New animal species 2024: या जगात अनेक जातींचे प्राणी, पक्षी, फुलं, झाडं आहेत. यातील बऱ्याच गोष्टी आपल्याला ठाऊकही आहेत. परंतु, यातील काही गोष्टी हळूहळू लुप्त होऊ लागल्या आहेत. या सर्व गोष्टींबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी दरवर्षी शास्त्रज्ञ अविश्वसनीय प्राणी, पक्षी, वनस्पतींच्या नवीन प्रजातींचा शोध घेतात, ज्यामुळे आपल्याला आपल्या निसर्गाच्या रहस्यांबद्दल अधिक माहिती मिळते. २०२४ मध्ये संशोधकांनी व्हॅम्पायर हेजहॉग्जपासून ते स्टाररी-नाइट गेकोपर्यंत अनेक आकर्षक प्राण्यांचा शोध लावला आहे. पण, हे प्राणी नक्की कोणते हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

२०२४ मध्ये सापडलेल्या सर्वात आश्चर्यकारक नवीन प्राण्यांच्या सहा प्रजाती

व्हॅम्पायर हेजहॉग (हायलोमिस मॅकरॉन्ग)

हेजहॉग हा एक काटेरी सस्तन प्राणी आहे. युरोप, आशिया आणि आफ्रिकेच्या काही भागांत आणि न्यूझीलंडमध्ये पाच प्रजातींमध्ये हेजहॉगच्या १७ प्रजाती आढळतात. हेजहॉग्ज त्यांच्या मणक्यांद्वारे सहज ओळखले जातात, जे केराटिनने कडक केलेले पोकळ केस असतात.

‘स्टारी नाईट’ गेको (सेनेमास्पिस वांगोघी)

भारतातील दक्षिण पश्चिम घाटातील पर्वतरांगांमध्ये हा छोटा सरडा आढळतो. त्याचे अद्वितीय नमुने इतके कलात्मक आहेत की पेनसॉफ्ट, जर्नल प्रकाशकने २०२४ च्या क्रमांक १ नवीन प्रजाती म्हणून त्याला स्थान दिले.

लॉर्ड सॉरॉन पिरान्हा

‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’मधील आय ऑफ सॉरॉनसारख्या दिसणाऱ्या शाकाहारी पिरान्हाचा नव्याने शोध लागला आहे. हा प्राणी अमेझॉनमध्ये आढळतो. हा प्राणी त्याच्या वनस्पती-आधारित आहार आणि धोकादायक नावाने सामान्य पिरान्हा स्टिरियोटाइपला आव्हान देतो.

सदर्न जायंट हमिंगबर्ड

ही जगातील सर्वात मोठी हमिंगबर्ड प्रजाती आहे. ही मध्य चिली आणि पेरू येथे आढळते. या विशाल प्राण्याचा शोध लावण्यासाठी शास्त्रज्ञांना २०२४ पर्यंतचा काळ लागला. यावरून लक्षात येईल की, मोठमोठे विशाल प्राणीही जगापासून लपून राहू शकतात.

काओ बँग क्रोकोडाइल न्यूट (टाइलोटोट्रिटोनोलियान्सिस)

ही एक लहान उभयचर प्रजाती आहे, ज्याच्या शरीरावर हाडांसारख्या रेशा आणि गाठींसारखे मास असते. तसेच त्यावर चमकदार नारंगी शिरा असतात आणि हा मगरीसारखा दिसतो. हा ईशान्य व्हिएतनाम येथे आढळतो. हा प्राणी प्रामुख्याने काळा असतो आणि त्याच्या बोटांवर चमकदार नारिंगी टोक असतात, ज्यामुळे तो दृश्यमानपणे आकर्षक आणि धोकादायकही वाटतो.

क्लाउडेड टायगर कॅट (लेपर्डस पार्डिनोइड्स)

ही एक लहान जंगली मांजर आहे. हा प्राणी पनामा, कोलंबिया, पेरू, बोलिव्हिया आणि अर्जेंटिनामधील जंगलामध्ये आढळतो. कोलंबिया आणि कोस्टा रिकामध्ये या नव्याने ओळखल्या जाणाऱ्या प्रजातीसाठी संवर्धनाचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत.

Story img Loader