भारतात सध्या नवीन फॅशनचा ट्रेंड सुरु असून अनेक लोक मोबाईल फोनच्या कव्हरच्या पाठीमागे १०,२०,५०,१००,५०० रुपयांची नोट ठेवतात. लोकांना असं वाटतं की, फोनच्या पाठीमागे हे पैसे ठेवल्यावर एमरजन्सीला उपयोगी येतील. परंतु, असं केल्याने किती खतरनाक गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं, याची त्यांनी विचारही केला नसेल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, जर एखादी चूक झाली, तर फक्त एका नोटीमुळे तुमचा जीवही जावू शकतो. मोबाईलच्या कव्हरमध्ये पैशांची नोट ठेवणे किती घातक आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
हिट रिलीज होत नाही
जेव्हा तुम्ही फोनचा जास्त वापर करता, त्यावेळी फोन गरम झाला असल्याचं तुमच्या लक्षात आलं असेल. जेव्हा फोन गरम होतो, तेव्हा फोनच्या पाठीमागची बाजूही गरम होत असते. अशातच तुम्ही जर फोनच्या कव्हरमध्ये पैशांची नोट ठेवली असेल, त्यावेळी फोनमधील हिट रिलीज होत नाही. या कारणामुळे मोबाईलचा स्फोटही होऊ शकतो. यामुळेच एक्स्पर्ट सांगतात की, फोनमध्ये खूप टाईट कव्हर लावलं नाही पाहिजे. कारण यामुळे फोनचा स्फोट होऊ शकतो.
नक्की वाचा – दोघांनी एकमेकांना Kiss केल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या
नोटीत असलेले केमिकलही असतात जीवघेणे
नोट कागदाने बनवलेली असते आणि यामध्ये अनेक प्रकारच्या केमिकलचा वापर केलेला असतो. अशातच जेव्हा फोन गरम होतो आणि नोटीमुळे हिट रिलीज होत नाही, त्यावेळी मोबाईलला आग लागण्याची शक्यता असते. नोटीत असलेल्या केमिकलमुळे ही आग अजून वाढू शकते. अशातच आम्ही तुम्हाला हा सल्ला देतोय की, चुकूनही फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवू नका आणि फोनचा कव्हरही खूप काळजीपूर्वक लावा. जर कव्हर खूप टाईट झाला तर स्फोट होण्याची शक्यता असते.