Am Pm Full Form : आपण दिवसातून कित्येकदा वेळे सांगताना AM आणि PM चा उल्लेख करतो पण तुम्हाला त्याचे महत्त्व माहिती आहे का? दिवस हा २४ तासांचा असतो पण आपल्या घड्याळ हे १२ आकड्यांचे असते मग अशावेळी २४ तास मोजण्यासाठी आपण AM आणि PM चा वापर करतो पण तुम्हाला AM आणि PM चा फुल फॉर्म माहिती आहे का, चला तर सविस्तर जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

AM आणि PM चे महत्त्व

अनेकदा वेळ सांगताना, आणि विशेषत: लिहताना AM आणि PM या शब्दाचा सर्वाधिक वापर केला जातो. त्याचे महत्त्व एवढे आहे की याचा अर्थ जर तुम्ही समजला नाही तर तुमच्या घड्याळाचा गजरही(alarm) चुकू शकतो.
मुळात AM आणि PM हे वेळ मोजण्याचे एक पॅरामीटर आहे. AM म्हणजे रात्री १२ ते सकाळी ११.५९ पर्यंतचा वेळ तर PM म्हणजे सकाळी १२ ते रात्री ११.५९ पर्यंतचा वेळ. या अनुषंगानेच घड्याळाचे काटे फिरत असतात.

हेही वाचा : आधार कार्डची Update History तपासायची आहे? तर मग फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

AM आणि PM चा फूल फॉर्म

  • AM – Ante Meridiem
  • PM – Post Meridiem

AM चा फुल फॉर्म हा Ante Meridiem आहे तर PM चा फुल फॉर्म हा Post Meridiem आहे. रात्री १२ ते सकाळी ११.५९ पर्यंतच्या कालावधीला Ante Meridiem म्हणतात तर सकाळी १२ ते रात्री ११.५९ पर्यंतच्या कालावधीला Post Meridiem म्हणतात. Ante Meridiem आणि Post Meridiem हे लॅटीन भाषेतून आलेले शब्द आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know am and pm full form general knowldge ndj
Show comments