे १२ आठवड्यांनंतर अंड्यांतून पिल्ले बाहेर येतात. हे पोपट गट करून राहतात. एका गटात सुमारे २० पोपट असतात. ड्रॅक्युला पोपटांचा आवाज इतर पोपटांप्रमाणे गोड नसतो. त्यांची हाक कर्कश वाटते. उडतानाही ते कर्कश आवाज काढतात. ड्रॅक्युला पोपट आपल्या जोडीदाराला हाक मारताना आवाजाची तीव्रता कमी करतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do dracula parrots really drink blood why do they look so terrible know the truth dpj
Show comments