कामाचा ताण आणि रोजच्या धावपळीपासून कंटाळा आल्याने तुमच्यापैकी अनेकजण रोड ट्रिपचा प्लान करत असतील. यात तुम्ही अनेकदा अशा महामार्गाची निवड करता ज्यावरून प्रवास करताना तुम्हाला खूप आनंद होतो. तसेच प्रवास करण्याची एक वेगळी मज्जा घेता येते. यात महाराष्ट्रातही असे काही महामार्ग आहेत ज्यावरून प्रवास करताना इतके आरामदायी वाटते की, ज्यामुळे प्रवास थांबू नये असे वाटते. पण तुम्हाला माहित आहे का, जगातील सर्वात मोठा महामार्ग कोणता? आणि तो कोणत्या देशात आहे? चला तर मग जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ देशात आहे सर्वात मोठा महामार्ग

उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेला जोडणारा ४८,००० किलोमीटरचा पॅन अमेरिकन हायवे हा जगातील सर्वात मोठा महामार्ग आहे. दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियातील हायवे १ आहे, जो ९००९ मैल म्हणजे १४,५०० किमी लांबीचा आहे. तिसऱ्या स्थानी ट्रान्स-सायबेरियन हायवे आहे, जो ६,८०० मैल म्हणजेच ११,०० किमी लांबीचा आहे. यानंतर कॅनडाचा ट्रान्स-कॅनडा हायवे चौथ्या क्रमांकावर येतो, ज्याची लांबी ४,८६० मैल (७,८२१ किमी) आहे. त्यानंतर एशियान हायवे ५ चा नंबर येतो, जो १०,३८० किमी (६४५० मैल) तर शेवटी गोल्डन चतुर्भुज हायवे (इंडिया) नेटवर्कचा समावेश होतो, जो ६२०० मैल म्हणजे १०,००० किमी लांबीचा आहे.

भारतात आहेत जगातील सर्वात चांगले रस्ते?

भारतातील गोल्डन चतुर्भुज हायवे दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता शहरांना ३६०० मैलांच्या लूपमध्ये जोडतो. हा महामार्ग २०१२ मध्ये पूर्ण झाला. दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केलेला हा देशातील सर्वात मोठा महामार्ग आहे. ज्यावेळी ते देशाचे पंतप्रधान होते त्यावेळी त्यांनी या महामार्गाचे काम हाती घेतले होते.