Phantom Vibration Syndrome : सध्याच्या काळात प्रत्येकाकडे मोबाईल फोन पाहायला मिळतो. एवढंच नाही तर अगदी घरातील प्रत्येक सदस्यांकडे मोबाईल असतो. त्यामुळे मोबाईल फोन ही चैनीची गोष्ट राहिली नाही, तर एकप्रकारे गरज बनली आहे. आता मोबाईल वापरण्याचे अनेक फायदे आहेत तसे काही तोटे देखील आहेत. सध्या अनेकांना मोबाईलची एवढी सवय झालेली असते की मोबाईल शिवाय अजिबात जमत नाही. आता अनेकदा अनेकांनी मोबाईल लांब ठेवलेला असतो.

पण तरीही त्यांना मोबाईल जवळ असल्याचा किंवा मोबाईल व्हायब्रेट होत असल्याचा भास होत असल्याचं पाहायला मिळतं. याला फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम असंही म्हटलं जातं. तसेच या फँटम व्हायब्रेशन सिंड्रोमचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचंही दिसून येतं. दरम्यान, फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम (Phantom Vibration Syndrome) म्हणजे नक्की काय? याविषयी आज थोडक्यात जाणून घेऊयात.

फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम म्हणजे नक्की काय?

सध्याच्या काळात अनेकजण रात्री झोपताना फेसबुक, स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपवर ऑनलाईन असतात. अनेकजण तर आपला मोबाईल एक मिनिटही बाजूला ठेवत नसल्याचंही सांगितलं जातं. तसेच काहीजण मोबाईल उशाखाली घेऊन देखील झोपतात. पण आपण सतत मोबाईल वापरत असल्यामुळे कधी-कधी आपल्याला असं जाणवतं की आपला फोन व्हायब्रेट होतोय? किंवा आपल्या फोनची रिंग वाजल्याचा भास होतो. त्यामुळे आपण पुन्हा मोबाईल पाहतो. आपल्याला फोन व्हायब्रेट होत असल्याचा सातत्याने भास होतो यालाच फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम असं म्हटलं जातं.

मीडिया रिपोर्टनुसार, जवळपास ६८ टक्क्यापेक्षा जास्त लोकांना फँटम व्हायब्रेशन सिंड्रोमचा अनुभव आला आहे. दरम्यान, आपल्या मेंदूला नेहमी फोनचे व्हायब्रेशन किंवा रिंग ऐकण्याची सवय झालेली असते. मग ही सवय एवढी झालेली असते की आपला फोन बंद (स्विच ऑफ) असला तरी आपल्या डोक्यात हा आवज बसलेला असतो. त्यामुळेच फोन वाजल्याचा किंवा फोनचे व्हायब्रेट झाल्याचा भास आपल्याला होतो. त्यामुळे अनेकदा फोनचा वापर शक्य तेवढा कमी करण्याचा किंवा कामापुरता करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच सतत फोन व्हायब्रेट होत आहे असा भास होणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे घाबरुन जाण्याचं काही कारण नाही.

Story img Loader